स्टॉक (शेअर) मार्केट ची थोडक्यात ओळख....
आपला मराठी माणूस स्टॉकमार्केट पासून दूर राहतो कारण एकतर "स्टॉक मार्केट" च किचकट अभ्यास करण्याची मानसिकता नसते आणि दुसरे म्हणजे स्टॉक मार्केट हा "जुगार " आहे , अशी आपल्या मनात पक्की धारणा बनली आहे. इतर राज्यात पण हीच स्थिती आहे पण आपल्या महाराष्ट्रात मुंबईत स्टॉक मार्केट चा समुद्र असताना आपण त्याला नकारात्मक दृष्टीने पाहतो.. हे आश्चर्य...स्टॉक मार्केट जुगार नाही, तर 90 % लोक अभ्यास न करता मार्केट मध्ये उतरत असल्याने त्यांचा तोटा होतो आणि ते मार्केट ला जुगार समजतात...मार्केट हे "सौदागर " लोकांचे क्षेत्र आहे ..जे शांत मनाने कोणतेही सौदे करण्यात खूप चलाख असतात आणि ज्यांना मार्केट चे सखोल ज्ञान घेतले आहे, हे त्यांचे क्षेत्र आहे.. जे "ब्रोकर किंवा mutual fund " च ऑफिस मध्ये काम करतात त्यातील बहुतेकांना पण मार्केट चा सखोल अभ्यास अजिबात नसतो.. मार्केट हे मायावी जग आणि भुलभुलया आहे, सामान्य बुद्धीने ते समजत नाही. ज्या क्षेत्रात अब्जावधी रुपयांची उलाढाल चालते ते क्षेत्र इतके सोपे असेल ,असे वाटत का ????
चला तर "स्टॉक मार्केट" ची थोडक्यात ओळख करून घेऊ..
शेअर मार्केट ला पण एक प्राचीन इतिहास आहे. रोमन साम्राज्य आणि इस्तंबूल (तुर्कस्थान) येथे तत्कालीन बाजार चालायचे. ज्या स्थानिक बाजारात वस्तूंची खूप उलाढाल होते तिथे भांडवल ची अर्थातच गरज पडत असते. 16 व्य शतकात युरोपियन देशात प्रत्येक व्यापारी देशाची "ईस्ट कंपनी " होती. आशियाई देश भारत, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया , मलेशिया अशा देशातून आवश्यक वस्तू खरेदी करून हे युरोपिअन व्यापारी त्यांच्या देशात "चढ " भावाला विकत असत..पण त्यासाठी त्यांना लागणारे भांडवल ते लोकांकडून जमा करत असत. गुंतवणूकदारांना पण त्यातून नफा मिळत असे. "डच ईस्ट इंडिया कंपनी" ही पहिली कंपनी होती जिथे जनता आपले पैसे गुंतवू शकत होती.. इथून आजच्या मॉडर्न "स्टॉक मार्केट" चा जन्म होतो. 16 व्या शतकात नेदरलँड मधील "एमस्टरडम" मध्ये पहिले स्टॉक एक्सचेंज सुरू झाले. आज जगात न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज, नॅसडक एक्सचेंज, जपान एक्सचेंज, शंगाई एक्सचेंज, हाँग काँग एक्सचेंज,लंडन स्टॉक एक्सचेंज, ताइवान एक्सचेंज असे प्रत्येक महत्त्वाच्या देशात एक्सचेंज आहे. भारतात "नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE" आणि "बॉम्बे स्टॉक एक्सचेंज" असे दोन प्रमुख एक्सचेंज आहेत.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE चे निर्देशांक ला "निफ्टी" असे म्हणतात आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE च्या निर्देशांक ल "सेन्सेक्स" असे म्हणतात. देशातील कोणत्याही कंपनी ला व्यवसाय करण्यासाठी भांडवल ची गरज असते. सुरुवातीला कोणतही कंपनी ही खाजगी (प्रायव्हेट) कंपनी असते. मात्र पुढे जसं बिझनेस ची वाढ होते तसे त्यांना जास्त भांडवल ची गरज पडते. मग कंपनी हे "पब्लिक कंपनी" बनून IPO (Initial public offering) चे माध्यमातून NSE व BSE मध्ये समाविष्ट होते. या एक्सचेंज मध्ये काय असते ? तर सामान्य लोक "भागभांडवल" (शेअर,स्टॉक, ईक्विटी) ला खरेदी आणि विक्री करू शकतात. या भागभांडवल ची मदत कंपनीला उद्योग करण्यासाठी होते ,तर गुंतवणूकदाराना खरेदी विक्री करून त्यामधून नफा किंवा तोटा मिळत असतो.
तुम्हाला फक्त दलाल (ब्रोकर )कडे "डिमॅट" आणि "ट्रेडिंग" अकाऊट उघडुन गुंतवणूक सुरू करायची असते. अगदी कमी शुल्क मध्ये हे सुरू करता येते..पण त्यांचा सखोल अभ्यास लागतो. मार्केट मध्ये "दलाल" हा लागतोच, दलाल शिवाय ट्रेडिंग करता येत नाही.काही लोक "कमी कालावधी" साठी "ट्रेडिंग" करतात,तर काही लोक " जास्त कालावधी " साठी गुंतवणूक करतात.
स्टॉक मार्केट मध्ये बिझनेस चे बरेच प्रकार असतात. इंट्रा डे, स्कॅल्पिंग, स्विंग, शॉर्ट सेलिंग, बीटीएसटी,शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म इंवेस्टमेंट असे बरेच प्रकार आहेत.." वायदा किंवा सौदा बाजार" मध्ये "कॉन्ट्रॅक्ट" खरेदी विक्री केली जातात.यात शेअर चे कॉन्ट्रॅक्ट असतात..भारतात फ्युचर आणि ऑप्शन हे दोन प्रकार चालतात. याला "डेरीवेटीव" मार्केट म्हणतात.
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment