प्रोस्टेटीक हायपरट्रॉफी (BPH) आणि होमिओपॅथी उपचार….
मित्रहो,
आपण माझ्या वैद्यकशास्त्र व इतर विविध विषयावरील लेखांना जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी
आपले मनःपूर्वक आभार मानतो... माझ्या होमिओपॅथी औषधांच्या प्रैक्टिस मध्ये तसेच विविध क्षेत्रात जे अनुभव मला येतात, तसेच जो अभ्यास मी करत असतो ती माहिती जिद्न्यासु वाचकाना मिळावी, हा माझा उद्देश आहे.आज या लेखात आपण प्रोस्टेट या ग्रंथी व त्याच्या एका आजारविषयी जाणनार आहोत. प्रोस्टेट या ग्रंथी विषयकबि 'बीनाईन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी" (BPH) हा पुरुषांमधे होणारा आजार आहे व त्यावर काय होमियोपैथी उपचार आहेत ,ते या लेखात पाहू .. तत्पूर्वी नेमके प्रोस्टेट हि ग्रंथी काय आहे ? हे पाहू...
प्रोस्टेट ग्रंथी (Prostate Gland)-
प्रोस्टेट ही ग्रंथी पुरुषांच्या लैंगिक अवयवपैकी एक आहे.. पुरुषांचे मूत्राशय (urinary Bladder) आणि मूत्रनलिका (urethra) यांचा मधील भागाच्या अगदी सभोवताली ही ग्रंथि स्थित असते.. ह्य ग्रंथि मधे "फाइब्रोमस्कुलर" ऊतींचे प्रमाण अधिक असते..आणि एकूण आतिल संरचना ही छोट्या नलिका आणि मोठ्या प्रमाणावर "फाइब्रोमस्कुलर" ऊती (Tissue) यांनी बनलेली असते.
कार्य-
प्रोस्टेट ग्रन्थी मधून विशिष्ट प्रकारच द्रव पदार्थ स्त्रवतो, जो द्रव पदार्थ पुरुषांचे वीर्य (semen) मधील महत्वाचा भाग आहे.. ह्या द्रव पदार्थ मधे विविध आवश्यक इंझायम (enzyme) उदाहरणार्थ, एसिड फोस्फेटेज़, अमयलेज़, प्रोटीएज़ हे असतात ,तसेच साइट्रिक एसिड देखील असते.
तसेच सर्वात महत्वाचा म्हणजे प्रोस्टेट ग्रन्थी ही प्रोस्टाग्लैंडीन (prostaglandins) ह्या आवश्यक घटकाची निर्मिती करण्याचे कार्य करतात.
लहान असताना मुलाची प्रोस्टेट ग्रंथी विकसित नसते परंतु जसे वय वाढते, आणि साधारण पौगंड (puberty) अवस्थेत आल्यावर पुरुषांमध्ये ही ग्रंथि विकसित होउ लागते. आणि वृद्ध अवस्थेत पुरुषांमधे ही ग्रंथी देखील हळू हळू अकार्यक्षम होउ लागते.
प्रोस्टेट ही ग्रंथी प्रमुख दोन भागात विभागली जाते.
१)बाह्य भाग (outer Zone or peripheral Zone) हा प्रोस्टेट चा मुख्य भाग आहे.
२) मध्यवर्ती भाग(central Zone) - आतील भाग (internal zone) ,व त्याच्याही आतील भागाला इनरमोस्ट झोन( innermost zone) दोघाना मिळुन मध्यवर्ती भाग (central zone) म्हटले जाते.
आता आपण "बिनाईन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी" ( BPH -Benign Prostatic hypertrophy) विषयी पाहू.
पुरुषांमध्ये साधारण ६० वर्षे वयानंतर हा आजाराला सुरवात होते. बहुतांश ७० ते ८० % रुग्णांना हा आजार वयाच्या 80 वर्षानंतर होतो. नेमके या आजाराची निश्चित कारणे वैद्यकशास्त्रात माहित नाही तरीहि यासाठी हार्मोन कारणीभूत असावेत असा अंदाज आहे.
या आजारात वर उल्लेखलेल्या ग्रंथींच्या आतील भागातील (inner zone and Innermost zone) पेशींची प्रमाणापेक्षा जास्त संख्या व आकारमान वाढते. तसेच एकूण ग्रंथीतील "फायब्रोमस्कुलर" पदार्थाची प्रमाण वाढते, यामुळे एकूण ग्रंथींचा आकार वाढतो.
आणि या सर्वांचे परिणाम असे होतात की मूत्राशय व मूत्रनलिकेला जोडणाऱ्या भागावर दबाव येतो म्हणून मूत्राशयातुन येणारी लघवी मूत्रनलीकेतून बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होतो.
लक्षणे-
- लघवीस अडथळा होणे
- लघवी साचून राहणे
- रात्री वारंवार लघवीला होणे
- लघवीच्या भागात जळजळ होणे
काही रुग्णामध्ये इन्फेक्शन किंवा अजून काही कारणास्तव अचानक ग्रंथीचा आकार वाढून लघवीला अडथळा येतो.. वयस्कर पुरुषांमध्ये साधारण असं होण्याची शक्यता अधिक असते..
उपचार-
या आजाराची वरील लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांना भेटावे.
तात्काळ (emergency) स्थिती मध्ये जेव्हा लघवी साचून राहते तेव्हा नलिका (catheter) च्या साहाय्याने लघवी बाहेर काढली जाते.
इतर वेळी मात्र लक्षणांवर उपचार केले जातात.
ज्या रुग्णामधे अधिक त्रास होतो व प्रोस्टेट चा आकार खुप वाढला आहे त्यांना शल्यशास्त्र (सर्जरी) च्या साहायाने प्रोस्टेट चा मूत्रनलिका जवळील भाग काढून टाकन्यात येतो. ज्याला Transurethral Resection of Prostatic Tissue असं म्हणतात.
हे आधुनिक व शल्यशास्त्र(surgical)चे उपचार आहेत.
होमिओपॅथी मध्ये देखील यावर उपचार आहेत. रुग्णाच्या शरीराची होमिओपॅथी च्या पद्धतीने तपासणी केल्यावरच होमिओपॅथी चे विविध औषधे या आजारावर उत्कृष्ट काम करतात.
होमिओपॅथी ची काही उपयुक्त औषधे--
पल्सेटिला, अर्जेन्टीनम नाइट्रिकम, आयोडम, स्टेफीसग्रिया, थूजा, कॉस्टिकम इत्यादि..
होमियोपैथी डॉक्टर च्या सल्ल्याशिवाय औषधे घेवू नये..
-डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment