इसरो ने "चंद्रयान 3" का पाठवले ?
काल इसरो (ISRO) या भारतीय स्पेस संस्थेने "चांद्रयान 3 " मोहीम सुरू केली.आपण सर्वांनी थेट प्रक्षेपण पाहिले व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.. मात्र, काही लोक यावर ही टीका करत होते . त्यांच्या मते, 615 कोटी रुपये खर्च करून चांद्रयान अवकाशात सोडायची काय आवश्यकता होती ? चंद्रावर अमेरिकेने अपोलो मिशन अंतर्गत कित्येक मिशन पाठवले. त्यात "अपोलो 11" मिशन मध्ये अमेरिकेने पहिला माणूस 70 च्या दशकात चंद्रावर उतरवला होता..तर आता भारताला चांद्रयान अवकाशात पाठवण्याची आवश्यकता काय आहे ?? चला ते यावर थोडक्यात चर्चा करुया..
"डिपार्टमेंट ऑफ स्पेस" अंतर्गत हे अंतराळ संशोधन होत असते. अंतराळ संशोधन हे कोणताही देशाने करणे हे देशाच्या प्रगतीमध्ये महत्वाचं भाग असतो. जेवढं आधुनिक उपकरणे आपण आज पृथ्वीवर वापरतो, ते बहुतांश उपकरणे हे "अंतराळ संशोधन " साठी बनवले गेले होते. फिजिक्स, गणित, भूमिती हे संपूर्ण सायन्स विभागाचा आधारस्तंभ आहे. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे पण फिजिक्स वर अवलंबून आहे. अशा अंतराळ मिशन मधून या शास्त्रामध्ये अजून प्रगती होत असते आणि नवीन गोष्टी आपल्याला समजत असतात.
चंद्र हा आपल्या पृथ्वीचा एकमेव उपग्रह असून पृथ्वीच्या आणि सौरमलेच्या निर्मितीपासून तो अस्तित्वात आहे . त्यामुळे चंद्रबद्दल अजून जाणून घेणे, हे "पृथ्वी आणि सूर्यमाला" यांच्या निर्मितीमधील बरेच प्रश्न सोडवेल. चंद्राच्या दक्षिण भागात अजून कोणतेही यान पोहचले नाही म्हणून देखील आपला हा प्रयत्न आहे .चंद्राचा दक्षिण अंधाऱ्या भागात जे पाण्याचे साठे सापडले ,ते पण प्राचीन पाणी आहे. तेथील हायड्रोजन , इतर मूलद्रव्य व रासायनिक बनावटी आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. चंदावरील माती ही पृथ्वीवरील माती पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. चंद्रावर जर भूकंप (moonquake )होत असतील तर त्यावर संशोधन होणे आवश्यक आहे. भूकंप होत असतील चंद्राच्या आतमध्ये देखील गरम लाव्हा असू शकतो, ही गोष्ट आपल्या पृथ्वीशी समान आढळू शकते. पृथ्वीच्या निर्मिती वेळची जी "थिया" या ग्रहाची आदळण्याची परिकल्पना आहे त्याचे कोड पण सुटेल. चंद्रावर वातावरण नाही म्हणून सूर्याची अतिनील किरणे तिथे थेट येतात, तस आपल्या पृथ्वीवर घडत नाही..सूर्याच्या अतिनील किरणांवर पण संशोधन आपण चंद्रावरून करू शकतो.अशी बरीच संशोधने चंद्रावर होणे आवश्यक आहे..म्हणून कोणत्याही देशाचे चांद्रयान मिशन हे इतर मिशन इतकचं महत्वाचं मानले जाते.
भारत हा यामद्ये मागे असता कामा नये असे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू याना पण वाटत होते. म्हणून तर "इसरो" ची निर्मिती विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वात 1969 साली झाली. 2008 साली पहिले चद्रयान पाठवले होते ,तेव्हा मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. 2014 साली दुसरे चांद्रयान हे रशियाच्या मदतीने पूर्ण होनार होते मात्र रशियाला "लँडर" बनवताना अडचणी आल्या म्हणून आपण स्वतः लँडर बनवून अवकाशयान "चांद्रयान 2" हे 2019 ला पाठवले. आपण स्वतः लँडर बनवणे ही एक महत्वाची गोष्ट आहे.
"चांद्रयान 2" मध्ये काही चुका झाल्या होत्या,ज्यामुळे लँडिंग करताना आपले "विक्रम लँडर" हे अपघातग्रस्त झाले. "चंद्रयान 2 " मध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोवर असे तीन प्रमुख मोडुल भाग होते. आपला फक्त "लँडर आणि रोवर" हे अपघातग्रस्त झाले. यामुळे अपूर्ण राहिलेलं मिशन पूर्ण करण्यासाठी चांद्रयान 3 ला पाठवणे आवश्यक होते. यात आपण यात "प्रोपलजन मोडुल" सोबत "लँडर आणि रोवर" पाठवले आहेत. "चांद्रयान 2" हे लँडिंग करण्यात अपयशी झाले असेल तरीही "ऑर्बिटर" आजही चंद्रभोवती फिरतो आहे. चांद्रयान 2 मध्ये "विक्रम लँडर" ला लँडिंग करताना वेळी झालेल्या चुका आपण "चांद्रयान 3" मध्ये दुरुस्त केल्या आहेत.. चंद्रावर दोन प्रकारे उतरता येते. एक "सॉफ्ट लँडिंग" आणि दुसरे "हार्ड लँडिंग". अमेरिका , रशिया आणि चीन यांनी सॉफ्ट लँडिंग केली आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणे हे खूप कठीण काम आहे. मंगळवर अलगद उतरणे आणि चंद्रावर अलगद उतरणे यात फरक आहे. मंगळवर उतरणे सोपे आहे. चंद्रावर उतरणे कठीण आहे कारण इथे वातावरण नाही. त्यामुळे पराशुट ने आपण इथे उतरू शकत नाही. आता हे "चंद्रयान 3" कसे लँडिंग करेल , सॉफ्ट लँडिंग आणि हार्ड लँडिंग कटी असते ,यावर आपण पुढच्या लेखात पाहू....
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment