हबीटेबल झोन (habitable zone) - ग्रहाची विशिष्ठ कक्षा
आपली पृथ्वी ही सौर मालेतील विशिष्ट ग्रह आहे. पृथ्वीवर जीवसृष्टी का आहे ? सौर मालेतील इतर ग्रहवर जीवसृष्टी का नाही ? याच उत्तर आहे , पृथ्वीची सूर्याभोवती ची विशिष्ट कक्षा, ज्याला 'हबीटेबल झोन (habitable zone)" असे म्हणतात. शुक्र हा ग्रह साधारण आपल्या पृथ्वी एवढं आकारमान ने आहे.मात्र सूर्य पासून जवळच्या अंतरावर तो भ्रमण करत असल्याने ती "हबीटेबल झोन" मध्ये नाही. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे, आपण तिथे एक मिनिट देखील जिवंत राहू शकत नाही.. मंगळ ग्रह देखील ग्रह "हबीटेबल झोन" मध्ये नाही. मात्र थोडेसे बदल करून मंगळावर आपण राहू शकतो.. एलोन मस्क आणि नासा यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहेत, मात्र मंगळ वर आपली तात्पुरता सोय होऊ शकते. पण सूर्य सोडून इतर ताऱ्या भोवती फिरणाऱ्या ग्रह मध्ये आपल्याला हबीटेबल झोन" मधील ग्रह (exoplanet) शोधावा लागेल. आपली पृथ्वी ही आपल्यास फार काळ राहण्यास उपयुक्त ठरणार नाही.. मानव सृष्टी ही जिवंत ठेवायची असेल तर आता पासून आपल्याला पृथ्वी सारखा ग्रह शोधावा लागेल..
पृथ्वी वर जीवन आहे याला इतर गोष्टी देखील कारणीभूत आहे. पृथ्वी भोवती असलेला चुंबकीय क्षेत्र आणि ओझोन आपले सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरण पासून रक्षण करतात. आपल्या पृथ्वीवर ऑक्सिजन, नायट्रोजन, आणि कार्बन डाय ऑक्साइड हे योग्य प्रमाणात आहेत..पृथ्वीचे योग्य प्रमाणात असलेल गुरुत्वाकर्षण मुळे आपण पृथ्वीवर उभे आहोत. सर्वात महत्वाचे म्हणजे पृथ्वीवर वातावरण आहे. उन्हाळा पावसाळा हिवाळा यांचे विशिष्ठ काळ पृथ्वी वर आहे,ज्यामुळे वनस्पती आणि प्राणी याना जगण्यास उपयुक्त आहे..
एखाद्या तारा जो सूर्याचा आकाराचा आणि त्याहून लहान (dwarf star)आहे .त्याच्या भोवती साहजिकच ग्रह फिरतात.पण त्यात आपल्याला 'हबीटेबल झोन " मधील ग्रह पाहिजे. त्यात देखील तिथे तरल पाणी आणि वातावरण गरजेचं आहे. साधारण सरासरी 22 अंश सेल्सिअस इतके तापमान जगण्यास आवश्यक असते. त्या ग्रहावर गुरुत्वकर्षन आणि चुंबकीय क्षेत्र हवे. हे सर्व ज्या ग्रहवर (exoplanet) असेल, ते असेल आपला नवीन वास्तव्याचे ठिकाण.. पुन्हा प्रश्न निर्माण होईल त्यावर जायचं कसं ? एकतर कित्येक लाख प्रकाशवर्ष दूर असलेल्या ताऱ्या भोवती हे ग्रह स्थित असल्याने प्रकाशाच (अशक्य असलेला) वेग गाठवा लागेल..
परंतु मानवाची विज्ञानाच्या क्षेत्रात आजवर झालेलं क्रांती पाहता माणूस हे करू शकतो. परग्रहवासी (alien) शोधण्याची मोहीम असेल किंवा पृथ्वी सारखा इतर ग्रह (exoplanet) शोधण्याचं मोहीम असेल , मानवाला अवकाशात शोध मोहीम चालूच ठेवावी लागेल. अनंत पसरलेल्या ब्रम्हांडात जिथे एका दीर्घिका (galaxy) मध्ये अब्जावधी तारे आहेत तिथे आपण एकटेच नसणार. कित्येक सूर्यासारखे तारे, पृथ्वीसारखे ग्रह आणि कित्येक ठिकाणी जीवसृष्टी किंवा विकसित मानवसदृश्य जीव (परग्रहवासी) असू शकत...
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment