वेळ (time) हे ब्रम्हांडमध्ये समान नाही...(Time dilation theory)
आपल्याला माहीत की जगात "वेळ" ही एक अशी गोष्ट आहे, जी "एकमार्गी" असते. "भूतकाळ ते भविष्यकाळ " असा वेळचा एकमार्गी प्रवास असतो. मात्र,ही वेळ अनंत पसरलेल्या ब्रम्हांडात "समान" नाही.. पृथ्वीवर जो "वेळ" चालला आहे, तोच "वेळ" दुसऱ्या दीर्घिका (galaxy) मध्ये इतर ग्रहावर देखील चालला आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. यासाठीच आपल्याला आइन्स्टाईन यांची "स्पेशल थियरी ऑफ रेलेटीविटी" मधील "टाइम डायलेशन " हा सिद्धांत समजून घ्यावा लागेल... ही खूप किचकट संकल्पना आहे. मी तुम्हाला समजेल अशा भाषेत सोपे करुन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे..
"भौतिकशास्त्र " वर पूर्वी "सर न्यूटन" यांचा प्रभाव होता. त्यांच्या दृष्टीने "वेळ" ही जगात समान (constant) असणार ,असे मानले जात होते.अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी 1907 मध्ये "टाइम डायलेशन" हा सिद्धांत मांडला .या सिद्धान्तमुळे भौतिकशास्त्र चे दुनियेत खूप मोठा गोंधळ निर्माण झाला होता. सर न्यूटन आणि एकणुच भौतिकशास्त्र यांच्या मते "वेळ" ही समान गोष्ट आहे. तुम्ही ब्रम्हांडात कुठंही असाल तरी तुमच्यासाठी वेळ सारखं असला पाहिजे. "गती" आणि "गुरुत्व" च जगातील सर्व वस्तूवर प्रभाव असेल पण "वेळ" वर प्रभाव नसणार, असे जुन्या भौतिकशास्त्र चा दृष्टिकोन आहे. "टाइम डायलेशन" सिद्धान्तनुसार "वेळ" वर देखील "गती" आणि "गुरुत्व " चा प्रभाव आहे.. "गुरुत्व" चे आणि "गती" चा कसा प्रभाव आहे, हे दोन्ही गोष्टी उदाहरण सकट पाहूया .
उदाहरणार्थ, आपल्या "आकाशगंगा" (milkyway) या दीर्घिका (galaxy)मध्ये पृथ्वी ही "ब्लॅकहोल" पासून दूर आहे. "ब्लॅकहोल" कडे प्रचंड गुरुत्वाकर्षण (gravity) असते.. इतके गुरुत्व असते की प्रकाश वर देखील त्याचा प्रभाव असतो. समजा, पृथ्वीसारखा राहण्यास उपयुक्त असलेला ग्रह हा "ब्लॅकहोल" जवळ आहे ,असे मानू. खरतर ब्लॅकहोल जवळील ग्रहावर राहणे अशक्य आहे पण आपण सिद्धान्त समजण्यासाठी असे गृहीत धरू.. तर, पृथ्वीवर आणि त्या ग्रहावर असे दोन व्यक्ती घड्याळ घेवून बसले आहेत. जुन्या "भौतिकशास्त्र" चे दृष्टीने ते घड्याळ समान वेळ दाखवणार. पण "टाइम डायलेशन" चे दृष्टीने हे दोन्ही घड्याळ समान वेळ दाखवणार नाहीत. जो ब्लॅकहोल जवळील ग्रह आहे तिथे गुरुत्व जास्त असल्याने पृथ्वीचा तुलनेने वेळ हा तिथे धीमा असणार आहे. पृथ्वीवर असलेला माणूस म्हातारा होऊन त्यांचे पणतू पण जन्म घेतील ,मात्र तिथे त्या ग्रहावर माणूस अजून तरुण असणार आहे..
हेच आपण "गतिविषयी" (speed) समजून घेऊ.. समजा," राम" आणि "श्याम" हे दोन व्यक्ती आहे. राम हा अशा यानात बसला आहे, जे यान प्रकाश चे वेगाने प्रवास करते. प्रकाशाचा वेग 3 लाख किमी प्रती सेकंद इतका प्रचंड असतो. आपण तो वेग गाठू शकत नाही कारण आपल वस्तुमान अधिक आहे. जास्त वेग साठी वस्तूचे वस्तुमान कमी असावे लागते. पण आपण गृहीत धरू की ,राम हा प्रकाश चा वेगाने यानातून प्रवास करतो आहे आणि त्यांच्याकडे घड्याळ आहे.. मात्र,श्याम हा पृथ्वीवर स्थिर आहे आणि त्यांच्याजवळ देखील घड्याळ आहे. आता इथे "टाइम डायलेशन" असे सांगत की , राम हा प्रकाश चे वेगाने प्रवास करत असल्याने श्याम चे तुलनेने रामसाठी "वेळ" हा धिमा आहे. "टाइम डायलेशन" नुसार अवकाशात अतिशय वेगात आणि प्रचंड गुरुत्व मद्ये "वेळ" हा धिमा होतो..
आता एक प्रश्न मनात येईल की , जो व्यक्ती हे अनुभवत आहे त्याला सर्व धिमे जाणवेल का ? म्हणजे " गुरुत्व" आणि "वेगवान गती " मध्ये घड्याळ , शरीरातील पेशी, आजूबाजूच्या वस्तू सर्व हे असे धीमे (slow motion) मध्ये जाणवेल का ? तर याच उत्तर आहे ...."नाही"... तुम्ही जर "राम " प्रमाणे ही परिस्थिती अनुभवत असाल तर तुम्हाला वेळ "धीमा" जाणवणार नाही.. तुम्ही जसं नॉर्मली जीवन जगता असेच सर्व असणार आहे. काहीही धीम्या गतीने "slow motion" जाणवणार नाही..कारण गती आणि गुरुत्व चा तुमच्या सकट अवतीभवती सर्व वस्तूवर प्रभाव असल्याने तुम्हाला याचा थांगपत्ता लागणार नाही.. पण वास्तविक "वेळ" हा धीमा झालेला असेल.."राम" जो यानात बसला आहे त्याच "एक दिवस" तो नॉर्मल दिवस जगतो असच अनुभवणारा आहे. तसेच त्यांचा घड्याळ, शरीरातील पेशी काम करणार आहेत...मात्र इथे पृथ्वीवर बसलेल्या श्याम साठी राम चे तुलनेने कित्येक वर्ष निघून गेली असणार आहेत..
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment