पृथ्वीच्या गर्भात "नर्क" आहे...
आपली पृथ्वी ही आपल्याला बाहेरून शांत व सुंदर वाटते ,पण ती वास्तविक आतून अजिबात शांत नाही.. पृथ्वीच्या गर्भात किंवा अंतरंगात ती इतकी उष्ण व गरम आहे की एका क्षणात ती आपल्याला नष्ट करू शकते... ज्वालामुखी तून येणारा लाव्हारस हा फक्त झलक आहे.. आपण पृथ्वीच्या गर्भात जाऊच शकत नाही फक्त आपल्याकडे असलेल्या यंत्रणा ने आपण त्यांचा अभ्यास करू शकतो..आपण आपल्या सौरमालेच्या बाहेर अजून गेलो नाही. आपले "Voyager" यान आपण "सौर मालेच्या" बाहेर अनंताच्या प्रवास साठी सोडले आहेत..आपण जितकी माहिती आकाशबद्दल जाणून घेतली आहे, ती बहुतांश "हबल" दुर्बीण मुळे आणि आता "जेम्स वेब" मुळे जाणू शकलो आणि शकतो आहोत. पण यात आपण आपल्या पृथ्वी बद्दल कितपत जाणतो आहोत ?? म्हणजे आपल्या पृथ्वीची निर्मिती कशी झाली ? पृथ्वीच्या गर्भात आहे काय ? भूकंप आणि ज्वालामुखी का घडतात? आपल्या पृथ्वीच्या भोवती चुंबकीय तरंग का आहे ? असे बरेच पृथ्वी संबंधित गोष्टी आहेत जे मानवाने जाणले आहे आणि अजून जाणणे आवश्यक आहे..
आपली पृथ्वी ही 4. 5 अब्ज वर्षपुर्वी निर्मित झाली असून, तेव्हा पृथ्वी जशी आज आहे तशी अजिबात न्हवती. तर पृथ्वी ही आगीचा गोळा होती. पृथ्वीचं न्हवे पृथ्वीचे इतर भावंडं म्हणजे बुध, शुक्र, मंगल, गुरू, शनी, युरेनस ,नेपच्यून आणि इतर लघुग्रह अस्टरोईड हे पण एका विशाल आगीचा भाग होते. आपली सौरमाला हे एका महाकाय " नेबूला " पासून बनले आहे. ज्याला "सोलर नेबुला" म्हणतात. हायड्रोजन आणि हेलियम हे मोठ्या प्रमाणावर जमा होऊन या नेबुलाच्या केंद्राशी प्रचंड "दाब" आणि उष्णता निर्माण होऊन आपला सुर्य तयार झाला आहे. सूर्याभोवती जे ग्रह फिरतात ते उर्वरित घटक हे या विशाल "सोलर नेबुळा" मध्ये एकमेकांवर आदलून तयार झाले आहेत, अशी परिकल्पना (hypothesis) आहे.
सूर्य ची निर्मिती वेळी आपली सौरमला तर अजिबात शांत न्हवती मात्र इतर ग्रह देखील शांत न्हवते. वर उल्लेख केल्याप्रमाणे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी देखील आगीचा गोळा होती. पृथ्वीवर ठोस जमीन न्हवती . वातावरण , चुंबकीय वलय आणि "ओझोन थर" असे काही न्हवते. सातत्याने पृथ्वीवर अस्टरॉइड च मारा होत असे. पृथ्वी ही हळू हळू थंड होऊन तिची उष्णता ही पृथ्वीचा गर्भात जाऊन आपल्या समोर थंड पृथ्वी आहे. पण गर्भात पृथ्वीचा केंद्र हा बहुतांश लोह आणि निकेल पासून बनला आहे. "केंद्र" हा "स्थायु लोह" पासून तर "केंद्राचे बाह्य आवरण" हे "द्रव लोह" पासून बनले आहे. केंद्राचे तापमान जवळ जवळ 5000 ते 7000 डिग्री सेल्सिअस इतके प्रचंड उष्ण आहे. ज्वालामुखी मध्ये लाव्हारस ( magma) जो बाहेर येतो तो 1000 ते 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतो. लाव्हारस हा मेंटल (mantle) या केंद्राच्या बाहेरील द्रव अवरणपासून येतो..तोच 1000 ते 1500 डिग्री सेल्सिअस असतो.. मग विचार करा, की जितक पृथ्वीचे गर्भात खोलवर जाऊ तितकं "दाब" पण वाढेल आणि तापमान पण वाढेल की नाही !!! ???साहजिकच तापमान अधिक असणार.. सांगायचं मुद्दा असा की पृथ्वीच्या गर्भ हे अशांत आणि उष्णतेने भरले आहे. पृथ्वीचा फक्त पृष्ठभाग (crust) जो 100 ते 200 किमी जाडीचा आहे तोच शांत आहे, पण पृथ्वीच्या गर्भात "नर्क" आहे. भूकंप आणि ज्वालामुखी हे फक्त या अशांतता चा छोटासा अंश आहे.
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment