Skip to main content

Posts

Showing posts with the label Geography

INTRODUCTION

  Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language).   I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students  or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts  " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning "  on different things in the people of India. Thank you

हबीटेबल झोन - ग्रहाची विशिष्ठ कक्षा

  हबीटेबल झोन (habitable zone) - ग्रहाची विशिष्ठ कक्षा आपली पृथ्वी ही सौर मालेतील विशिष्ट ग्रह आहे. पृथ्वीवर जीवसृष्टी का आहे ? सौर मालेतील इतर ग्रहवर जीवसृष्टी का नाही ? याच उत्तर आहे , पृथ्वीची सूर्याभोवती ची विशिष्ट कक्षा, ज्याला 'हबीटेबल झोन (habitable zone)" असे म्हणतात. शुक्र हा ग्रह साधारण आपल्या पृथ्वी एवढं आकारमान ने आहे.मात्र सूर्य पासून जवळच्या अंतरावर तो भ्रमण करत असल्याने  ती "हबीटेबल झोन" मध्ये नाही. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे, आपण तिथे एक मिनिट देखील जिवंत राहू शकत नाही.. मंगळ ग्रह देखील ग्रह "हबीटेबल झोन" मध्ये नाही.  मात्र थोडेसे बदल करून मंगळावर आपण राहू शकतो.. एलोन मस्क आणि नासा यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहेत, मात्र मंगळ वर आपली तात्पुरता सोय होऊ शकते. पण सूर्य सोडून इतर ताऱ्या भोवती फिरणाऱ्या ग्रह मध्ये आपल्याला हबीटेबल झोन" मधील ग्रह (exoplanet) शोधावा लागेल. आपली पृथ्वी ही आपल्यास फार काळ राहण्यास उपयुक्त ठरणार नाही.. मानव सृष्टी ही जिवंत ठेवायची असेल तर आता पासून आपल्याला पृथ्वी सारखा ग्रह शोधावा लागेल.. पृथ्वी वर जीवन आहे ...

भूकंपाची कारणे

  भूकंपची (Earthquake) कारणे काय आहेत ? आज (6 feb 2023) तुर्की ( टर्की, तुर्कस्थान Turkey) या देशात 7.8 क्षमतेचा भूकंप झाला. या भुकंपचे कारण हे आहे की , "अरेबियन प्लेट" ही "अँटनियन प्लेट" ला ढकलल्याने "अँटनियन प्लेट" ही "युरेशियन प्लेट " वर आदळली आणि त्यामुळे भूकंप झालं. अशी जगात अनेक ठिकाणी भूकंप होत असतात. पृथ्वीवरील काही ठिकाणे ही भूकंप क्षेत्रे आहेत. भारतात ईशान्य भारत, हिमालय आणि काश्मीर हा जास्त क्षमतेचा भूकंप प्रदेश आहे. चिली,अल्साका, जपान, इंडोनेशिया इथे मोठे भूकंप घडले आहेत.. पृथ्वीचा पृष्ठभाग हा एक कवच आहे आणि ते कवच साधारण 100 ते 200 किमी आहे.या कवचला "लिथोस्फेर" म्हणतात. आपले पर्वत ,डोंगर, तलाव, महासागर, नद्या सर्व काही या कवच वरच आहे. हा कवच सलग नाही आहे तर तो विभाजित आहे..याला "टेक्टॉनिक प्लेट " अस म्हणतात .जसे की आफ्रिकन प्लेट, युरेशियन प्लेट, इंडियन प्लेट, नॉर्थ अमेरिकन प्लेट, साऊथ अमेरिकन, अंतर्टिका प्लेट , ऑस्ट्रेलियन प्लेट, पॅसिफिक प्लेट हे पृथ्वीवरील मोठे प्लेट आहेत  आणि या सोबत काही लहान प्लेट पण आहेत. हे ...

पृथ्वीच्या गर्भात "नर्क" आहे

  पृथ्वीच्या गर्भात "नर्क" आहे... आपली पृथ्वी ही आपल्याला बाहेरून शांत व सुंदर वाटते ,पण ती वास्तविक आतून अजिबात शांत नाही.. पृथ्वीच्या गर्भात किंवा अंतरंगात ती इतकी उष्ण व गरम आहे की एका क्षणात ती आपल्याला नष्ट करू शकते... ज्वालामुखी तून येणारा लाव्हारस हा फक्त झलक आहे..  आपण पृथ्वीच्या गर्भात जाऊच शकत नाही फक्त आपल्याकडे असलेल्या यंत्रणा ने आपण त्यांचा अभ्यास करू शकतो..आपण आपल्या सौरमालेच्या बाहेर अजून गेलो नाही. आपले "Voyager" यान आपण "सौर मालेच्या" बाहेर अनंताच्या प्रवास साठी सोडले आहेत..आपण जितकी माहिती आकाशबद्दल जाणून घेतली आहे, ती बहुतांश "हबल" दुर्बीण मुळे आणि आता "जेम्स वेब" मुळे जाणू शकलो आणि शकतो आहोत.  पण यात आपण आपल्या पृथ्वी बद्दल कितपत जाणतो आहोत ?? म्हणजे आपल्या पृथ्वीची निर्मिती कशी झाली ? पृथ्वीच्या गर्भात आहे काय ? भूकंप आणि ज्वालामुखी का घडतात? आपल्या पृथ्वीच्या भोवती चुंबकीय तरंग का आहे ? असे बरेच पृथ्वी संबंधित गोष्टी आहेत जे मानवाने जाणले आहे आणि अजून जाणणे आवश्यक आहे.. आपली पृथ्वी ही 4. 5 अब्ज वर्षपुर्वी निर्मित ...

राहू केतू - लूनार नोड

 राहू केतू (Lunar Node) राहू (North node) व केतू (South node) हे काय असतात , हे समजून घेण्या अगोदर मी एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट करतो की , हा लेख "भारतीय-ग्रीक खगोलीय भूमिती" वर आधारित आहे. राहू केतू म्हटले की, अनेकांच्या डोळ्यासमोर फलज्योतिष येते. प्राचीन काळात दुर्बिणी च विकास झाला न्हवता, त्यावेळी भारत ,ग्रीक, इजिप्त, चीन अशा प्राचीन संस्कृतीमध्ये तत्कालीन खगोलतज्ञ हे गणित आणि भूमिती द्वारे आकाशाचे निरीक्षण करत असत. राशी, नक्षत्र, नक्षत्रवर रात्री दिशा ओळखणे, ताऱ्यांचे निरीक्षण हे प्राचीन भारत-ग्रीक पद्धतीत होत असे. "खगोलीय गणित शास्त्र" आणि फळज्योतिष हे वेगळे प्रकार आहेत.. फलजोतिष हे खगोलवर आधारित आहे. त्यात विशिष्ट ग्रह , नक्षत्र, ग्रहांची युती याचा मानवी जीवनावर परिणाम होतो, असे जिथे मानण्यात येते, तिथे फलज्योतिष हे सुरू होते. त्या अगोदर सर्व खगोलगणित च असते. मी देखील आकाशाचे निरीक्षण करताना राशी नक्षत्रचा  वापर करून एखादा तारा चे स्थान अचूक शोधतो.. हल्ली काही सॉफ्टवेअर निघाले आहे त्याची पण मी मदत घेतो. शेवटी प्राचीन गोष्टी या प्राचीन आहे आणि मॉडर्न सायन्स हे आध...

आपली पृथ्वी ही गोल नाही

  आपली पृथ्वी ही गोल नाही आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की ,आपली पृथ्वी गोल आहे. आपण लहानपणी शाळेत पण हेच शिकलो आहे. आपण निळ्या पृथ्वीचे फोटो देखील गोलाकारच पाहिले आहे. पण वास्तव सत्य हे आहे की ,पृथ्वी ही गोल नाही.. थांबा !! थांबा !! मी धार्मिक अंगाने काहीतरी पृथ्वीला "सपाट" (flat) वगैरे म्हणनार नाही... बरं का !!😀 आपल्या पृथ्वीचा खरा आकार हा "तंतोतंत गोल" नाही, असे मला सांगायचे आहे.. आपल्या पृथ्वीचा आकार हा वास्तविक "ओबडधोबड" आहे. पृथ्वीच्या या आकाराला "जिओड"(Geoid) असे म्हणतात. पृथ्वीचा आकार हा सर्वत्र समान नाही.  उंच पर्वतरांगा आणि  खोल समुद्र  या पृथ्वीवर आहे , तर पृथ्वी गोल असू शकते का ? साधा विचार करा.... हिमालयात "माउंट एव्हरेस्ट"  चे सर्वात उंच शिखर आणि प्रशांत महासागर (Pacific Ocean) मधील "मरियाना ट्रेंच" ही समुद्रातील सर्वात खोल दरी ,अशा प्रकारे दोन विरूद्ध टोक हे पृथ्वीवर आहेत. काही ठिकाणी दबलेली सखल तर काही ठिकाणी उंचवटा अशी ही पृथ्वी आहे, म्हणून यावर सखल भागात महाकाय समुद्र राहिले आहेत. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण (gra...