Skip to main content

Posts

Showing posts with the label General Science

INTRODUCTION

  Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language).   I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students  or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts  " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning "  on different things in the people of India. Thank you

सूपरनोवा - एक महाकाय खगोलीय घटना

  सूपरनोवा - एक महाकाय खगोलीय घटना मित्रहो, आज आपण "सुपरनोवा" या एक महाकाय खगोलीय घटना विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया..आपण जेव्हा अवकाशाचा अभ्यास करतो, तेव्हा अशा बऱ्याच गोष्टी असतात की, जे आपले भुवया उंचावतात..अशीच एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे "सूपरनोवा". "सुपरनोवा" हा एक प्रचंड मोठा व चमकदार असा "विस्फोट" असतो..जेव्हा एखादा विशाल तारा (सूर्यापेक्षा मोठा) त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मरणासन्न अवस्थेत पोहचतो किंवा एखादा "व्हाइट द्वार्फ" तारा हा जवळच्या ताऱ्याला आपल्याकडे खेचतो, तेव्हा प्रचंड ऊर्जा एका छोट्याशा भागात एकवटून आकाशात प्रचंड मोठा "स्फोट" घडतो.  हा इतका मोठा स्फोट असतो, की आपल्या सुर्यांने त्याच्या संपूर्ण आयुष्यात एवढी ऊर्जा उत्सर्जित केली नसेल, एवढी प्रचंड ऊर्जा त्या स्फोटातून बाहेर निघते. या स्फोटातून प्रचंड लक्ख प्रकाश बाहेर पडतो, की संपूर्ण दीर्घिका (Galaxy) मध्ये  जितका प्रकाश असेल तितका किंवा त्यापेक्षा जास्त प्रकाश हा त्याचा असतो..या स्फोटात प्रचंड मोठे "शॉकवेव" आणि "रेडिए...

शनी ग्रहचे गुरुत्वाकर्षण हे आपल्या पृथ्वीच्या तुलनेने अगदी थोडेच जास्त आहे !! असे का ??

  शनी ग्रहचे गुरुत्वाकर्षण हे आपल्या पृथ्वीच्या तुलनेने अगदी थोडेच जास्त आहे !! असे का ??  शनी हा ग्रह आपल्या आपल्या सूर्यमालेतील आकाराने दुसरा मोठा ग्रह आहे, हे आपण सर्व जाणतो. सूर्यमालेतील 8 ग्रह पैकी (9 वा प्लुटो हा dwarf planet आहे) गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे प्रचंड मोठे ग्रह आहे. त्यातील गुरू हा सर्वात मोठा ग्रह आहे.. शुक्र हा साधारण आपल्या पृथ्वी एवढाच ग्रह आहे. मंगळ आणि बुध हे पृथ्वीपेक्षा लहान ग्रह आहेत. बुध हा सर्वात लहान ग्रह आहे.. आता, यात शनी हा गुरू नंतर इतर सर्व ग्रहापेक्षा मोठा ग्रह आहे. शनी हा पृथ्वीपेक्षा 9 पटीने रुंद आहे. शनी हा ग्रह पृथ्वीपेक्षा इतका मोठा आहे, की शनीमध्ये 700 पेक्षा जास्त पृथ्वी राहू शकतात..म्हणजे तुम्ही कल्पना करा !!!  असा हा प्रचंड मोठा शनी ग्रहचे वस्तुमान आणि आकारमान इतके जास्त असताना , त्याचे गुरुत्वाकर्षण (surface Gravity)वास्तविक पृथ्वीच्या तुलनेने प्रचंड जास्त असले पाहिजे.. पण वास्तविक तसे नाही..!!! शनीचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा अगदी थोडेच जास्त आहे .पृथ्वीच्या तुलनेने फक्त 1.07 पटीने जास्त आहे.. कोणत्याही ग्रहाचे गुरुत...

पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आपल्याला जाणवत का नाही..???

  पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आपल्यावर लागू असते, मग ते गुरुत्वाकर्षण आपल्याला जाणवत का नाही..??? हा प्रश्न मला लहानपणी पडायचा आणि आपल्या पैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की , आपण ज्या पृथ्वीवर राहतो, त्या पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल  हे आपल्याला सतत खेचत असते, मग तसे आपल्याला सतत जाणवत का नाही..? गुरुत्वाकर्षण बल हे दोन वस्तूंचे "वस्तुमान" आणि त्यांच्यातील "अंतर" या दोन गोष्टीवर अवलंबून असते. पृथ्वीच्या तुलनेने आपण खूप लहान आहोत आणि आपले वस्तुमान पण खूप कमी आहे... आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहोत. तसेच, पृथ्वीच्या जवळील वातावरणात जरी असलो, तरी पृथ्वीच्या केंद्रातून आपल्यावर सतत गुरुत्वाकर्षण शक्ती द्वारे पृथ्वीकडे खेचले जाते...  पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल हे आपल्यावर स्थिर (constant) प्रकारे सतत लागू असते.आपला जन्म पण पृथ्वीच्या वातावरणात झाला आहे. आपण जे काही दैनदिन आयुष्यात करतो, त्यात गुरुत्वाकर्षण आपल्या सोबत सतत असते,कारण आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि वातावरणात असतो.. गंमत म्हणून सांगायचं झालं तर, "तुम्हाला तुमची गर्लफ्रेंड जरी सोडून गेली किंवा बायकोने जरी ...

डार्विन यांचा सिद्धांत

  डार्विन यांचा सिद्धांत "चार्ल्स डार्विन" यांचा सिद्धान्त आपण खूप सखोल समजून घेणे आवश्यक आहे.. डार्विन हे ब्रिटिश वैज्ञानिक संशोधक आणि विचारवंत होते.  यांचे काही प्रमुख उत्क्रांती (evolution)सिद्धान्त प्रसिद्ध आहेत.  १) नैसर्गिक निवड (Natural selection) 2) नवीन जातीची निर्मिती (The origin of new species) 3) सजीवांमध्ये संतानउत्पत्तीची प्रचंड क्षमता 4) सजीवांच्या अस्तित्वसाठी संघर्ष (struggle for existence) 5) विविधता आणि आनुवंशिकता  6) वातावरण मधील बदल नुसार सजीवांमध्ये परिवर्तन डार्विन यांनी निसर्गाला खूप सखोल निरीक्षण केले होते.. डार्विन च सिद्धान्त हे आजवर बहुतांश संशोधकांनी स्वीकारलेला सिद्धान्त आहेत.. निसर्ग हा प्राणी व वनस्पती यांना निर्माण करतो . त्यात विशिष्ट सजीव टिकतात मात्र काहीना निसर्गच स्वतः नष्ट करतो.. याच मोठे उदाहरण हे "डायनासोर"आहेत.. डायनासोर हे निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थिती समोर टिकले नाही.. डायनासोर नष्ट होऊन देखील जे सजीव पृथ्वीवर टिकले त्यांनी स्वतःला या निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीसमोर अनुकूल बनविले...तेच सजीव निसर्गात टिकले, ज्यांनी वाता...

आजही आपल्यात उत्क्रांती घडते आहे का ?

  डार्विनच्या सिद्धान्तनुसार आजही आपल्यात उत्क्रांती घडते आहे का ? लहानपणी अनेकदा मला हा प्रश्न पडायचा आणि कदाचित तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल. डार्विनचे सिद्धान्त नुसार , आपण सर्व आताचे सजीव व वनस्पती हे उत्क्रांती नुसार घडले आहोत. करोडो वर्षात प्राण्यांमध्ये निसर्गाला अनुरूप असे पिढीजात व सतत शारीरिक बदल होउन ,आजचे त्यांचे स्वरूप आहे. मग आजही ही उत्क्रांतीची प्रक्रिया घडत आहे..? काय उत्क्रांती (evolution) थांबली आहे ? उत्क्रांती ही चालू असेल तर माणसाचे भविष्यात स्वरूप काय असेल ?? मला स्वतःला असे वाटते आहे की  उत्क्रांती थांबलेली नाही. आजही आपल्यात उत्क्रांती घडत आहे. उत्क्रांती धीमी प्रक्रिया असते..आपल्या पूर्वी सुमारे 165 दशलक्ष (मिलियन) वर्ष पृथ्वीवर डायनासोर राहत होते. या प्रदीर्घ काळात डायनासोर मध्ये देखील बदल घडत होते..त्यांच्यात पण विभिन्न जाती होते.काळाच्या ओघात डायनासोर ची एक जात नष्ट होऊन दुसरी जात निर्माण होत होती.. 65 दशलक्ष वर्षापूर्वी जेव्हा पृथ्वीवर धूमकेतू आपटला तेव्हा डायनासोर हळू हळू नष्ट झाले. त्यापैकी जर काही उडणारे डायनासोर होते त्यांचे वंशज हे  "आ...

दृश्यमान प्रकाश (Visible light)

  दृश्यमान प्रकाश  (Visible light) ( भाग १)  आपण भौतिक शास्त्र (physics) आणि जीवशास्त्र (biology) यांच्या एकत्रित दृष्टीने "दृश्यमान प्रकाश" याला दोन भागात समजून घेणार आहोत. यात "प्रकाश" किरण चे स्वरूप कसे आहे आणि आपले डोळे  त्याला कसे पाहतात ,हे पाहूया..

ओपनहायमर

ओपनहायमर " ओपनहायमर" हा हॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हा लेख लिहीत आहे तोवर मी अजून सिनेमा पाहिलेला नाही. मात्र हा चित्रपट मी नक्की पाहेन. तुम्हीही चित्रपट पाहावा. ज्याचं फिजिक्स केमिस्ट्रीवर प्रेम आहे त्यांनी तर हा चित्रपट आवर्जून पाहावा.. "क्रिस्टोफर नोलन" हे या सिनेमा चे दिग्दर्शक आहेत. ऐतिहासिक दृष्टीने मी "रॉबर्ट ओपनहायमर " यांच्याबद्दल जे वाचन केले आहे, त्या आधारे मी हा लेख लिहित आहे. मात्र, चित्रपट मध्ये अजून बऱ्याच गोष्टींवर प्रकाश पडणार आहे असे वाटते म्हणून चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहेच. ओपनहायमर हे दुसऱ्या विश्वयुद्ध मधील अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्त्व होते. अमेरिकेने जपानच्या "हिरोशिमा" आणि "नागासाकी" या दोन शहरावर  अनुक्रमे "लिटल बॉय" व "फॅटमॅन" हे मानव इतिहासातील सर्वात नरसंहार करणारे असे दोन अणुबॉम्ब प्रथमच टाकले. त्या अणूबॉम्ब या तंत्रज्ञानाच्या निर्मिती मध्ये ओपनहायमर यांचे महत्वाचं योगदान होते. अणूबॉम्बच्या स्फोटनंतर त्यांनी "भगवतगीता" मधील एक वचन म्हटलेलं त्यावरही आपण बोलणार आहोत. या...

लँडर ला चंद्रावर उतरवणे कठीण काम..

 " चांद्रयान 3" चे लँडर ला चंद्रावर उतरवणे हे अतिशय कठीण गोष्ट आहे .  (18 जुलै 2023 चा लेख) 2019 ला जे "चांद्रयान २" जेव्हा चंद्रावर गेले होते तेव्हा यानाचे (लूनार मोड्युल) तीन मुख्य भाग होते. लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर. ऑर्बिटर हे चंद्रभोवती भ्रमण करत होते.  "लँडर" व त्यात असलेले "रोव्हर" हे भ्रमण करणाऱ्या ऑर्बिटर पासून वेगळे झाले होते.  लँडर ची "सॉफ्ट लँडिंग" [अलगद उतरवणे जेणेकरून महत्वाच्या उपकरणांना इजा पोहचू नये] करायची होती. मात्र, ते लँडर चंद्रावर जोरात आपटले आणि अपघातग्रस्त झाले होते. सॉफ्ट लँडिंग आणि हार्ड (क्रॅश)लँडिंग असे दोन प्रकारे कोणत्याही ग्रहावर "यान" उतरण्यात येत असते.  पूर्वीचे नासा चे अपोलो मिशन ने बरेच  क्रॅश लँडिंग केली होती. नंतर अमेरिका ही चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करायला शिकली. चीन ने तर पहिल्या प्रयत्नात सॉफ्ट लँडिंग केली होती.मात्र, आपल्याला दक्षिण ध्रुव जो चंद्राचा अंधार असलेला भाग आहे , तिथे सॉफ्ट लँडिंग करायची आहे..!!! चंद्र आणि मंगळ यात असा फरक आहे की, चंद्रावर वातावरण नाही, मात्र मंगळावर वातावरण आहे. ...

इसरो ने "चंद्रयान 3" का पाठवले ?

  इसरो ने "चंद्रयान 3" का पाठवले ? काल इसरो (ISRO) या भारतीय स्पेस संस्थेने "चांद्रयान 3 " मोहीम सुरू केली.आपण सर्वांनी थेट प्रक्षेपण पाहिले व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.. मात्र, काही लोक यावर ही टीका करत होते . त्यांच्या मते, 615 कोटी रुपये खर्च करून  चांद्रयान अवकाशात सोडायची काय आवश्यकता होती ?  चंद्रावर अमेरिकेने अपोलो मिशन अंतर्गत कित्येक मिशन पाठवले. त्यात "अपोलो 11" मिशन मध्ये अमेरिकेने पहिला माणूस 70 च्या दशकात चंद्रावर उतरवला होता..तर आता भारताला चांद्रयान अवकाशात पाठवण्याची आवश्यकता काय आहे ?? चला ते यावर थोडक्यात चर्चा करुया..  "डिपार्टमेंट ऑफ स्पेस" अंतर्गत हे अंतराळ संशोधन होत असते. अंतराळ संशोधन हे कोणताही देशाने करणे हे देशाच्या प्रगतीमध्ये महत्वाचं भाग असतो. जेवढं आधुनिक उपकरणे आपण आज  पृथ्वीवर वापरतो, ते बहुतांश उपकरणे हे "अंतराळ संशोधन " साठी बनवले गेले होते. फिजिक्स, गणित, भूमिती हे संपूर्ण सायन्स विभागाचा आधारस्तंभ आहे. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे पण फिजिक्स वर अवलंबून आहे. अशा अंतराळ मिशन मधून या शास्त्रामध्ये अ...

इसरो (ISRO) आणि चांद्रयान 3

 इसरो (ISRO) आणि चांद्रयान 3 इसरो (ISRO) ही भारताची स्पेस एजेन्सी असून 15 ऑगस्ट 1969 रोजी त्याची स्थापना झाली. सुरुवातीला INCOSPAR असे या "स्पेस एजेन्सी" चे नाव होते, नंतर बदलून इसरो (ISRO) असे करण्यात आले.. तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतात देखील स्पेस अजेन्सी असावी आणि भारताने देखील अंतराळात संशोधन करावे या हेतूने ही संस्था स्थापन करण्याचे निश्चित केले. भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली " स्पेस एजन्सी" स्थापन केली. त्यावेळी अमेरिका आणि रशिया (USSR तत्कालीन रशिया) यांच्या शीतयुद्ध मध्ये वैज्ञानिक स्पर्धा होती.  रशिया ने जगातील पहिले यान अंतराळात सोडले. त्यानंतर अमेरिका शांत राहणार न्हवती. त्यांनी चंद्रावर अपोलो मिशन अंतर्गत पहिला माणूस उतरवला. यादरम्यान भारताला ही या क्षेत्रात उतरावे असे वाटत होते. भारताने या दोन्ही देशातील स्पेस एजेन्सी च्या सहकार्यने अंतराळ संशोधन सुरू केले. जगात अमेरिका, रशिया, चीन, युरोपियन स्पेस एजन्सी आणि भारत हे आघाडीचे देश आहेत की त्यांनी आपले स्पेस मिशन यशस्वी केले आहेत.. आप...

सेमीकंडक्टरचा वापर ही आधुनिक डिजिटल क्रांती

  सेमीकंडक्टरचा वापर ही आधुनिक डिजिटल क्षेत्रातील सर्वात मोठी क्रांती आहे. . आपल्या मनात एक प्रश्न पडला असेल, की चीन, रशिया, दक्षिण कोरिया, हाँग काँग, ताइवान, अमेरिका, जपान हे देश "इलेक्ट्रिक उपकरणे आणि तंत्रज्ञान" बनवण्यामध्ये इतके आघाडीवर का असतात.. ?? याची बरीच कारणे आहेत. चीन हा देश सध्या स्वस्त इलेक्ट्रिक उपकरणे बनवण्यात आघाडीवर देश आहे. या विकसित देशातील शिक्षण पद्धती आपल्या देशापेक्षा खूप विकसित असल्याने तिथे " आधुनिक कौशल्य" (skill) असलेले कामगार निर्माण होतात.असे बरेच कारण आहे की ते देश   तंत्रज्ञान विकसित करू शकतात किंवा स्वतः बनवू शकतात..त्यातीलच एक कारण आहे हे देश "सेमीकंडक्टर" चे उत्पादक आणि निर्यातदार आहेत. आपण जितके आधुनिक विद्युत उपकरणे वापरतो उदा. स्मार्टफोन, कॉम्प्युटर , मेडिकल उपकरणे, एलइडी बल्ब, वॉशिंग मशीन, डिजिटल कॅमेरा सर्व इलेक्ट्रिक वस्तूमध्ये "सेमीकंडक्टर" वापरले असते. कॉम्प्युटर मध्ये जे प्रोसेसर आहे ते सेमीकंडक्टर पासून बनलेले असते. सेमीकंडक्टर चा वापर करून अगदी लहान "चीप" बनवून त्यावर "माहिती" साठव...

विद्युतधारा (electric Current) ही कशी प्रवाहित होते.?

  विद्युतधारा (electric Current) ही कशी प्रवाहित होते.? विजेशिवाय (Without Electricity) आपण आजच्या जगाची कल्पना ही करू शकत नाही. आपली सर्व उपकरणे ही विजेवर चालतात. जेव्हा पासून विजेचा शोध लागला माणसांचे आयुष्य बदलले. विजेचा शोध ही मानवी इतिहासातील सर्वात मोठी क्रांती आहे. आज आपण रोबोटिक क्रांतीकडे वाटचाल करत आहोत .मात्र ,विजेचा शोध हा संपूर्ण आपल्या वैज्ञानिक इतिहासातील क्रांतिकारक पाऊल ठरले होते.. आपण शास्त्रज्ञांचे आभारी असले पाहिजे की, ज्यांनी 17,18 आणि 19 व्या शतकात विजेचा शोध लावला. विशेषतः बेंजामिन फ्रँकलिन, मायकेल फॅरेडे , थॉमस एडिसन, निकोलस टेस्ला आणि इतर शास्त्रज्ञ यांचे मी आभार मानतो आणि लेखाला सुरुवात करतो. आपण आज पाहणार आहोत की ,वीज कोणत्या पायाभूत सिद्धांतवर काम करते..विद्युतद्यारा जी वाहते ती "इलेक्ट्रॉन " मुळे वाहते. काही दिवसापूर्वी मी लेख लिहिलं होता ,त्यात आकाशातून जमिनीवर जी वीज पडते त्या बद्दल सांगितले होते. त्या वीजमध्ये "ऋण प्रभार" (Negatively charge) असलेल्या भागातून "इलेक्ट्रॉन" हे "धन प्रभार"  (positively charge) असलेल्या...

आकाशातून वीज पडण्यामागील विज्ञान (lightning)

  आकाशातून वीज पडण्यामागील विज्ञान (lightning) पावसाळा सुरू झाला की आकाशातून वीज जमिनीवर पडणे ,विजेचा कडकडाट होणे आणि वीज चमकणे हे अनेकदा घडते. आकाशातून वीज जमिनीवर पडल्यामुळे बऱ्याच माणसांचा आणि प्राण्यांचा मृत्यू देखील होतो. चला तर आज जाणून घेवू , वीज पडण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे ? आणि आपण काय काळजी घ्यावी ?   आपण घरात जी वीज वापरतो ती 120 ते 240   वोल्ट (विद्युतदाब)ची वीज असते. भारतात 220 वोल्ट ची वीज असते.आपल्याकडे घरगुती वापरासाठी वीज येते ती "AC" या प्रकाराची वीज असते. आपण जे विजेचे छोटी उपकरणे वापरतो ज्यात "बॅटरी" असते, त्यात "DC " या  प्रकारची वीज असते. ( AC आणि DC मध्ये काय फरक आहे, हे आपण पुढील लेखात पाहू.) घरगुती वापरन्याचे विजेचे "वोल्ट" हे आकाशातील वीज च्या तुलनेने खूप कमी असते. तरीही आपल्याला विजेचा धक्का लागतो. मग आकाशातून येणारी वीज प्रचंड असली पाहिजे... समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन जेव्हा आकाशात ढग बनतात ,त्यातील पाणी हे थंड होत असते. जसे पाणी वाफ स्वरूपात वर जाते तसे ते थंड होऊन बर्फात रुपांतरीत होते.आकाशात जे ढग तयार होता...

भौतिकशास्त्र (फिजिक्स) हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे

  भौतिकशास्त्र (फिजिक्स) हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.. काही दिवसापूर्वी मी "क्वांटम फिजिक्स" वर माहिती लिहिली होती , तो लेख आपण वाचला असेलच.  "क्वांटम फिजिक्स" समजून घेताना आपण एक गोष्ट विसरता कामा नये, की "भौतिकशास्त्र" देखील एक सत्य आहे.. भौतिकशास्त्र  हे आपल्या जीवनाचा भाग आहे. क्वांटम फिजिक्स" हे जरी भौतिकशास्त्र पेक्षा वेगळे असले किंवा त्यांचे सिद्धांत वेगळे असले तरी ,ते मूळ "भौतिकशास्त्र" चाच भाग आहे..  फक्त फरक इतकाच आहे की , "भौतिकशास्त्र" हे स्थूल वस्तूवर लागू होते आणि  "क्वांटम फिजिक्स"  हा इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि त्याहून अतिसूक्ष्म कणाचा अभ्यास आहे व त्याचे नियम त्यावर लागू होतात..."क्वांटम फिजिक्स" मध्ये आपण पदार्थ चे सूक्ष्म स्वरूप हे "लहरी" आहेत, हे जाणून घेतले.. पण  आपण स्वतः स्थूल किंवा भौतिक जगात जगतो, म्हणून आपल्याला "भौतिकशास्त्र" चे नियम लागू होतात.  "क्वांटम फिजिक्स" नुसार कोणतीही वस्तू ही "पदार्थ " आणि "लहरी" या दोन्ही अवस्था मध्ये एका...

क्वांटम फिजिक्स" - एक अद्भुत शास्त्र

 क्वांटम फिजिक्स" - एक अद्भुत शास्त्र "क्वांटम फिजिक्स" मध्ये गेल्या काही दशकात प्रगत देशामध्ये खूप संशोधन झाले आहे. आपण शाळा कॉलेज मध्ये शिकलेल्या "भौतिकशास्त्र" पेक्षा "क्वांटम फिजिक्स" हे खूप वेगळे आहे. भौतिकशास्त्र मध्ये जे काही नियम लागू होतात, ते "क्वांटम फिजिक्स" च्या दुनियेत लागू होत नाही.. भौतिकशास्त्र हे स्थूल पदार्थवर आधारित आहे. स्थूल पदार्थ मग ते लहान पदार्थ असो की अगदी "महाकाय तारे", किंवा "ब्लॅक होल" असो ; भौतिकशास्त्र चे नियम त्यांना लागू होतात. सर न्यूटन यांचे गतिविषयक नियम आणि गुरुत्वाकर्षण चा नियम हे स्थूल पदार्थला लागू होतात. कोणतीही वस्तू जमिनीवर का पडते ? तर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे त्याच कारण हे सर्वांना माहीतच आहे. पृथ्वीवर वस्तू पडताना किती बल लागू होईल हे त्या वस्तूच्या वस्तुमान आणि त्या वस्तूचे पृथ्वीपासून चे अंतर यावर अवलंबून असते. हा नियम ब्रम्हांडात सर्वत्र लागू होतो. कोणत्याही खगोलीय वस्तूचे एक विशिष्ट गुरुत्व असते. ब्लॅकहोल चे गुरुत्व हे इतके जास्त असते की ते प्रकाशकिरण ला देखील आपल्याकडे ...

वेळ (time) हे ब्रम्हांडमध्ये समान नाही

  वेळ (time) हे ब्रम्हांडमध्ये समान नाही...(Time dilation theory)  आपल्याला माहीत की जगात "वेळ" ही एक अशी गोष्ट आहे, जी "एकमार्गी" असते.  "भूतकाळ ते भविष्यकाळ " असा वेळचा एकमार्गी प्रवास असतो. मात्र,ही वेळ अनंत पसरलेल्या ब्रम्हांडात "समान" नाही.. पृथ्वीवर जो "वेळ" चालला आहे, तोच "वेळ" दुसऱ्या दीर्घिका (galaxy) मध्ये इतर ग्रहावर देखील चालला आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.  यासाठीच आपल्याला आइन्स्टाईन यांची "स्पेशल थियरी ऑफ रेलेटीविटी" मधील "टाइम डायलेशन " हा सिद्धांत समजून घ्यावा लागेल... ही खूप किचकट संकल्पना आहे. मी तुम्हाला समजेल अशा भाषेत सोपे करुन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे..  "भौतिकशास्त्र " वर पूर्वी "सर न्यूटन" यांचा प्रभाव होता. त्यांच्या दृष्टीने "वेळ" ही जगात समान (constant) असणार ,असे मानले जात होते.अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी 1907 मध्ये "टाइम डायलेशन" हा सिद्धांत मांडला .या सिद्धान्तमुळे भौतिकशास्त्र चे दुनियेत खूप मोठा गोंधळ निर्माण झ...

माकड पासून माणूस निर्माण झाला आहे का ?

 "माकड पासून माणूस निर्माण झाला आहे" असे डार्विनने आपल्या सिद्धांतमध्ये अजिबात म्हटलेले नाही. काही लोक डार्विन सिद्धान्त खोटा आहे, असा प्रचार करतात..चिंपंझी, माकड, गोरिला हे माणूस का बनत नाहीत.? हा त्यांचा युक्तिवाद असतो डार्विन यांनी कुठंही असे म्हटलेलं नाही की ,माकड पासून माणूस बनला आहे.. उत्क्रांतीचा सिद्धांत नुसार आपण माकडपासून निर्माण झालो नाही, तर माणूस ,चिम्पाझी माकड ,वानर हे सर्व ज्याच्या पासून निर्माण झाले "तो आपला पूर्वज एक होता". " प्रायमेट्स " हे आपले 85 दशलक्ष वर्षापूर्वी आपले पूर्वज होते. प्रायमेट्सचे ही पूर्वज होते.. प्रायमेट्स हे वास्तविक सस्तन (mammal) प्राणी या प्रकारात येतात. डायनासोर हे अंडी देणारे होते. जेव्हा पृथ्वीवर धूमकेतू (asteroid) आपटला तेव्हा डायनासोर नष्ट झाले. तेव्हा सस्तन (mammal) प्राण्यांना पृथ्वीवर जगण्याची संधी मिळाली. डायनासोर चे उपस्थितीत सस्तन (mammal) प्राण्यांचे पूर्वज लपून होते. डायनासोर हे आज असते तर आपण मनुष्य च काय वाघ, माकड, हत्ती कोणीही कदाचित नसले असते. कारण या सर्व प्राणी जे आज दिसत आहेत त्यांचं उत्क्रांती ड...