Skip to main content

Posts

Showing posts with the label economics

INTRODUCTION

  Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language).   I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students  or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts  " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning "  on different things in the people of India. Thank you

कॅश मार्केट आणि डेरीव्हेटिव मार्केट

 कॅश मार्केट आणि डेरीव्हेटिव मार्केट "स्टॉक मार्केट" मध्ये हे दोन प्रमुख प्रकार असतात..आज आपण त्याबद्दल थोडक्यात समजून घेऊ. पण एक गोष्ट लक्षात घेतले पाहिजे, की हे खूप बेसिक ज्ञान आहे.. स्टॉक मार्केटचे सखोल अभ्यास आणि त्यात एक्स्पर्ट असल्याशिवाय मार्केट मध्ये कोणीही कोणतीही गुंतवणूक करू नये. "शेअर मार्केट" मध्ये लोक हे कंपनीचे "शेअर" खरेदी करतात.. ते शेअर खरेदी करण्यासाठी लागणारी गुंतवणूक ही कंपनीला मिळणारे "भांडवल" असते. मागील लेखात, ipo संदर्भातील मी सांगितले की कशाप्रकारे एक कंपनी ही शेअर मार्केट मध्ये "लिस्ट" होते.. कंपनीच्या शेअरचे जे "भाव" असतात, ते भाव खरेदीदार (buyer) आणि विक्रेता (seller) यामध्ये कमी जास्त होत असतात..खरेदी करणारे लोक हे शेअर चे भाव वाढवतात आणि विक्री करणारे लोक हे शेअर चे भाव कमी करतात.. मागणी आणि पुरवठा या अर्थशास्त्रच्या सिद्धांतवर मार्केट काम करत असते.  कॅश मार्केट -  जे नॉर्मल शेअर मार्केट असते, जिथे एखाद्या कंपनीचे शेअरचा भाव चालू आहे , आपण त्या चालू किमतीला पूर्ण रक्कम भरून "शेअर "खरेदी...

वायदा बाजार थोडक्यात ओळख

 वायदा बाजार थोडक्यात ओळख  आपण बातमी चॅनलवर हे ऐकले असेलच की आज "सेन्सेक्स" व  "निफ्टी"  चे भाव इतका घसरला आणि "वायदा किंवा सौदा बाजार" मध्ये अशा पद्धतीने उलाढाल झाली आहे.. वगैरे ....हा "वायदा बाजार" काय आहे ? "वायदा बाजार" हे एका लेखात सांगणे कठीण आहे आणि तुम्ही ते समजून घेणे देखील कठीण आहे. अनेकांच्या डोक्यावरून जाईल. पण या बाजाराची थोडक्यात ओळख करता येईल. मागे हिंडेनबर्ग संस्थेने अदानी चे "शॉर्ट सेल" केले होते त्यावर मी लेख लिहला होता. तेव्हा काही वाचकानी मला प्रश्न विचारला होता की "सौदा बाजार" हा प्रकार असतो ?  म्हणून हा लेख लिहीत आहे.  कोणत्याही सामान्य मार्केट मध्ये एक "वस्तू" असते, ज्याची खरेदी किंवा विक्री होत असते. शेअर मार्केट मध्ये कंपनीचे "शेअर" किंवा "इक्विटी" ही वस्तू असते. "स्टॉक"चा भाव वाढला की तुमची त्यातील गुंतवणूक देखील वाढते व तुम्हाला नफा होतो. स्टॉक च भाव उतरला तर तुम्हाला तोटा होतो. तसेच, जेव्हा तुम्हाला वाटते की या कंपनीचे  "शेअर" चे भाव उतरणार...

स्टॉक मार्केट - थोडक्यात ओळख

  स्टॉक मार्केट - थोडक्यात ओळख आज आपण "शेअर मार्केट" ची थोडक्यात ओळख पाहणार आहोत. शेअर मार्केट काय आहे ? स्टॉक , इक्विटी, शेअर हे काय असते ? गुंतवणूक चे कोणते प्रमुख प्रकार आहेत ? शेअर मार्केट चे काही सकारात्मक बाजू आहेत तसे नकारात्मक (Dark side)पण बाजू आहे. पण त्या बद्दल पुढच्या लेखात लिहेन. जे "शेअर मार्केट" मध्ये नवीन लोक आहेत किंवा ज्यांना शेअर मार्केट बद्दल अर्धवट ज्ञान आहे किंवा ज्यांना कुतूहल म्हणून या विषयाबद्दल जाणून घ्यायचे आहे, त्या सर्वांनी हा लेख वाचावा.. "शेअर मार्केट" कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे शिखर आहे. देशाच्या अर्थव्यवस्था मध्ये उद्योग आणि व्यापार चे महत्वाचं स्थान असते. जेव्हा नवीन उद्योग निर्माण होतो तेव्हा देशात रोजगार आणि साधनसंपत्ती निर्माण होते. उद्योगामुळे देशांतर्गत उत्पादन आणि परदेशी गुंतवणूक वाढते.. या मोठ्या उद्योगांना त्यांचे प्रकल्प करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल लागते. हे भांडवल अब्जावधी रुपयांचे असते. हे भांडवल कुठून उभे करतात ? एवढे पैसे कोणतीही बँक लोन स्वरूपात देऊ शकत नाही. त्या कंपनी कडे स्वतःच भांडवल , प्रोम...

स्टॉक (शेअर) मार्केट ची थोडक्यात ओळख....

 स्टॉक (शेअर) मार्केट ची थोडक्यात ओळख.... आपला मराठी माणूस स्टॉकमार्केट पासून दूर राहतो कारण एकतर "स्टॉक मार्केट" च किचकट अभ्यास करण्याची मानसिकता नसते आणि दुसरे म्हणजे स्टॉक मार्केट हा "जुगार " आहे , अशी आपल्या मनात पक्की धारणा बनली आहे. इतर राज्यात पण हीच स्थिती आहे पण आपल्या महाराष्ट्रात मुंबईत स्टॉक मार्केट चा समुद्र असताना आपण त्याला नकारात्मक दृष्टीने पाहतो.. हे आश्चर्य...स्टॉक मार्केट जुगार नाही, तर 90 % लोक अभ्यास न करता मार्केट मध्ये उतरत असल्याने त्यांचा तोटा होतो आणि ते मार्केट ला जुगार समजतात...मार्केट हे "सौदागर " लोकांचे क्षेत्र आहे ..जे शांत मनाने कोणतेही सौदे करण्यात खूप चलाख असतात आणि ज्यांना मार्केट चे सखोल ज्ञान घेतले आहे, हे त्यांचे क्षेत्र आहे.. जे "ब्रोकर किंवा mutual fund " च ऑफिस मध्ये काम करतात त्यातील बहुतेकांना पण मार्केट चा सखोल अभ्यास अजिबात नसतो.. मार्केट हे मायावी जग आणि भुलभुलया आहे, सामान्य बुद्धीने ते समजत नाही. ज्या क्षेत्रात अब्जावधी रुपयांची उलाढाल चालते ते क्षेत्र इतके सोपे असेल ,असे वाटत का ???? चला तर ...