भूकंपची (Earthquake) कारणे काय आहेत ?
आज (6 feb 2023) तुर्की ( टर्की, तुर्कस्थान Turkey) या देशात 7.8 क्षमतेचा भूकंप झाला. या भुकंपचे कारण हे आहे की , "अरेबियन प्लेट" ही "अँटनियन प्लेट" ला ढकलल्याने "अँटनियन प्लेट" ही "युरेशियन प्लेट " वर आदळली आणि त्यामुळे भूकंप झालं. अशी जगात अनेक ठिकाणी भूकंप होत असतात. पृथ्वीवरील काही ठिकाणे ही भूकंप क्षेत्रे आहेत. भारतात ईशान्य भारत, हिमालय आणि काश्मीर हा जास्त क्षमतेचा भूकंप प्रदेश आहे. चिली,अल्साका, जपान, इंडोनेशिया इथे मोठे भूकंप घडले आहेत..
पृथ्वीचा पृष्ठभाग हा एक कवच आहे आणि ते कवच साधारण 100 ते 200 किमी आहे.या कवचला "लिथोस्फेर" म्हणतात. आपले पर्वत ,डोंगर, तलाव, महासागर, नद्या सर्व काही या कवच वरच आहे. हा कवच सलग नाही आहे तर तो विभाजित आहे..याला "टेक्टॉनिक प्लेट " अस म्हणतात .जसे की आफ्रिकन प्लेट, युरेशियन प्लेट, इंडियन प्लेट, नॉर्थ अमेरिकन प्लेट, साऊथ अमेरिकन, अंतर्टिका प्लेट , ऑस्ट्रेलियन प्लेट, पॅसिफिक प्लेट हे पृथ्वीवरील मोठे प्लेट आहेत आणि या सोबत काही लहान प्लेट पण आहेत. हे प्लेट सरकन्याची शक्यता जास्त असते .. "लिथोस्फेर" चे खाली "अस्थेनोस्फर" हा भाग आहे. त्याखाली पृथ्वीच्या अजून आत गेलो तर अनुक्रमे मेंटल (mantle) , केंद्राशी "आऊटर कोर" आणि "इनर कोर" आहेत. हा अतिशय तप्त मेंटल (mantle) पृथ्वीच्या गर्भात असून त्याला "मॅग्मा" म्हणतात.
लिथोस्फेर मधील " प्लेट" हे मेंटल (mantle) च्या अस्थेनोस्फर भागावर सरकतात ,तेव्हा "भूकंप" आणि "ज्वालामुखी" होत असतो. जेव्हा "टेक्टॉनिक प्लेट" हे एकमेकांवर आदळतात तेव्हा भूकंप होतो. जेव्हा भूकंप घडतात तेव्हा कोणत्या ना कोणत्या प्लेट चे घर्षण आणि एकमेकावर आदलने झालेलं असते. याउलट, जेव्हा टेक्टॉनिक प्लेट हे एकमेकांपासून दूर जातात तेव्हा "ज्वालामुखी" घडत असतो आणि यात मेंटल (mantle)मध्ये असलेला "ल्हावा" (मॅगमा )बाहेर येत असतो. अटलांटिक महासागर मध्ये "टेक्टॉनिक प्लेट" एकमेकांपासून दूर जातात म्हणून तिथे ज्वालामुखी मोठ्या प्रमाणावर घडतात.
भारतात "इंडियन प्लेट" ही "युरेशियन प्लेट" वर आदळत असल्याने जमिनीचा भागाचा उंचवटा तयार होऊन "हिमालय " ची निर्मिती झाली आहे.म्हणून इथे भूकंप चे झटके जास्त येतात. आफ्रिकन ,अँटनियन,अरेबियन,आणि युरेशियन प्लेट हे एकमेकांना आदळत असल्याने ग्रीस, टर्की, सायप्रस , सीरिया इत्यदी मध्य आशिया भागात पण भूकंप होतात..
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment