सेमीकंडक्टरचा वापर ही आधुनिक डिजिटल क्षेत्रातील सर्वात मोठी क्रांती आहे..
आपल्या मनात एक प्रश्न पडला असेल, की चीन, रशिया, दक्षिण कोरिया, हाँग काँग, ताइवान, अमेरिका, जपान हे देश "इलेक्ट्रिक उपकरणे आणि तंत्रज्ञान" बनवण्यामध्ये इतके आघाडीवर का असतात.. ?? याची बरीच कारणे आहेत. चीन हा देश सध्या स्वस्त इलेक्ट्रिक उपकरणे बनवण्यात आघाडीवर देश आहे. या विकसित देशातील शिक्षण पद्धती आपल्या देशापेक्षा खूप विकसित असल्याने तिथे " आधुनिक कौशल्य" (skill) असलेले कामगार निर्माण होतात.असे बरेच कारण आहे की ते देश तंत्रज्ञान विकसित करू शकतात किंवा स्वतः बनवू शकतात..त्यातीलच एक कारण आहे हे देश "सेमीकंडक्टर" चे उत्पादक आणि निर्यातदार आहेत.
आपण जितके आधुनिक विद्युत उपकरणे वापरतो उदा. स्मार्टफोन, कॉम्प्युटर , मेडिकल उपकरणे, एलइडी बल्ब, वॉशिंग मशीन, डिजिटल कॅमेरा सर्व इलेक्ट्रिक वस्तूमध्ये "सेमीकंडक्टर" वापरले असते. कॉम्प्युटर मध्ये जे प्रोसेसर आहे ते सेमीकंडक्टर पासून बनलेले असते. सेमीकंडक्टर चा वापर करून अगदी लहान "चीप" बनवून त्यावर "माहिती" साठवली जाते आणि आवश्यक "विद्युत प्रवाह" प्रवाहित केला जातो. पूर्वी मोठे कॉम्पुटर किंवा इलेक्ट्रिक वस्तू असायचे , आता अगदी लहान आणि हलके इलेक्ट्रिक वस्तू बनवले जातात. हे सेमीकंडक्टर मुळे शक्य झाले आहे. असेच एक प्रसिद्ध सेमीकंडक्टर म्हणजे "सिलिकॉन" आणि इतर सेमीकंडक्टर जर्मेनियम, गालीयम हे वापरले जातात.
सिलिकॉन हा पदार्थ वाळू (sand , silica) पासून मिळवला जातो..सिलिकॉन हे मूलद्रव्य (element)आहे. जे "टेट्रावलेंट" गुणधर्म असलेलं मूलद्रव्य आहे. याच्या अणू मध्ये बाहेरचा कक्षेत चार इलेक्ट्रॉन असतात. तसे पाहायला गेले तर विद्युत प्रवाह यात सहज वाहू शकत नाही. कारण ते अणू एकमेकांना घट्ट पकडून असतात. इलेक्ट्रॉन प्रवाहित झाल्याशिवाय विद्युत प्रवाह वाहणार नाही. तांबे (copper) हे उत्तम विद्युतवाहक असल्याने एरव्ही वीज प्रवाहित करण्यास तांब्याची तार वापरतात.. मात्र ,इलेक्ट्रिक उपकरणे मध्ये आवश्यक प्रमाणत वीजप्रवाह हवा असतो. त्यासाठी हे मूळ "सेमीकंडक्टर" मध्ये काही इतर मूलद्रव्य टाकले जातात आणि नवीन सेमीकंडक्टर बनवण्यात येते. असे बनवले जाते जेणेकरून तिथे इलेक्ट्रॉन मोकळा होऊन "विद्युत प्रवाह" म्हणजे इलेक्ट्रॉन प्रवाहित होतील.
सेमीकंडक्टर बनवण्याची पद्धत खूप महागडी असते. छोट्या छोट्या चीप मध्ये त्याची व्यवस्थित व सूक्ष्म ठेवण ठेवावी लागते. त्यासाठी आधुनिक आणि रोबोटिक तंत्रज्ञान वापरले जाते. जिथे सेमीकंडक्टर बनवतात तिथे साधे "धूलिकण" पण येता कामा नये याची काळजी घ्यावी लागते. विकसित देश हे त्यासाठी तयार आहेत. आपला भारत अजून सेमीकंडक्टर चीप बनवण्याइतके विकसित झालेला नाही. आपण उपकरणे बनवतो मात्र सेमीकंडक्टर चे उपकरणे आपण बाहेरून मागवतो. चीन हा सेमीकंडक्टर उपकरणे निर्यात करण्यात आघाडीचा देश आहे. बाकी इतर आशिया आणि आग्नेय आशिया मधील देश पण सेमीकंडक्टर ची निर्यात करतात , उदा. थायलंड, मलेशिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया, अमेरिका इत्यादी..
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment