राहू केतू (Lunar Node)
राहू (North node) व केतू (South node) हे काय असतात , हे समजून घेण्या अगोदर मी एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट करतो की , हा लेख "भारतीय-ग्रीक खगोलीय भूमिती" वर आधारित आहे. राहू केतू म्हटले की, अनेकांच्या डोळ्यासमोर फलज्योतिष येते. प्राचीन काळात दुर्बिणी च विकास झाला न्हवता, त्यावेळी भारत ,ग्रीक, इजिप्त, चीन अशा प्राचीन संस्कृतीमध्ये तत्कालीन खगोलतज्ञ हे गणित आणि भूमिती द्वारे आकाशाचे निरीक्षण करत असत. राशी, नक्षत्र, नक्षत्रवर रात्री दिशा ओळखणे, ताऱ्यांचे निरीक्षण हे प्राचीन भारत-ग्रीक पद्धतीत होत असे. "खगोलीय गणित शास्त्र" आणि फळज्योतिष हे वेगळे प्रकार आहेत.. फलजोतिष हे खगोलवर आधारित आहे. त्यात विशिष्ट ग्रह , नक्षत्र, ग्रहांची युती याचा मानवी जीवनावर परिणाम होतो, असे जिथे मानण्यात येते, तिथे फलज्योतिष हे सुरू होते. त्या अगोदर सर्व खगोलगणित च असते. मी देखील आकाशाचे निरीक्षण करताना राशी नक्षत्रचा वापर करून एखादा तारा चे स्थान अचूक शोधतो.. हल्ली काही सॉफ्टवेअर निघाले आहे त्याची पण मी मदत घेतो. शेवटी प्राचीन गोष्टी या प्राचीन आहे आणि मॉडर्न सायन्स हे आधुनिक आहे...
एक पौराणिक कथा हिंदू शास्त्रात प्रसिद्ध आहे, की जेव्हा समुद्र मंथन होत असते , भगवान विष्णू हे मोहिनी या स्त्रीचे रूप धारण करून असुराची दिशाभूल करतात. आणि त्यांच्याकडून अमृत आणतात व देवांना अमृत वाटत असतात. तेव्हा एक "असुर" देखील रूप बदलून देवांमध्ये उभा राहतो आणि त्याला अमृत मिळते. तो "असुर " हा अमर बनतो. हे पाहून चंद्र आणि सूर्य हे भयभीत होतात. मग भगवान विष्णू हे आपल्या सुदर्शन चक्र ने त्या असुराचे मुंडके उडवतात. मात्र तो अमर झाल्यामुळे मरत नाही. त्याच्या मुंडके (head) ला "राहू " म्हटले जाते आणि त्याच्या उरलेल्या धडला (body) "केतू" म्हणण्यात येते..ज्योतिष मध्ये, "राहू " हे आसक्ती मोह चे प्रतीक मानण्यात येते आणि "केतू" हे नैराश्य एकटेपणा चे प्रतीक मानण्यात येते.
चला...तर आपण मूळ विषयावर येऊया. आता आपण खगोलशास्त्र आणि भूमिती कडे वळूया..
राहू (North node) आणि केतू (South node) हे वास्तविक ग्रह नाहीत , तर ते दोन "बिंदू" आहेत..हे बिंदू ग्रहण चे दृष्टीने महत्वाचे आहेत. पृथ्वी ही सूर्याभोवती ज्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते, त्या कक्षेला आपण एक सपाट भाग (Ecliptic plane) मानू. चंद्र हा पृथ्वीभोवती ज्या कक्षेत फिरतो त्या कक्षे ल देखील आपण एक सपाट भाग (celestial plane) मानू. हे दोन्ही पृष्ठभाग एकमेकांना 5.2° अंशाचा कोन करून छेदतात. जेव्हा पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते, तेव्हा चंद्र पण पृथ्वी भोवती 5. 2° अंशाचा कोन करून फिरत असतो. जेव्हा चंद्र खालच्या बाजूकडून वरच्या बाजूला छेदतो, तेव्हा त्याला "राहू " (North node) म्हणतात. जेव्हा चंद्र वरच्या बाजूकडून खालच्या बाजूला छेदतो तेव्हा त्याला "केतू" (South node)म्हणतात. राहू आणि केतू एकमेकांशी नेहमी 180 ° च कोन करतात. अमावस्या किंवा पौर्णिमा ला जेव्हा चंद्र हा सुर्यासोबत राहू केतू चे रेषेत (nodal axis) येतो,तेव्हाच ग्रहण घडते. अमावस्या ल सूर्यग्रहण आणि पौर्णिमा ल चंद्रग्रहण होते. इतर वेळी ग्रहण घडत नाही. राहू केतू चे रेषा आणि सूर्य हे समांतर रेषेत यावे लागतात..
राहू व केतू हे नेहमी एकमेकांशी 180° चा कोन तयार करतात.. उदा. राहू हे वृषभ राशीत असेल तर केतू हा विरूद्ध बाजूला म्हणजे वृश्चिक राशीत असणार. केतू हा जर मेष मध्ये असेल तर राहू हा तुळ राशीत असणार.
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment