डार्विन यांचा सिद्धांत
"चार्ल्स डार्विन" यांचा सिद्धान्त आपण खूप सखोल समजून घेणे आवश्यक आहे..
डार्विन हे ब्रिटिश वैज्ञानिक संशोधक आणि विचारवंत होते. यांचे काही प्रमुख उत्क्रांती (evolution)सिद्धान्त प्रसिद्ध आहेत.
१) नैसर्गिक निवड (Natural selection)
2) नवीन जातीची निर्मिती (The origin of new species)
3) सजीवांमध्ये संतानउत्पत्तीची प्रचंड क्षमता
4) सजीवांच्या अस्तित्वसाठी संघर्ष (struggle for existence)
5) विविधता आणि आनुवंशिकता
6) वातावरण मधील बदल नुसार सजीवांमध्ये परिवर्तन
डार्विन यांनी निसर्गाला खूप सखोल निरीक्षण केले होते.. डार्विन च सिद्धान्त हे आजवर बहुतांश संशोधकांनी स्वीकारलेला सिद्धान्त आहेत.. निसर्ग हा प्राणी व वनस्पती यांना निर्माण करतो . त्यात विशिष्ट सजीव टिकतात मात्र काहीना निसर्गच स्वतः नष्ट करतो.. याच मोठे उदाहरण हे "डायनासोर"आहेत.. डायनासोर हे निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थिती समोर टिकले नाही.. डायनासोर नष्ट होऊन देखील जे सजीव पृथ्वीवर टिकले त्यांनी स्वतःला या निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीसमोर अनुकूल बनविले...तेच सजीव निसर्गात टिकले, ज्यांनी वातावरण नुसार स्वतःमध्ये बदल केले आणि स्वतःचे शरीर देखील वातावरण नुसार अनुकूल केले, हीच उत्क्रांती (evolution) आहे. आपण वानर पासून" होमो सेपियान "बनलो आणि "होमो सेपीयान" पासून "आधुनिक मानव" बनला ही "मानवाची उत्क्रांती" आहे.
सजीवामध्ये प्रजनन ची प्रचंड क्षमता आहे. तुम्ही माश्याचे उदाहरण घ्या. मासे एका वेळी हजारो अंडी देतात त्यामुळे समुद्रात अनेक माश्यांची निर्मिती ची क्षमता असते. मात्र "मोठे मासे" लहान माश्यांना खातात.त्यामुळे माश्यांच्या संख्येवर नियंत्रण येते...जंगलात वनस्पतीला शाकाहारी प्राणी खातात. शाकाहारी प्राण्यांना वाघ सिंह बिबटे असे मांसाहारी प्राणी मारून खातात. गरुड हे लहान प्राण्यावर व सापांवर थेट हल्ला करतात. गिधाड हे मृत जीवांवर जगतात. मुगुंस हे सापाना मारतात .साप हे उदराना मारतात ..ही एक अन्नसाखळी आहे.निसर्गामध्ये एक प्रकारचे संतुलन असते.. उत्पती जितकी होते, तितकी ती नष्ट होण्याची पद्धत पण निसर्गात अस्तित्वात आहे. प्रत्येक जीव स्वतःच्या अस्तित्वासाठी झटतो. तुम्ही कासव पहा,जन्म झाल्याबरोबर त्यांची जगण्याची धडपड सुरू होते. एक छोटे रोपटे देखील त्याला सूर्यप्रकाश मिळण्यास अडचणी निर्माण झाल्यास जिथे प्रकाश मिळतो त्या दिशेने वाढण्यासाठी प्रयत्न करते.
निसर्गात विविधता आहे म्हणून देखील एका जातीचे विभिन्न जीव आपणास पाहायला मिळतात. फुलपाखरू चे विविध प्रकार आपणास पाहायला मिळतात. ही विविधता उगाचच घडत नसते तर निसर्गात जशी परस्थिती मिळते तसे प्रत्येक जीव स्वतःमध्ये बदल करत असतात... विविधता सोबत अनुवांशिकता पण महत्वाची आहे. जे सजीव अनुवांशिक रीतीने आपली पिढी टिकवू शकले आणि वातावरण नुसार बदल करू शकले, तेच निसर्गात टिकले. त्यांच्यात नवीन सजीव पण निर्माण झाले.जसे वानर,माणूस ,माकड, चिंपाझी हे कधीकाळी एकाच जातीतून निर्माण होऊन विभिन्न जातीत विकसित झाले आहेत..
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment