Skip to main content

INTRODUCTION

  Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language).   I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students  or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts  " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning "  on different things in the people of India. Thank you

पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आपल्याला जाणवत का नाही..???

 पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आपल्यावर लागू असते, मग ते गुरुत्वाकर्षण आपल्याला जाणवत का नाही..???


हा प्रश्न मला लहानपणी पडायचा आणि आपल्या पैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की , आपण ज्या पृथ्वीवर राहतो, त्या पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल  हे आपल्याला सतत खेचत असते, मग तसे आपल्याला सतत जाणवत का नाही..?

गुरुत्वाकर्षण बल हे दोन वस्तूंचे "वस्तुमान" आणि त्यांच्यातील "अंतर" या दोन गोष्टीवर अवलंबून असते. पृथ्वीच्या तुलनेने आपण खूप लहान आहोत आणि आपले वस्तुमान पण खूप कमी आहे... आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहोत. तसेच, पृथ्वीच्या जवळील वातावरणात जरी असलो, तरी पृथ्वीच्या केंद्रातून आपल्यावर सतत गुरुत्वाकर्षण शक्ती द्वारे पृथ्वीकडे खेचले जाते... 

पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल हे आपल्यावर स्थिर (constant) प्रकारे सतत लागू असते.आपला जन्म पण पृथ्वीच्या वातावरणात झाला आहे. आपण जे काही दैनदिन आयुष्यात करतो, त्यात गुरुत्वाकर्षण आपल्या सोबत सतत असते,कारण आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि वातावरणात असतो.. गंमत म्हणून सांगायचं झालं तर, "तुम्हाला तुमची गर्लफ्रेंड जरी सोडून गेली किंवा बायकोने जरी घटस्फोट दिला, तरी गुरुत्वाकर्षण तुम्हाला कधीच सोडणारा नाही."😀


जीवन ,वाढ , तारुण्य आणि मृत्यू हे सर्व काही होत असताना पृथ्वीचे गुरुत्व हे सतत आपल्यावर लागू असते.. पृथ्वीचे गुरुत्वकर्षणचा प्रभाव पूर्ण कमी होण्यासाठी आपल्याला पृथ्वीचा कक्षेच्या बाहेर 15 लाख ते 20 लाख किलोमीटर दूर जावे लागेल..साधारण 3 लाख किमी अंतरावर चंद्र हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतो.. थोडक्यात, जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्यावर सतत गुरुत्वाकर्षण चा प्रभाव असल्याने आपल्या शरीराला त्याची "सवय" झाली आहे . आपले शरीर, शरीरातील अवयव ,रक्तवाहिन्या ,मांसपेशी , हाडे, सांधे,केस या सर्वांवर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आहे.. तसेच, आपल्या शरीरावर तो समान पातळीवर लागू असतो.. शरीराच्या एका अवयवला वेगळे आणि दुसऱ्याला वेगळे ,असे कधीही होत नाही..


आपले ज्ञानेंद्रिय (senses) यांनी देखील या गुरुत्वशी जुळवून (adapt) घेतले आहे. त्यामुळे, गुरुत्वाकर्षण शक्ती ही सतत आपल्यावर लागू असताना पण ती आपल्याला जाणवत नाही.तसेच, आपण गुरुत्वाकर्षण बाबत कोणत्याही वस्तूशी (reference point) तुलना करू शकत नाही, कारण ज्या गोष्टी हे पृथ्वीच्या पृष्ठभाग आणि वातावरणात आहेत, त्या सर्व गोष्टीवर देखील गुरुत्व हे समान लागू असते.. 


जर आपण पृथ्वीच्या बाहेर दुसऱ्या ग्रहावर जाऊन आलो तर आपल्याला फरक जाणवेल..आपले शरीर हे पृथ्वीच्या बाहेरच्या अंतराळसाठी बनलेले नाही. मात्र, काही ठिकाणी आपल्याला त्याची जाणीव होते. उदा. तुम्ही लिफ्ट मध्ये असताना जर अचानक लिफ्टच्या वेगात बदल झाला,तर तुम्हाला काही क्षण त्याची जाणीव होईल.


डॉ अलोक कदम

Comments

Popular posts

ओठांचे चुंबन - त्यामागील विज्ञान

  स्त्री पुरुषांनी एकमेकांच्या "ओठांचे चुंबन" (kiss)  घेणे, या मागचे विज्ञान काय आहे ? स्त्री आणि पुरुष मध्ये नैसर्गिक लैंगिक आकर्षण (sexual attraction) हे असते. त्यात विशिष्ट प्रकारचा स्त्री पुरुष, आवडी-निवडी आणि कित्येक वर्षाचा सहवास हे घटक परिणाम करतात. पण, आकर्षण हे असतेच असते. हे आकर्षण फक्त जोडीदार (couple) मध्येच असेल असे काही नाही, पुरुष किंवा स्त्रीला एकपेक्षा अधिक "विरोधी लिंगी व्यक्ती" विषयी आकर्षण असू शकते. हे जीवशास्त्रीय आणि मानसशास्त्र चे दृष्टिकोन ने नैसर्गिक मानले जाते.  जेव्हा स्त्री-पुरुष एकत्र भेटतात तेव्हा त्यांच्यातील नैसर्गिक हावभाव आणि एकमेकांना आदर करण्याची पद्धत यामध्ये आकर्षण हे कार्यरत असते. या आकर्षण चा एक पद्धत म्हणजे "ओठावर चुंबन घेणे" हे होय. भारत सारख्या सांस्कृतिक देशात फक्त  नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी हे सेक्स पूर्वी "फोरप्ले" मध्ये आणि एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करण्यास चुंबन घेतात. इटली, फ्रान्स, नेदरलँड अशा मुक्त संस्कृती असलेल्या देशात तर स्त्री पुरुष (हे साधे मित्र-मैत्रीण असले तरी) एकेमकाना भेटल्यावर ...

ओपनहायमर

ओपनहायमर " ओपनहायमर" हा हॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हा लेख लिहीत आहे तोवर मी अजून सिनेमा पाहिलेला नाही. मात्र हा चित्रपट मी नक्की पाहेन. तुम्हीही चित्रपट पाहावा. ज्याचं फिजिक्स केमिस्ट्रीवर प्रेम आहे त्यांनी तर हा चित्रपट आवर्जून पाहावा.. "क्रिस्टोफर नोलन" हे या सिनेमा चे दिग्दर्शक आहेत. ऐतिहासिक दृष्टीने मी "रॉबर्ट ओपनहायमर " यांच्याबद्दल जे वाचन केले आहे, त्या आधारे मी हा लेख लिहित आहे. मात्र, चित्रपट मध्ये अजून बऱ्याच गोष्टींवर प्रकाश पडणार आहे असे वाटते म्हणून चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहेच. ओपनहायमर हे दुसऱ्या विश्वयुद्ध मधील अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्त्व होते. अमेरिकेने जपानच्या "हिरोशिमा" आणि "नागासाकी" या दोन शहरावर  अनुक्रमे "लिटल बॉय" व "फॅटमॅन" हे मानव इतिहासातील सर्वात नरसंहार करणारे असे दोन अणुबॉम्ब प्रथमच टाकले. त्या अणूबॉम्ब या तंत्रज्ञानाच्या निर्मिती मध्ये ओपनहायमर यांचे महत्वाचं योगदान होते. अणूबॉम्बच्या स्फोटनंतर त्यांनी "भगवतगीता" मधील एक वचन म्हटलेलं त्यावरही आपण बोलणार आहोत. या...