क्वांटम फिजिक्स" - एक अद्भुत शास्त्र
"क्वांटम फिजिक्स" मध्ये गेल्या काही दशकात प्रगत देशामध्ये खूप संशोधन झाले आहे. आपण शाळा कॉलेज मध्ये शिकलेल्या "भौतिकशास्त्र" पेक्षा "क्वांटम फिजिक्स" हे खूप वेगळे आहे. भौतिकशास्त्र मध्ये जे काही नियम लागू होतात, ते "क्वांटम फिजिक्स" च्या दुनियेत लागू होत नाही..
भौतिकशास्त्र हे स्थूल पदार्थवर आधारित आहे. स्थूल पदार्थ मग ते लहान पदार्थ असो की अगदी "महाकाय तारे", किंवा "ब्लॅक होल" असो ; भौतिकशास्त्र चे नियम त्यांना लागू होतात. सर न्यूटन यांचे गतिविषयक नियम आणि गुरुत्वाकर्षण चा नियम हे स्थूल पदार्थला लागू होतात. कोणतीही वस्तू जमिनीवर का पडते ? तर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे त्याच कारण हे सर्वांना माहीतच आहे. पृथ्वीवर वस्तू पडताना किती बल लागू होईल हे त्या वस्तूच्या वस्तुमान आणि त्या वस्तूचे पृथ्वीपासून चे अंतर यावर अवलंबून असते. हा नियम ब्रम्हांडात सर्वत्र लागू होतो. कोणत्याही खगोलीय वस्तूचे एक विशिष्ट गुरुत्व असते. ब्लॅकहोल चे गुरुत्व हे इतके जास्त असते की ते प्रकाशकिरण ला देखील आपल्याकडे आकर्षित करतात. संपूर्ण विश्वात भौतिकशास्त्र चे सर्व नियम लागू होतात, तर मग "क्वांटम फिजिक्स" ला लागू झाले पाहिजेत.!!!
पण तसे होत नाही. "क्वांटम फिजिक्स" ला भौतिकशास्त्र चे काही नियम लागू होत नाही. "क्वांटम फिजिक्स" हे जगच वेगळे आहे. आपण त्या "क्वांटम फिजिक्स" च्या जगातच जगतो ,मात्र आपल्याला त्याची जाणीव नसते. आपण फक्त "भौतिक" गोष्टी पाहू शकतो आणि त्यालाच खरे मानतो. पण या स्थूल भौतिक गोष्टीच्या आत एक विश्व दडले आहे ,याची आपल्याला जाणीव नसते..
"क्वांटम फिजिक्स" मध्ये कोणत्याही पदार्थ च्या अतिसूक्ष्म पातळीवर अभ्यास असतो. सूक्ष्म कणाच्या आत असलेले अतिसूक्ष्म प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्युट्रोन , क्वारक , लेप्टन, असे पदार्थ आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक , न्युक्लीयर फोर्स सारख्या बलचा अभ्यास हा "क्वांटम फिजिक्स" मध्ये केला जातो. आपल्या समोर जी वस्तू दिसते ती "स्थूल" पातळीवर आपण पाहू शकतो. मात्र "अतिसूक्ष्म" पातळीवर देखील त्या वस्तूचे अस्तित्व आहे. समजा , उदाहरण म्हणून एक टेबल घ्या. टेबल ही भौतिक वस्तू आहे. त्याला गुरुत्वाकर्षण चे नियम लागू आहे. टेबल हा ज्या कोणा पदार्थ च बनला आहे, लाकूड किंवा लोखंड , त्याचे कण मिळून ते टेबल बनले आहे. हे याचं स्थूल स्वरूप झाले. मात्र, अतिसूक्ष्म पातळीवर हा टेबल फक्त सूक्ष्म लहरी "wave" आहेत. कोणताही "पदार्थ" हा स्थूल पातळीवर "पदार्थ" आहे ,मात्र अतीसूक्ष्म पातळीवर "लहरी" आहेत. या लहरींना भौतिकशास्त्र चे काही नियम लागू होत नाही .आपण माणसे ,प्राणी,वनस्पती, निर्जीव वस्तू, परग्रहवासी किंवा ब्रम्हांडातील सर्व वस्तू हे अतीसूक्ष्म पातळीवर "लहरी" स्वरूपात आहेत आणि स्थूल पातळीवर त्यांचे पदार्थ स्वरूपात आहोत.
साध्या भाषेत सांगायचे तर , आपण जे जग पाहतो ते एकाचवेळी दोन स्थितीमध्ये आहे. वस्तू हे "पदार्थ" आणि "लहरी" पण आहेत. स्थूल वस्तू हे वेगवेगळ्या बाह्य स्वरूपात उपलब्ध आहेत,पण सूक्ष्म पातळीवर ते एकच आहेत. तुमच्या, माझ्या व निर्जीव वस्तूत सर्वात "लहरी" उपलब्ध आहेत. जग हे "भौतिक" स्वरूपात आहे हे "एक भौतिक सत्य" आहे ,पण वास्तविक सूक्ष्म पातळीवर फक्त सूक्ष्म लहरी आहेत म्हणून स्थूल पातळीवर हेच "सत्य" हे "असत्य"ठरते.... 😀 तुम्ही मला वेडा म्हणाल... "वेव पार्टीकल थियरी"( Wave particle theory) हेच सांगते. हे मला पण समजायला सुरवातीला अवघड झाले होते ..पण मी समजून घेतले... अजून यात बरेच अद्भुत गोष्टी आहेत..पुढील लेखात मांडेन.
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment