आपली पृथ्वी ही गोल नाही
आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की ,आपली पृथ्वी गोल आहे. आपण लहानपणी शाळेत पण हेच शिकलो आहे. आपण निळ्या पृथ्वीचे फोटो देखील गोलाकारच पाहिले आहे. पण वास्तव सत्य हे आहे की ,पृथ्वी ही गोल नाही.. थांबा !! थांबा !! मी धार्मिक अंगाने काहीतरी पृथ्वीला "सपाट" (flat) वगैरे म्हणनार नाही... बरं का !!😀 आपल्या पृथ्वीचा खरा आकार हा "तंतोतंत गोल" नाही, असे मला सांगायचे आहे.. आपल्या पृथ्वीचा आकार हा वास्तविक "ओबडधोबड" आहे. पृथ्वीच्या या आकाराला "जिओड"(Geoid) असे म्हणतात.
पृथ्वीचा आकार हा सर्वत्र समान नाही. उंच पर्वतरांगा आणि खोल समुद्र या पृथ्वीवर आहे , तर पृथ्वी गोल असू शकते का ? साधा विचार करा.... हिमालयात "माउंट एव्हरेस्ट" चे सर्वात उंच शिखर आणि प्रशांत महासागर (Pacific Ocean) मधील "मरियाना ट्रेंच" ही समुद्रातील सर्वात खोल दरी ,अशा प्रकारे दोन विरूद्ध टोक हे पृथ्वीवर आहेत. काही ठिकाणी दबलेली सखल तर काही ठिकाणी उंचवटा अशी ही पृथ्वी आहे, म्हणून यावर सखल भागात महाकाय समुद्र राहिले आहेत. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण (gravity) व परिवलन (earth rotation) यामुळे महासागर पृथ्वीवर टिकून आहेत. महासागर टिकण्यासाठी इतर पण गोष्टी कारणीभूत आहेत.
तसेच, पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते त्यामुळे विषुववृत्त (equator) जवळ ती फुगीर बनली आहे. याउलट ध्रुव (pole) जवळ ती आकाराने चपटी आहे. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण सर्वत्र समान नाही. आपल्या असे वाटत असेल की पृथ्वीच्या सर्व भागात तुमचे वजन समान येईल तर तुम्ही चुकीचे आहात. पृथ्वीच्या ओबडधोबड आकारमुळे आणि पृथ्वीच्या गर्भातील लाव्हारस याचे सर्व भागात संतुलन समान नसल्याने, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण सर्वत्र समान नाही. आपले किंवा कोणत्याही वस्तूचे वजन हे त्या फक्त त्या वस्तूचे वस्तुमान (Mass) नसते, तर पृथ्वीच्या केंद्रातून किती गुरुत्व लागू होतो, यावर त्या व्यक्तीचे वजन अवलंबून असते. आपले वजन हे वास्तविक आपल्यावर लागलेले पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण असते. पृथ्वीची घनता (density) देखील गुरुत्वाकर्षण वर प्रभाव टाकते आणि घनता सर्वत्र सारखी नसते. पर्वतावरील दगड, पठारी प्रदेशात दगड, लाव्हारस पासून निर्माण झालेले दगड प्रत्येक दगडाची घनता वेगळी असते...
करोडो वर्षापूर्वी "पेंजिया" नावाचा एक मोठा द्वीप पृथ्वीवर होता.. टेक्टॉनिक प्लेट हे सरकल्याने पुढे गोंडवाना आणि लौरेशिया हे दोन मोठे प्लेट निर्माण झाले. असेच, टेक्टॉनिक प्लेट सरकत आपले अताचे खंड निर्माण झाले आहेत.त्याने देखील एक पृथ्वीला असा आकार दिला आहे. एकीकडे सर्व खंड आहेत आणि दुसरीकडे "पॅसिफिक प्लेट" वर असलेल्या विस्तृत पसरलेला "प्रशांत महासागर" (Pacific Ocean) आहे जिथं एकदेखील मोठा खंड नाही..
अशी ही आपली सुंदर पृथ्वी ग्रह आहे. गोल नाही, पण ओबडधोबड, काहीशी फुगीर ,काहीशी चपटी, कुठे उंच आणि कुठे सखल असा हा ग्रह आपली जैवविविधता टिकवून आहे..
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment