वायदा बाजार थोडक्यात ओळख
आपण बातमी चॅनलवर हे ऐकले असेलच की आज "सेन्सेक्स" व "निफ्टी" चे भाव इतका घसरला आणि "वायदा किंवा सौदा बाजार" मध्ये अशा पद्धतीने उलाढाल झाली आहे.. वगैरे ....हा "वायदा बाजार" काय आहे ? "वायदा बाजार" हे एका लेखात सांगणे कठीण आहे आणि तुम्ही ते समजून घेणे देखील कठीण आहे. अनेकांच्या डोक्यावरून जाईल. पण या बाजाराची थोडक्यात ओळख करता येईल. मागे हिंडेनबर्ग संस्थेने अदानी चे "शॉर्ट सेल" केले होते त्यावर मी लेख लिहला होता. तेव्हा काही वाचकानी मला प्रश्न विचारला होता की "सौदा बाजार" हा प्रकार असतो ? म्हणून हा लेख लिहीत आहे.
कोणत्याही सामान्य मार्केट मध्ये एक "वस्तू" असते, ज्याची खरेदी किंवा विक्री होत असते. शेअर मार्केट मध्ये कंपनीचे "शेअर" किंवा "इक्विटी" ही वस्तू असते. "स्टॉक"चा भाव वाढला की तुमची त्यातील गुंतवणूक देखील वाढते व तुम्हाला नफा होतो. स्टॉक च भाव उतरला तर तुम्हाला तोटा होतो. तसेच, जेव्हा तुम्हाला वाटते की या कंपनीचे "शेअर" चे भाव उतरणार आहेत ,तेव्हा तुम्ही फक्त "इंट्रा डे" (एक दिवस चा व्यवहारात) मध्येच "शॉर्ट सेल" करू शकता. याला "शेअर मार्केट " मध्ये "कॅश" मध्ये किंवा "इक्विटी" मध्ये ट्रेड करणे असे म्हणतात. हे मी तुम्हाला मागील लेखात सांगितले होते.
यालाच धरून एक दुसरे प्रकारचे मार्केट पण उपलब्ध असते . त्यात "स्टॉक" ची खरेदी विक्री ऐवजी, "कॉन्ट्रॅक्ट" (करार) ची खरेदी विक्री होते... याला "वायदा बाजार " (Derivative market) म्हणतात. इथे "स्टॉक" ऐवजी आपण "कॉन्ट्रॅक्ट" खरेदी विक्री करतो. ते "कॉन्ट्रॅक्ट" हे शेअर च्या मूळ किमतीवर अवलंबून असते. समजा, मला वाटतं आहे की ,"निफ्टी 50" चा भाव 19000 पेक्षा अजून वर जाईल, तर मी त्या प्रकारचे "कॉन्ट्रॅक्ट" खरेदी किंवा विक्री करू शकतो. "निफ्टी चा भाव 19000 पेक्षा वर जाईल" ,हा एक "कॉन्ट्रॅक्ट" किंवा "सौदा" आहे. 19000 ही निफ्टीची मूळ किंमत आहे, त्यावर कॉन्ट्रॅक्ट चा भाव ठरलेला असतो.. आपण सामान्य जीवनात पण बरेच सौदे करतो. उदा. एक मालक आपल घर भाड्याने देतो आहे तर मालक आणि भाडेकरू यांच्यात विशिष्ट सौदा किंवा करार बनतो. तसाच हा किमतीच्या बाबतीत करार आहे .
मार्केट मध्ये "फ्युचर", "ऑप्शन", "फॉरवर्ड " आणि "स्वॅप" हे चार वायदा बाजार चे प्रकार आहेत. मात्र, फ्युचर" आणि "ऑप्शन " हे दोन प्रकार भारतीय बाजार मध्ये असतात. "फ्युचर" आणि "ऑप्शन हे कॉन्ट्रॅक्ट असतात आणि त्याची दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गुरुवारी एक्सपायरी (शेवटची मुदत) तारीख असते.. त्या तारखेपर्यंत तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायचे असते. "फ्युचर" मध्ये ते कॉन्टॅक्ट पूर्ण करायला तुम्ही बांधील आहात आणि "ऑप्शन" मद्ये कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायला तुम्ही बांधील नाही, हा त्यात फरक असतो..(फ्युचर" आणि "ऑप्शन वर स्वतंत्र लेख लिहीन तेव्हा त्यात सखोल चर्चा करू)
वायदा बाजार (Derivative market) चा उपयोग काय ?
- तुम्ही शेअर मार्केट मधून एका कंपनीचा शेअर खरेदी केले तरी तुम्हाला चढ (Bullish) मार्केट मध्येच फायदा होऊ शकतो. तुम्हाला जर माहीत आहे की या शेअर चे भाव काही दिवस खाली कोसळणार आहे, तर तुम्ही कोसळत्या बाजारात कसे कमावणार ? साहजिकच , शॉर्ट सेल करणार !!! पण तुम्ही जास्त दिवस "शॉर्ट सेल" करू शकत नाही. मग, रोज "शॉर्ट सेल" करू शकता का ? त्यापेक्षा आपण फ्युचर मध्ये कॉन्ट्रॅक्ट "सेल" करू शकतो किंवा ऑप्शन मध्ये "पुट" खरेदी करू शकतो.
- तुम्हाला "वायदा बाजार" मध्ये "कॅश बाजार " पेक्षा कमी किमतीत "लॉट" मध्ये कॉन्ट्रॅक्ट विकत घेता येते. इथे कॉन्ट्रॅक्टची एक विशिष्ट किंमत लॉट मध्ये ठरलेली असते. ऑप्शन खरेदी करताना तुम्हाला फक्त प्रीमियम चा भाव द्यायचा असतो. ऑप्शन खरेदी ही सर्वात स्वस्त असते.
- सट्टा (speculation) साठी या बाजाराचा उपयोग होतो. तुम्ही मार्केट चा अंदाज घेऊ शकता की मार्केट पुढील काळात कोसळणार की वर धावणार आहे, त्या प्रमाणे कॉन्ट्रॅक्ट खरेदी करू शकता.
- मोठे गुंतवणूकदार हे स्वतःची मोठी गुंतवणूक ला सुरक्षित करण्यासाठी "वायदा बाजार " चा वापर करतात. समजा, मार्केट मधील त्यांनी गुंतवणूक केलेल्या शेअर चे भाव कोसळले तरी त्यांचं जास्त नुकसान होणार नाही कारण त्यांनी वायदा बाजार मध्ये विरूद्ध बाजूने खरेदी केलेली असते.
मात्र , "वायदा बाजार" मध्ये ट्रेड करायला तुमचा शेअर मार्केट वर गाढा अभ्यास असावा लागतो. हे अतिशय शांत, चलाख आणि चतुर बुध्दीच्या लोकांचे क्षेत्र आहे..
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment