"चांद्रयान 3" चे लँडर ला चंद्रावर उतरवणे हे अतिशय कठीण गोष्ट आहे .
(18 जुलै 2023 चा लेख)
2019 ला जे "चांद्रयान २" जेव्हा चंद्रावर गेले होते तेव्हा यानाचे (लूनार मोड्युल) तीन मुख्य भाग होते. लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर.
ऑर्बिटर हे चंद्रभोवती भ्रमण करत होते. "लँडर" व त्यात असलेले "रोव्हर" हे भ्रमण करणाऱ्या ऑर्बिटर पासून वेगळे झाले होते. लँडर ची "सॉफ्ट लँडिंग" [अलगद उतरवणे जेणेकरून महत्वाच्या उपकरणांना इजा पोहचू नये] करायची होती. मात्र, ते लँडर चंद्रावर जोरात आपटले आणि अपघातग्रस्त झाले होते.
सॉफ्ट लँडिंग आणि हार्ड (क्रॅश)लँडिंग असे दोन प्रकारे कोणत्याही ग्रहावर "यान" उतरण्यात येत असते. पूर्वीचे नासा चे अपोलो मिशन ने बरेच क्रॅश लँडिंग केली होती. नंतर अमेरिका ही चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करायला शिकली. चीन ने तर पहिल्या प्रयत्नात सॉफ्ट लँडिंग केली होती.मात्र, आपल्याला दक्षिण ध्रुव जो चंद्राचा अंधार असलेला भाग आहे , तिथे सॉफ्ट लँडिंग करायची आहे..!!!
चंद्र आणि मंगळ यात असा फरक आहे की, चंद्रावर वातावरण नाही, मात्र मंगळावर वातावरण आहे. ज्या ग्रहाच्या भोवती एक मजबूत वातावरण असते तिथे आपण एखादे अवकाशयान उतरवायचे झाले तर आपण पराशुट आणि "थ्रस्ट " चा वापर करू शकतो. मात्र चंद्रावर वातावरण नसल्याने आपण थेट चंद्रच्या गुरुत्वमुळे चंद्रावर आपटू शकतो. चंद्रावर जे खड्डे दिसतात, ते धूमकेतू आपटल्याने तयार झाले आहेत. कारण कुठीलीही बाहेरील वस्तू ही वातावरण मुळे हवेत अडली जाते किंवा घर्षणने तिथे नष्ट होते.
चंद्राच्या गुरुत्व विरूद्ध काम करण्यास आपण "रेट्रोरॉकेट थ्रस्ट" या प्रकारचा वापर करतो. यात जेव्हा "लँडर" हे 6000 प्रती किमी चे वेगाने चंद्राचा दिशेने जाते, तेव्हा त्याचा वेग हळू हळू कमी केला जातो. चंद्राच्या जमिनीवर येई पर्यंत ते शून्य केला जातो .यात रॉकेट आकाशात सोडतात ,त्यावेळी ज्या प्रकारे इंधन जाळुन ज्वलनशील वायूद्वारे पृष्ठभागावर दाब तयार केला जातो, त्याच प्रकारे चंद्राचा पृष्ठभाग कडून उलटा दाब घेवून हे लँडर चंद्रावर आदळण्याचा वेग कमी केला जातो. यालाच रेट्रोरॉकेट सिस्टीम म्हणतात. सोबत कॅमेरा चा उपयोग केला जातो. हेच "चांद्रयान २" ला जमले नाही.. लँडिंग करणार तिथे सपाट जमीन शोधणे आणि त्या वेळेत उतरणे हे सगळे त्यात अगोदरच प्रोग्राम केलेले असते. हे खूप अचूकपणे दिलेल्या वेळेत झाले पाहिजे. "आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI" हे सर्व करत असते. पृथ्वीवर बसून हे करता येण्यासारखे नाही.. चंद्राच्या दक्षिण ध्रुववर तरच शक्यच नाही, कारण त्या बाजूला रेडिओ सिग्नल व्यवस्थित पोहचत नाही..
एकतर "चांद्रयान 3" साठी आपला आर्थिक बजेट कमी होता. म्हणून चंद्रावर आपण रॉकेटद्वारे थेट अवकाशयान पाठवले नाही. 3 लाख किमी अंतर पार करण्यास जास्त इंधन लागले असते आणि अधिक शक्तिशाली रॉकेट बनवावे लागले असते. म्हणून आपण दुसऱ्या मार्गाने चंद्रावर जाणार आहोत आणि 2019 ला पण असेच गेलो होतो.. पृथ्वीभोवती वाढत्या स्वरूपात पाच लंबवर्तुळाकार फेरी मारून गोलकार गतीचा वापर (lunar trasfer trajectory ) करून चंद्राच्या दिशेने शेवटचा धक्का देण्यात येणार आणि हे यान चंद्राच्या कक्षेत गतिमान होणार.. 23 ऑगस्ट 2023 ला हे यान चंद्रावर उतरेल. पण चंद्रावर यानाला उतरवण्यासाठी लागणारा शेवटचे 15 ते 20 मिनिट अतिशय कठीण असणार आहे.
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment