इसरो (ISRO) आणि चांद्रयान 3
इसरो (ISRO) ही भारताची स्पेस एजेन्सी असून 15 ऑगस्ट 1969 रोजी त्याची स्थापना झाली. सुरुवातीला INCOSPAR असे या "स्पेस एजेन्सी" चे नाव होते, नंतर बदलून इसरो (ISRO) असे करण्यात आले.. तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतात देखील स्पेस अजेन्सी असावी आणि भारताने देखील अंतराळात संशोधन करावे या हेतूने ही संस्था स्थापन करण्याचे निश्चित केले. भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली " स्पेस एजन्सी" स्थापन केली. त्यावेळी अमेरिका आणि रशिया (USSR तत्कालीन रशिया) यांच्या शीतयुद्ध मध्ये वैज्ञानिक स्पर्धा होती. रशिया ने जगातील पहिले यान अंतराळात सोडले. त्यानंतर अमेरिका शांत राहणार न्हवती. त्यांनी चंद्रावर अपोलो मिशन अंतर्गत पहिला माणूस उतरवला. यादरम्यान भारताला ही या क्षेत्रात उतरावे असे वाटत होते. भारताने या दोन्ही देशातील स्पेस एजेन्सी च्या सहकार्यने अंतराळ संशोधन सुरू केले. जगात अमेरिका, रशिया, चीन, युरोपियन स्पेस एजन्सी आणि भारत हे आघाडीचे देश आहेत की त्यांनी आपले स्पेस मिशन यशस्वी केले आहेत.. आपल्याला आपल्या शास्त्रज्ञांचा सार्थ अभिमान असला पाहिजे. 1969 पासून आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले अंतराळ मिशन पूर्ण केले आहेत. अंतराळ मिशन हे अगदी स्वस्त दरात पूर्ण करणारा देश म्हणून भारत प्रसिद्ध आहे.
सुरुवातीला आपण फक्त अंतराळात कृत्रिम उपग्रह सोडल्यावर भर दिला होता. तेव्हा आपल्याकडे स्वतःचे रॉकेट किंवा लॉनचर पण न्हवते. 1975 साली "आर्यभट " हे भारताचे पहिले उपग्रह आपण रशिया (USSR soviet union) च्या रॉकेट चे मदतीने अवकाशत सोडले. 1980 मध्ये भारताने स्वतःचे पहिले "रॉकेट किंवा लॉनचर" SLV -3 बनवले. पुढे इतरही रॉकेट बनवले. थोडक्यात सांगतो, कोणत्याही स्पेस मिशन (अंतराळ संशोधन) मध्ये चार गोष्टी सर्वात महत्वाच्या असतात. रॉकेट किंवा लॉनचर, ऑर्बिटर, लँडर, रोव्हर हे चार गोष्टी असतात ज्या मध्ये हे मिशन चालते..रॉकेट लॉनचर हे फक्त अंतराळयानाच्या मुख्य भागाला पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पोहचण्याचे काम करते. पुढील काम हे ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर चे असते.
भारताचे पृथ्वी , अंतराळ आणि इतर ग्रह वरील मिशन पैकी एक मिशन म्हणजे "चंद्र मिशन" आहे. चंद्रावर पहिले याने 2008 साली भारताने यशस्वीरीत्या पाठवले. चंद्रावर पाण्याचे साठे असल्याचे प्राथमिक संशोधन याच मिशन द्वारे करण्यात आले. 2019 मध्ये आपण ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर असे तिन्ही गोष्टी 'चांद्रयान 2 " मध्ये पाठवले होते. चंद्राचा जो दक्षिण ध्रुव (साऊथ पोल) आहे तो भाग कायम आधरात असतो. तिथे लँडर उतरविण्याचा प्रयत्न करताना काही तांत्रिक बिघाड मुळे लँडर चा अपघात झाला. आणि आपले ते मिशन अयशस्वी झाले. त्या मिशन चे अपयश नंतर हे "चांद्रयान 3" मिशन काम करणार आहे..
चंद्रावर व्यवस्थित लँडर आणि रोव्हर हे व्यवस्थित उतरवणे , चंद्रावर अंधाऱ्या दक्षिण ध्रुव भागाचा अभ्यास करणे, तेथील पाण्याचे साठे आणि त्यातील हायड्रोजन अणू वर संशोधन करणे, चंद्रावर अजून कोणते मूलद्रव्ये सापडतात ते शोधणे असे अजून बरेच संशोधन आहेत..
चांद्रयान 3 हे यशस्वी झाले तर जगात भारताची मान खूप उंचावणार आहे.
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment