कॅश मार्केट आणि डेरीव्हेटिव मार्केट
"स्टॉक मार्केट" मध्ये हे दोन प्रमुख प्रकार असतात..आज आपण त्याबद्दल थोडक्यात समजून घेऊ. पण एक गोष्ट लक्षात घेतले पाहिजे, की हे खूप बेसिक ज्ञान आहे.. स्टॉक मार्केटचे सखोल अभ्यास आणि त्यात एक्स्पर्ट असल्याशिवाय मार्केट मध्ये कोणीही कोणतीही गुंतवणूक करू नये.
"शेअर मार्केट" मध्ये लोक हे कंपनीचे "शेअर" खरेदी करतात.. ते शेअर खरेदी करण्यासाठी लागणारी गुंतवणूक ही कंपनीला मिळणारे "भांडवल" असते. मागील लेखात, ipo संदर्भातील मी सांगितले की कशाप्रकारे एक कंपनी ही शेअर मार्केट मध्ये "लिस्ट" होते.. कंपनीच्या शेअरचे जे "भाव" असतात, ते भाव खरेदीदार (buyer) आणि विक्रेता (seller) यामध्ये कमी जास्त होत असतात..खरेदी करणारे लोक हे शेअर चे भाव वाढवतात आणि विक्री करणारे लोक हे शेअर चे भाव कमी करतात.. मागणी आणि पुरवठा या अर्थशास्त्रच्या सिद्धांतवर मार्केट काम करत असते.
कॅश मार्केट -
जे नॉर्मल शेअर मार्केट असते, जिथे एखाद्या कंपनीचे शेअरचा भाव चालू आहे , आपण त्या चालू किमतीला पूर्ण रक्कम भरून "शेअर "खरेदी करतो, म्हणजे त्या शेअर चा ताबा (ownership) घेतो,त्याला "कॅश मार्केट" म्हणतात.. समजा, xyz कंपनीचा शेअर चा भाव हा 200 रुपये चालू आहे, तर कितीही स्टॉक आणि कितीही दिवसासाठी खरेदी करायचा असेल, तरी त्याची तुम्हाला पूर्ण रक्कम भरावी लागेल.म्हणजे जर एखाद्याला 200 रुपयाचे 10 स्टॉक खरेदी करायचे आहेत, तर त्याला 2000 रुपये पूर्ण रक्कम भरावी लागेल . फक्त "एक दिवसासाठी ट्रेडिंग पद्धत" (intraday) मध्ये आपल्याला "लेवरेज" मिळते, तिथे पूर्ण रक्कम भरायची गरज नसते..
कॅश मार्केट मध्ये तुम्हाला शेअरचा त्वरित ताबा मिळतो, इथे भविष्यातील कॉन्ट्रॅक्ट नसते....
डेरीव्हेटिव मार्केट -
आता, "डेरीव्हेटिव मार्केट" काय असते? "डेरीव्हेटिव मार्केट" हे मूळ "स्टॉक मार्केट" वर अवलंबून असे मार्केट असते. आपल्याकडे "फ्युचर" आणि "ऑप्शन" असे दोन डेरीव्हेटिव प्रकार चालतात. फॉरवर्ड आणि स्वॅप हे प्रकार आपल्याकडे नाहीत.. फ्युचर आणि ऑप्शन ला कॉन्ट्रॅक्ट/ सौदा/ वायदा बाजार पण म्हणतात. यात कॉन्ट्रॅक्ट हे खरेदी-विक्री केले जातात, म्हणून याला "कॉन्ट्रॅक्ट बाजार" देखील म्हणतात.
शेअरचे भाव हे आज विशिष्ठ किमतीला चालू आहे. भविष्यात ती किंमत वाढू शकते ! किंवा कमी होऊ शकते..! भविष्यात काय होईल कोणाला माहीत ?? आपण अंदाज व अभ्यास करू शकतो..एक्सचेंजकडून भविष्यातील भावाचे "कॉन्ट्रॅक्ट" ठरवलेले असतात...या कॉन्ट्रॅक्ट ला "खरेदीदार" आणि "विक्रेता" हे त्यांच्या अंदाज किंवा अभ्यास प्रमाणे खरेदी किंवा विक्री करतात.. फ्युचर आणि ऑप्शन या दोन्हीमध्ये हे "कॉन्ट्रॅक्ट" असतात, यात तुम्ही आपल्या मर्जीप्रमाणे कसेही "शेअर" खरेदी करू शकत नाही. तर यात काही शेअरचे "लॉट" बनवलेले असतात. उदा. रिलायन्स चा भाव 2900 चालू आहे , "ऑप्शन" बाजारात मला रिलायन्स खरेदी करायचे असेल,तर 1,2, 5, 10 ,100 असे शेअर खरेदी करून चालणार नाही. "रिलायन्स" चा 250 शेअर चा एक "लॉट" आहे, आपल्याला तो "लॉट" खरेदी करावा लागेल. "फ्युचर मार्केट" मध्ये आपल्याला काही टक्केवारी रक्कम "मार्जिन" म्हणून भरावी लागते आणि "ऑप्शन" खरेदी करताना प्रीमियमची पूर्ण रक्कम भरावी लागते..
डेरीव्हेटिव मार्केटचे अनेक फायदे असतात.त्यातील एक फायदा म्हणजे तुम्ही "कोसळत्या मार्केट" मध्ये खरेदी-विक्री करू शकता, जे कॅश मार्केट मध्ये शक्य नसते..तसेच, कमी किमतीमध्ये जास्त शेअर खरेदी करू शकता. कारण इथे लॉट मध्ये हिशोब असतो .. पण हा अभ्यासाशिवाय तुम्ही उतरलात ते हे प्रकार धोकादायक आहेत..फ्युचर आणि ऑप्शनवर एक स्वतंत्र लेख लिहेन..
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment