स्टॉक मार्केट - थोडक्यात ओळख
आज आपण "शेअर मार्केट" ची थोडक्यात ओळख पाहणार आहोत. शेअर मार्केट काय आहे ? स्टॉक , इक्विटी, शेअर हे काय असते ? गुंतवणूक चे कोणते प्रमुख प्रकार आहेत ?
शेअर मार्केट चे काही सकारात्मक बाजू आहेत तसे नकारात्मक (Dark side)पण बाजू आहे. पण त्या बद्दल पुढच्या लेखात लिहेन. जे "शेअर मार्केट" मध्ये नवीन लोक आहेत किंवा ज्यांना शेअर मार्केट बद्दल अर्धवट ज्ञान आहे किंवा ज्यांना कुतूहल म्हणून या विषयाबद्दल जाणून घ्यायचे आहे, त्या सर्वांनी हा लेख वाचावा..
"शेअर मार्केट" कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे शिखर आहे. देशाच्या अर्थव्यवस्था मध्ये उद्योग आणि व्यापार चे महत्वाचं स्थान असते. जेव्हा नवीन उद्योग निर्माण होतो तेव्हा देशात रोजगार आणि साधनसंपत्ती निर्माण होते. उद्योगामुळे देशांतर्गत उत्पादन आणि परदेशी गुंतवणूक वाढते.. या मोठ्या उद्योगांना त्यांचे प्रकल्प करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल लागते. हे भांडवल अब्जावधी रुपयांचे असते. हे भांडवल कुठून उभे करतात ? एवढे पैसे कोणतीही बँक लोन स्वरूपात देऊ शकत नाही. त्या कंपनी कडे स्वतःच भांडवल , प्रोमोटर ,कर्ज हे सर्व असते , तरीही त्यांना पैशाची गरज असते. तो पैसा सामान्य लोकांकडून उभा केला जातो. "शेअर मार्केट" मध्ये सामान्य माणूस (Retailers) हा शेअर खरेदी करून या "भांडवल" मध्ये पार्टनर बनू शकतो. त्यासाठी कोणतही कंपनी ही खाजगी कंपनीतून (private) रुपांतरीत होऊन पब्लिक कंपनी बनलेली असते आणि देशाच्या "स्टॉक एक्सचेंज" मध्ये लिस्टेड असते.
आपल्या देशात दोन प्रमुख "स्टॉक एक्सचेंज" आहेत, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)....
यावर नियंत्रण सरकारचे असते ज्यासाठी "सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया" हे सरकारी यंत्रणा कार्यरत असते. "नॅशनल स्टॉक एक्सचेंज" चे निर्देशांक ला " निफ्टी" म्हणतात आणि "बॉम्बे स्टॉक एक्सचेंज" चे निर्देशांक ला"सेन्सेक्स" असे म्हणतात. ज्या कंपनी चे शेअर हे एक्सचेंज मध्ये लिस्टेड असतात, त्याचा कंपनी चे शेअर तुम्ही खरेदी करू शकता. शेअरला च "स्टॉक" व "इक्विटी" म्हणतात. शेअर मार्केट मधील पैसा कंपनीला उद्योग व्यवसायसाठी मिळतो . मग यात गुंतवणूक करणाऱ्याचा काय फायदा आहे ?? बघा, गुंतवणूकदार दोनच गोष्टी करू शकतो.. एकतर तो शेअर खरेदी करू शकतो आणि दुसरे शेअर विकू शकतो. जेव्हा एखाद्या कंपनीत जास्त "खरेदीदार" येतात तेव्हा शेअर चे भाव वाढणार कारण मागणी वाढली आहे. आणि जेव्हा कंपनीचे शेअर जास्त विकले जातात म्हणजेच "विक्री करणारे" जास्त येतात तेव्हा पुरवठा वाढतो तेव्हा शेअर चे भाव उतरणार..
तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर घेतले आहेत, आणि त्यावेळ तुमच्या सारख्या अनेक लोकांनी त्या कंपनीचे शेअर खरेदी केले आहेत तर त्या स्टॉक ची किंमत वाढणार. आणि तुम्ही जास्त भावाला तो शेअर विकून नफा कमवू शकता. हेच उलट घडते, तुम्ही एखाद्या कंपनी चे शेअर खरेदी केले आणि त्याच वेळी अनेक लोकांनी ते शेअर विकले तर त्याचा भाव उतरल्यामुळे तुम्हाला ते तोटा सहन करून विकावे लागणार. "शेअर मार्केट" मध्ये शेअर चे भाव गुंतवणूकदार लोकांवर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे कंपनी कोणत्या उद्योगावर काय व कशी काम करते आहे.? काय नवीन प्रोजेक्ट आहे ?त्या कंपनी ला किती नफा किंवा तोटा होतो ? कंपनी मध्ये परदेशी गुंतवणूक किती आहे ? कोणत्या कायदेशीर केस चालू आहे का ? याचा देखील "दीर्घकालीन गुंतवणूकदार" विचार करतात म्हणून त्याचाही परिणाम शेअर च भाव वर होत असतो.
गुंतवणूक चे शॉर्ट टर्म ट्रेडिंग (कमी कालावधी साठी गुंतवणूक) आणि लाँग टर्म इंवेस्टिंग (जास्त कालावधी साठी गुंतवणूक) असे दोन प्रमुख प्रकार आहेत. अजून माहिती आपण आगामी लेखात पाहू .
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment