सेक्स करताना लिंग ताठ न होण्याची कारणे काय ? (Erectile Dysfunction)
पुरुषांमध्ये लिंग (शिश्न) ताठ होण्यामध्ये समस्या....
सेक्स करताना नॉर्मली पुरुषांमध्ये काम उत्तेजना निर्माण होऊन लिंग ताठ होते. मात्र, काही पुरुषांमध्ये लिंग (penis) ताठरता होण्यासंदर्भात समस्या निर्माण होतात.. काही पुरुषांचे लिंग (शिश्न) ताठ होत नाही . काही पुरुषांचे शिश्न ताठ होते मात्र तर जास्त वेळ ताठरता टिकत नाही त्यामुळे स्त्रीच्या योनी (vagina) मध्ये घुसवताना समस्या निर्माण होते..काही पुरुषांचे लिंग ताठ होते,योनी मध्ये घुसवल्यावर जास्त वेळ लिंग ताठ राहत नाही..म्हणून सेक्स चा आनंद दोघानाही घेता येत नाही... यामुळे पुरुषांचा मनात एक नकारात्मक आणि लाजिरवाणा दृष्टिकोन निर्माण होतो. स्त्रीला देखील असमाधान वाटल्याने दोघांच्या नात्यामध्ये दुरावा उत्पन्न होते..
ही समस्या का निर्माण होते.. ?
सामान्यतः याची दोन प्रमुख कारणे आहे.
एक शारीरिक व दुसरे मानसिक कारण आहे..
शारीरिक कारण मध्ये तुम्हाला कोणतही दीर्घकालीन आजार असतील ,जसे डायबेटिस , बीपी, कोलेस्टेरॉल, ओबेसिटी, अथेरोस्कलेरोसीस, अल्कोहोल सिगारेट चे अतिसेवन यामुळे तुम्हाला हा त्रास होऊ शकतो.. सर्वानाच होईल असे नाही पण काही रुग्णांना निश्चित होऊ शकतो.. शिश्न ताठ का होते हे समजून घेतले तर कारणे लगेच समजतात.. कामउत्तेजना निर्माण होऊन जेव्हा शिश्न ताठ होते तेव्हा वास्तविक शिश्न (penis) मध्ये रक्तप्रवाह जास्त वाढलेला असतो. आणि वर उल्लेखलेल्या आजारात जर रक्तप्रवाह मध्ये कोणताही अडथळा उत्पन्न होत असेल तर शिश्न ताठरता चे समस्या निर्माण होतात..
मानसिक कारण मध्ये तुम्हाला कोणतेही मानसिक तणाव, चिंता, भीती, कामाचा ताण असेल तसेच पुरेशी झोप न मिळणे यामुळे देखील या समस्या निर्माण होतात.. सेक्स मध्ये मानसशास्त्र चा प्रभाव जास्त असते. काही पुरुषांमध्ये विशिष्ट पार्टनर बद्दल रस कमी होणे , हे पण कारण असू शकते. लहान वयात सेक्सबद्दल ची भीती, गैरसमज व अपुरी माहीत यामुळे देखील या समस्या निर्माण होतात.. आणि सर्वात महत्वाचं कारण मी सुरुवातीला उल्लेख केलं ते म्हणजे सेक्स करताना एकदा ताठरता बद्दल समस्या निर्माण झाली की पुरुषाला आपल्या महिला पार्टनर समोर लाज वाटणे किंवा अपराधीपण वाटणे..त्यामुळे पुन्हा शिश्न ताठ होण्याबद्दल समस्या उत्पन्न होतात.
शारीरिक कारण असेल तर तज्ञ डॉक्टर ला दाखवा.. शारीरिक किंवा मानसिक किंवा दोन्ही कारण असेल तर मानसिक ताण कमी करण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे..ध्यान (meditation) हे चिंता दूर करून मानसिक ताण दूर करण्यास चांगला मार्ग आहे.. पुरेशी झोप घ्यावी.. सकस आहार घ्यावा.ज्यात प्रथिने (प्रोटीन) आणि जीवनसत्व (multuvitamin ) अधिक आहेत असा आहार घ्यावा.. दारू,सिगारेट, सोडा सॉफ्ट ड्रिंक हे टाळावे किंवा प्रमाण कमी असावे. योगासने व व्यायाम करावा.
डॉ. अलोक कदम
निरोगी कामजीवनासाठी अतिशय उपयुक्त अशी माहिती. या विषयावर ईतकी स्पष्ट व सुव्यवस्थित मांडणी केलेली माहिती देणारी साधने वा माध्यमे फार कमी आहेत. आपण ही शास्त्रीय माहिती देवून खूप चांगले काम करत आहात.
ReplyDeleteडाॅ. आलोक कदम सर, आपले मनपूर्वक अभिनंदनच !
नीटनेटके आणि टापटीप. असे लिखान वेळोवेळी व्हावे. लैंगिकता शिक्षण ही भारताची गरज बनावी इतके अज्ञान अद्यापही भारतात दिसून येते.
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDelete