डार्विनच्या सिद्धान्तनुसार आजही आपल्यात उत्क्रांती घडते आहे का ?
लहानपणी अनेकदा मला हा प्रश्न पडायचा आणि कदाचित तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल. डार्विनचे सिद्धान्त नुसार , आपण सर्व आताचे सजीव व वनस्पती हे उत्क्रांती नुसार घडले आहोत. करोडो वर्षात प्राण्यांमध्ये निसर्गाला अनुरूप असे पिढीजात व सतत शारीरिक बदल होउन ,आजचे त्यांचे स्वरूप आहे. मग आजही ही उत्क्रांतीची प्रक्रिया घडत आहे..? काय उत्क्रांती (evolution) थांबली आहे ? उत्क्रांती ही चालू असेल तर माणसाचे भविष्यात स्वरूप काय असेल ??
मला स्वतःला असे वाटते आहे की उत्क्रांती थांबलेली नाही. आजही आपल्यात उत्क्रांती घडत आहे. उत्क्रांती धीमी प्रक्रिया असते..आपल्या पूर्वी सुमारे 165 दशलक्ष (मिलियन) वर्ष पृथ्वीवर डायनासोर राहत होते. या प्रदीर्घ काळात डायनासोर मध्ये देखील बदल घडत होते..त्यांच्यात पण विभिन्न जाती होते.काळाच्या ओघात डायनासोर ची एक जात नष्ट होऊन दुसरी जात निर्माण होत होती.. 65 दशलक्ष वर्षापूर्वी जेव्हा पृथ्वीवर धूमकेतू आपटला तेव्हा डायनासोर हळू हळू नष्ट झाले. त्यापैकी जर काही उडणारे डायनासोर होते त्यांचे वंशज हे "आजचे पक्षी" आहेत.. हे खूप धीम्या गतीने घडले
उत्क्रांती एवढा प्रदीर्घ काळ चालत होती. माणूस हा डायनासोर च्या तुलनेने खूप कमी काळ पृथ्वीवर आहे. आपण आधुनिक "होमो सेपीयन " हेच 3 लाख वर्षपासून आहोत..आपल्या अगोदर कित्येक लाखो वर्षात वानर पासून बदल होत "होमो सेपियन " बनला आहे. कुठं 3 लाख वर्षाचा "होमो सेपियन" ते आजच्या माणूस पर्यंत चा प्रवास आणि कुठं डायनासोर चा 165 दशलक्ष वर्षाचा पृथ्वीवरचा प्रवास... तुलना च होऊ शकत नाही..!! मग या काळात आपल्यात बदल होत नसेल का ? उत्क्रांती चा बदल अतिशय धिमा असल्याने आपल्याला जाणवत नाही आणि बदल पाहायला आपण एक व्यक्ती म्हणू करोडो वर्ष जगणार नाही..कारण काळाच्या मर्यादा आपल्यावर आहे..
मात्र, एक छोटासा बदल तुम्ही निरीक्षण करा.. आपण प्रत्येक पिढी बदलता आहोत हे तुम्हाला जाणवेल.. प्रत्येक नवीन पिढी ही मागच्या पिढी पेक्षा काही बाबतीत अधिक विकसित असते. तसेच, माणसं माणसात पण आपल्याल बदल दिसतो..कोणी बुध्दीचा चा जास्त वापर करतो तर कोणी खूप कमी वापर करतो..काहीची बुद्धी ही एक दोन विषयातच चालते. काही सामान्य लोक असतात तर काही लोक असामान्य "सुपर टॅलेंटेड " असतात.काही जण अनेक विषयात तरबेज असतात.उदाहरनार्थ "लिओनार्दो दा विंची".. आपल्या मेंदू ची क्षमता आणि शारीरिक स्वरूपात आपल्यात कालांतराने बदल होऊ शकतो.
तुम्हाला असे वाटत नाही का , की "सुपर ह्युमन" ही एक वेगळी जमात बनू शकते म्हणून ??. प्रत्येक पिढी गुणसूत्र (DNA) मध्ये बदल होत असतो.. आई वडिलांचं गुणसूत्र (DNA) पेक्षा मुलाचे गुणसूत्र हे वेगळे असतात..याच गोष्टीमुळे मला असे वाटत की उत्क्रांती आजही घडते आहे.. तसेच, डार्विन चे सिद्धान्त बऱ्याच प्रमाणात खरे आहेत.
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment