शनी ग्रहचे गुरुत्वाकर्षण हे आपल्या पृथ्वीच्या तुलनेने अगदी थोडेच जास्त आहे !! असे का ??
शनी हा ग्रह आपल्या आपल्या सूर्यमालेतील आकाराने दुसरा मोठा ग्रह आहे, हे आपण सर्व जाणतो. सूर्यमालेतील 8 ग्रह पैकी (9 वा प्लुटो हा dwarf planet आहे) गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे प्रचंड मोठे ग्रह आहे. त्यातील गुरू हा सर्वात मोठा ग्रह आहे.. शुक्र हा साधारण आपल्या पृथ्वी एवढाच ग्रह आहे. मंगळ आणि बुध हे पृथ्वीपेक्षा लहान ग्रह आहेत. बुध हा सर्वात लहान ग्रह आहे.. आता, यात शनी हा गुरू नंतर इतर सर्व ग्रहापेक्षा मोठा ग्रह आहे. शनी हा पृथ्वीपेक्षा 9 पटीने रुंद आहे. शनी हा ग्रह पृथ्वीपेक्षा इतका मोठा आहे, की शनीमध्ये 700 पेक्षा जास्त पृथ्वी राहू शकतात..म्हणजे तुम्ही कल्पना करा !!!
असा हा प्रचंड मोठा शनी ग्रहचे वस्तुमान आणि आकारमान इतके जास्त असताना , त्याचे गुरुत्वाकर्षण (surface Gravity)वास्तविक पृथ्वीच्या तुलनेने प्रचंड जास्त असले पाहिजे.. पण वास्तविक तसे नाही..!!! शनीचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा अगदी थोडेच जास्त आहे .पृथ्वीच्या तुलनेने फक्त 1.07 पटीने जास्त आहे..
कोणत्याही ग्रहाचे गुरुत्वाकर्षण हे त्याचे वस्तुमान आणि आकारमानवर अवलंबून असतेच, त्या सोबतच त्या ग्रहाची घनता (density) किती आहे, यावर देखील अवलंबून असते.. तसेच, गुरुत्वाकर्षण शक्ती ही दोन वस्तूतील अंतरवर देखील अवलंबून असते. जेव्हा आपण पृथ्वीवर असतो, तेव्हा आपण एक वस्तू असतो आणि आपल्याला पण एक वस्तुमान असते. साहजिकच, पृथ्वीचे वस्तुमान आपल्यापेक्षा जास्त असून पृथ्वीचे केंद्र हे आपल्याला खेचत असते.
पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे 9.8 m/s² (9.8 Newton) आहे, तर शनीचे गुरुत्वाकर्षण हे 10.44 m/s² इतकेच जास्त आहे. म्हणजे तुमचे वजन जर 70 kg हे पृथ्वीवर असेल, तर शनी ग्रहवर ते वजन 73.9 kg असेल.. तसेच, तुम्ही एखादी वस्तू ही आकाशातून पृथ्वीवर टाकली तर ती वस्तू 9.8 m/s² च्या त्वरन सहित वेगाने (speed with acceleration) जमिनीवर पडेल. हेच शनी ग्रहावर ती वस्तू जर आकाशातून टाकली तर 10.44 m/s² या वेगाने शनी ग्रहाच्या वायुरुपी पृष्ठभागावर पडेल..
शनी ग्रह हा जरी आकारमान आणि वस्तुमान ने आपल्या पृथ्वीपेक्षा मोठा असेल, तरी त्याची घनता (density) ही कमी आहे.. शनी हा वायु पासून बनलेला ग्रह आहे.. पृथ्वी हा स्थायु आणि जल असा मिश्रित ग्रह आहे. पृथ्वी ,शुक्र, मंगळ, बुध याना ठोस जमीन आहे. गुरू आणि शनी हे पूर्णतः वायू पासून बनलेले असल्याने त्याला ठोस असा पृष्ठभाग नाही. वायूची घनता ही जल आणि स्थायु पेक्षा कमी असते. म्हणून पृथ्वीच्या तुलनेनं शनी जरी आकारमान व वस्तुमानने प्रचंड मोठा असेल, तरी त्याची घनता (density) कमी असल्याने त्याचे गुरुत्वाकर्षण (surface gravity) कमी आहे. शनी हा बहुतांश हायड्रोजन आणि हेलियम या वायुपासून बनलेला आहे. हे वायू इतर वायूंच्या तुलनेने हलके वायू असतात.
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment