भौतिकशास्त्र (फिजिक्स) हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे..
काही दिवसापूर्वी मी "क्वांटम फिजिक्स" वर माहिती लिहिली होती , तो लेख आपण वाचला असेलच.
"क्वांटम फिजिक्स" समजून घेताना आपण एक गोष्ट विसरता कामा नये, की "भौतिकशास्त्र" देखील एक सत्य आहे.. भौतिकशास्त्र हे आपल्या जीवनाचा भाग आहे. क्वांटम फिजिक्स" हे जरी भौतिकशास्त्र पेक्षा वेगळे असले किंवा त्यांचे सिद्धांत वेगळे असले तरी ,ते मूळ "भौतिकशास्त्र" चाच भाग आहे.. फक्त फरक इतकाच आहे की , "भौतिकशास्त्र" हे स्थूल वस्तूवर लागू होते आणि "क्वांटम फिजिक्स" हा इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि त्याहून अतिसूक्ष्म कणाचा अभ्यास आहे व त्याचे नियम त्यावर लागू होतात..."क्वांटम फिजिक्स" मध्ये आपण पदार्थ चे सूक्ष्म स्वरूप हे "लहरी" आहेत, हे जाणून घेतले.. पण आपण स्वतः स्थूल किंवा भौतिक जगात जगतो, म्हणून आपल्याला "भौतिकशास्त्र" चे नियम लागू होतात.
"क्वांटम फिजिक्स" नुसार कोणतीही वस्तू ही "पदार्थ " आणि "लहरी" या दोन्ही अवस्था मध्ये एकाचवेळी उपस्थित असते, हे आपण मागील लेखात पाहिलं. त्याच उदाहरण म्हणून आपण "टेबल" घेतले होते. टेबल हे "स्थायु वस्तू" म्हणजे "पदार्थ" पण आहे आणि सूक्ष्म पातळीवर ते "लहरी" wave पण आहेत. पण स्थूल स्वरूपात असलेली वस्तू हे अंतिमतः असत्य आहे हे जरी खरे असेल तरीही ते आपल्या समोर भौतिक स्वरूपातच आहेत. त्यामुळं भौतिकशास्त्र देखील सत्य आहे. आपण टेबलला "लहरी" समजले तरीही "लॅपटॉप" आणि "कॉफी चा कप" ठेवण्यास टेबल च वापरतो ना ? समजा , कोणी व्यक्ती एका इमारती चे छत वर उभा राहून म्हणत असेल की "मी खाली उडी मारेन , ही जमीन पण लहरी आहेत आणि लहरी आहे..माझ्यात व जमिनीत पण प्रोटॉन नुट्रोन कवारक असे सूक्ष्म कण आहेत, उडी मारली तरी काही होणार नाही !!! माझ्यावर गुरुत्व काम करणार नाही " 😀 अस होऊ शकत नाही..आपल्याला पृथ्वीचे "गुरुत्वाकर्षण" लागू आहे... आपण आहोत तर स्थूल पदार्थ त्यामुळे उंचावरून उडी मारणे प्राणघातक ठरू शकते.
भौतिकशास्त्र हे तुमच्या रोजच्या जीवनात जे करता त्या सर्व गोष्टीत भौतिकशास्त्र चे नियम लागू आहे. अनंत ब्रम्हांड, तारे, पृथ्वी, डोंगर , नद्या, समुद्र, सजीव, निर्जीव , तुमचे शरीर इत्यादी सारे काही भौतिकशास्त्र वरच आधारित आहे. बल (फोर्स), दाब (pressure), प्रकाश, इलेक्ट्रिसिटी, वेग, फ्रिकशन, इनरेशिया, गुरुत्वाकर्षण, तापमान, आवाज, वस्तुमान इत्यादी सर्व हे भौतिकशास्त्र मध्ये शिकण्यास मिळते.. या सर्व गोष्टी आपल्या जीवनाचा भाग आहे. उदा. तुम्ही पाणी गरम करता ते 100° C तापमान ला त्याची वाफ (vapour) मध्ये रुपांतर होते., त्याअगोदर वाफ होणारच नाही, हे भौतिकशास्त्र आहे.
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment