Skip to main content

INTRODUCTION

  Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language).   I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students  or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts  " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning "  on different things in the people of India. Thank you

ओपनहायमर

ओपनहायमर




"ओपनहायमर" हा हॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हा लेख लिहीत आहे तोवर मी अजून सिनेमा पाहिलेला नाही. मात्र हा चित्रपट मी नक्की पाहेन. तुम्हीही चित्रपट पाहावा. ज्याचं फिजिक्स केमिस्ट्रीवर प्रेम आहे त्यांनी तर हा चित्रपट आवर्जून पाहावा.. "क्रिस्टोफर नोलन" हे या सिनेमा चे दिग्दर्शक आहेत. ऐतिहासिक दृष्टीने मी "रॉबर्ट ओपनहायमर " यांच्याबद्दल जे वाचन केले आहे, त्या आधारे मी हा लेख लिहित आहे. मात्र, चित्रपट मध्ये अजून बऱ्याच गोष्टींवर प्रकाश पडणार आहे असे वाटते म्हणून चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहेच.
ओपनहायमर हे दुसऱ्या विश्वयुद्ध मधील अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्त्व होते. अमेरिकेने जपानच्या "हिरोशिमा" आणि "नागासाकी" या दोन शहरावर  अनुक्रमे "लिटल बॉय" व "फॅटमॅन" हे मानव इतिहासातील सर्वात नरसंहार करणारे असे दोन अणुबॉम्ब प्रथमच टाकले. त्या अणूबॉम्ब या तंत्रज्ञानाच्या निर्मिती मध्ये ओपनहायमर यांचे महत्वाचं योगदान होते. अणूबॉम्बच्या स्फोटनंतर त्यांनी "भगवतगीता" मधील एक वचन म्हटलेलं त्यावरही आपण बोलणार आहोत. या लेखात आपण दुसऱ्या विश्वयुद्ध संबधित इतिहास , अणुऊर्जा कशी उत्पन्न झाली , ओपनहायमर यांचा नेमके योगदान आणि भगवतगीता मधील वचन पाहणार आहोत. 

ओपनहायमर यांचा जन्म "ज्यु (jew)" कुटुंबात अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे 1904 मध्ये झाला. लहानपणापासून अत्यंत हुशार विद्यार्थी होते.
केमिस्ट्री, फिजिक्स, क्वांटम फिजिक्स, मिनेरालॉजी या विषयात ते तज्ञ होते. विज्ञान सोबत साहित्य, धर्म, विविध भाषाचा पण त्यांचा अभ्यास होता. ते संस्कृत भाषेचे अभ्यासक होते. भगवतगीता या ग्रंथाला त्यांच्या जीवनात महत्वाचं स्थान होते. हार्वर्ड, गोटिनगण जर्मनी आणि केंब्रिज या नामांकित विद्यापीठात त्यांचं विज्ञानाचे शिक्षण झाले होते. राजकीय दृष्टीने त्यांच्यावर कमुनिस्ट विचार चा प्रभाव होता. "आण्विक ऊर्जा" सकट "थिओराटीकल फिजिक्स" मध्ये त्यांचा खूप मोठं योगदान आहे. 

आता आपण जरा दुसऱ्या महायुद्ध (विश्वयुद्ध ) कडे वळूया.
आपल्या सर्वांना माहीतच आहे की 1939 ते 1945 या काळात द्वितीय विश्वयुद्ध घडले होते. त्यावेळी जग हे मित्र राष्ट्र (Allies) आणि अक्ष शक्ती (axis ) यामध्ये विभागले होते. अक्षशक्तीमध्ये मुख्य देश "जर्मनी' हा असून त्यासोबत जपान व इटली हे देश होते.  मित्र राष्ट्र मध्ये रशिया (USSR), अमेरिका, ग्रेट ब्रिटन हे प्रमुख देश होते.  पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी ची आर्थिक स्थिती खूप बिकट झाली. वर्सायचा तह ( treaty of Versailles) मध्ये जर्मनीवर काही निर्बंध लागले होते. पहिल्या विश्वयुद्धला जर्मनी जबाबदार धरले गेले होते. जर्मनीमध्ये सामान्य लोकांमध्ये अन्यायाची आणि असंतोषाची भावना निर्माण झाली होती. त्यातच अडोल्फ हिटलर या हुकूमशहा उदय होतो. इटली मध्ये मुसोलिनी आणि जपान मध्ये हिरोहीतो असे हुकूमशहा निर्माण झाले. हिटलर हा कट्टर जर्मन भाषिक आणि आर्य लोकांना एकसंघ करत होता.हिटलर ने मोठ्या प्रमाणावर ज्यु (jew) लोकांची हत्या केली होती म्हणून काही ज्यु शास्त्रज्ञ हे अमेरिका आणि इतर ठिकाणी गेले होते. पोलंड, ऑस्ट्रिया , नॉर्वे असे एक एक युरोपिअन देश हिटलर काबीज करत होता. इथेच दुसरे महायुद्ध सुरू झाले. फ्रान्सला काबीज केल्यानंतर "ग्रेट ब्रिटन" हे हिटलर चे  पुढील लक्ष्य होते. इटली हा आफ्रिकेत आणि जपान हा आशिया खंडात आपले विस्तार करत होते. त्यात जपान ने 1941 मध्ये अमेरिकेच्या "पर्ल हार्बर " बेटवर हल्ला केला आणि इथेच अमेरिकाने विश्वयुद्ध मध्ये प्रवेश केला. सुरुवातीला अमेरिका हा दुसऱ्या विश्वयुद्ध मध्ये भाग घेत न्हवता. ब्रिटन आणि फ्रान्स हेच जर्मनीचा प्रतिकार करत होते.

आपण दुसऱ्या विश्वयुद्धात सखोल जाणार नाही, पण इतकं समजून घ्यावे की या युद्धात हिटलर कडून अण्विक अस्त्र (nuclear weapon) वापरली जाण्याची भीती अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट याना व्यक्त केली होती. हिटलर कडून काही शास्त्रज्ञांच्या मदतीने अणूऊर्जा चा वापर करून अण्विक अस्त्र विकसित केले जाण्याची शक्यता होती. त्यावेळी आण्विक अस्त्र तेव्हा नवीन गोष्ट असल्याने त्याचे फक्त "सिद्धांत" (theory) माहीत होते. एखाद्या अणूच्या केंद्रातून बॉम्ब बनवण्या इतकी प्रचंड ऊर्जा निर्माण होऊ शकते हे त्यावेळी सिद्धांत स्वरूपात माहीत होते. हिटलर जर अशाप्रकारे "अणूबॉम्ब " विकसित करण्यात यशस्वी झाला तर जगाचा नाश होईल याची ब्रिटन आणि अमेरिकासकट शास्त्रज्ञांना भीती होती. म्हणून हिटलर ला विरोध करण्यासाठी आपणही अणू ऊर्जा निर्माण करण्याचे मित्र राष्ट्र यांनी ठरवले. त्यानुसार अमेरिकेतील "मॅनहटन" येथे अमेरिकन मिलिटरी सोबत वैज्ञानिकांची टीम बनवण्यात आली आणि काम सुरू झाले. याला "मॅनहटन प्रोजेक्ट" म्हणतात आणि त्या टीमची जबाबदारी  "जे रॉबर्ट ओपनहायमर" यांच्याकडे सोपवण्यात आली. "ओपनहायमर" च असे एकमेव व्यक्ती होते जे अणूऊर्जा साठी लागणाऱ्या "युरेनियम 235 हा युरेनियम चा आयसोटोप" आणि "प्लुटोनियम" या मूलद्रव्य चे  "क्रिटिकल मास " काढू शकत होते. अणूबॉम्ब बनवल्यावर त्याची चाचणी "न्यू मेक्सिको" जवळील वाळवंट मध्ये करण्यात आली.

 "क्रिटिकल मास" म्हणजे अणूबॉम्ब ची  "चैन रिएक्शन " सुरू होण्यासाठी आवश्यक ते वस्तुमान होय. ओपनहायमर यांनी या संबधित मूलद्रव्यचे "क्रिटिकल मास" मोजून दिले. काही मूलद्रव्यच्या अणूमधील "केंद्र" (nucleus)हे अस्थिर असते. त्यातील "प्रोटॉन आणि न्यूट्रोन" हे जास्त संख्येने असल्याने त्याला एकमेकांपासून तोडता येऊ शकते. याला "फिसाइल" मटेरियल असे म्हणतात. "युरेनियम 235" आणि "प्लुटोनियम 239" हे असे या प्रकारचे अणू आहेत आणि यांच्या "केंद्राला " तोडून (nuclear fission)  मोठ्या प्रमाणावर "अणू ऊर्जा" (nuclear energy)निर्माण होऊ शकते. विशिष्ट प्रकारे स्फोट द्वारे 'शॉक वेव्ह" निर्माण करून मूलद्रव्यवर दबाव आणून त्याची "घनता" (density) वाढवली जाते आणि त्यांच्या केंद्रावर "न्यूट्रोन" च मारा केला जातो. यात अणुच्या केंद्राचे विभाजन होते आणि यातून निघालेले "न्यूट्रोन" हे दुसऱ्या अणुच्या केंद्राचे विभाजन करतात अशी एक शृंखला सुरू होते. या  शृंखला (chain reaction) तून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. हेच अणूबॉम्ब होय. या सोबत "बेरियलियम" आणि "पोलोनीयम" ची "न्यूट्रोन" चा मारा करण्यासाठी मदत घेतली जाते.

आण्विक अस्त्र अत्यंत घातक असते. यामध्ये प्रचंड म्हणजे 3000 ते 4000 सेल्सिअस त्याहीपेक्षा जास्त इतके तापमान निर्माण होऊ शकते. हे इतके प्रचंड तापमान असते की, बॉम्ब पडलेल्या केंद्रापासून 3 किमी परिसरातील लोकाचे शरीर काही मिलीसेकंद मध्ये वाफ होऊन नाहीसे होते. या ऊर्जेत प्रचंड प्रकाश निर्माण होतो ते आपल्या डोळ्याच्या दृष्टीपटल ला घातक ठरू शकते.
सर्वात भयंकर म्हणजे या स्फोटानंतर जे रेडिएशन निघतात त्यातील "गॅम्मा किरण " हे मानवाच्या गुणसूत्र मध्ये बदल करतात जे पुढच्या पिढीत आनुवंशिक दोष निर्माण करतात आणि कर्करोग (कॅन्सर) चा धोका उत्पन्न होतो. हायड्रोजन बॉम्ब हा सर्वात मोठा असतो, मात्र आण्विक अस्त्र हे सर्वात भयंकर असते..

जपानवरील अणूबॉम्ब स्फोटनंतर ओपनहायमार आणि काही शास्त्रज्ञ यांनी अणू ऊर्जा चे प्रयोग करू नका, हे जगाला समजावयाचे खूप प्रयत्न केला.आपण लावलेला शोध हा मानवाच्या हातात मिळालेलं सर्वात विनाशक शस्त्र आहे , याची जाणीव ओपनहायमार ला होती .त्यांना करोडो लोकांच्या हत्येचा पश्चातप वाटत होता.अमेरिकाने जपानवर अणूबॉम्ब स्फोट नंतर ओपनहायमार यांच्या मुखातून गीता मधील एक वचन येते "I am become death , destroyer of world" . (गीता मध्ये  काल हा शब्द "death मृत्यू" नसून "वेळ" या अर्थाने आहे)

भगवतगीता मध्ये 11 वे अध्याय 32 वा  संस्कृत श्लोक आहे. विश्वरूपदर्शन देताना भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला म्हणतात ---- 
 
"कालोस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः।
ऋतेपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येवस्थितः प्रतुनिकेषु योधाः।।"

अर्थ - 
"मी वेळ (काळ) आहे. प्रत्येक विनाशाचे मी मुळ कारण आहे. तू युद्धात भाग घेतला नाहीस, तरी विरोधी बाजूच्या सैन्याचा नाश होणारच आहे."

शेवटी मी इतकचं म्हणेन की अणूऊर्जा चा उपयोग विनाशसाठी न करता मानवच्या कल्याणसाठी करावं. ओपनहायमार सारखे शास्त्रज्ञ आपल्या प्रचंड बुध्दीच्या जोरावर नवे तंत्रज्ञान देतात. पण ते तंत्रज्ञान हे मानवाच्या हितासाठी वापरावे की विनाशसाठी वापरावे हे आपल्या हातात आहे.. ज्यांना युद्धाच्या अधून मधून ज्वर येतो त्यांनी युद्धात होत असलेल्या विनाशाचा अभ्यास करावा..

डॉ अलोक कदम

Comments