सूपरनोवा - एक महाकाय खगोलीय घटना
मित्रहो, आज आपण "सुपरनोवा" या एक महाकाय खगोलीय घटना विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया..आपण जेव्हा अवकाशाचा अभ्यास करतो, तेव्हा अशा बऱ्याच गोष्टी असतात की, जे आपले भुवया उंचावतात..अशीच एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे "सूपरनोवा".
"सुपरनोवा" हा एक प्रचंड मोठा व चमकदार असा "विस्फोट" असतो..जेव्हा एखादा विशाल तारा (सूर्यापेक्षा मोठा) त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मरणासन्न अवस्थेत पोहचतो किंवा एखादा "व्हाइट द्वार्फ" तारा हा जवळच्या ताऱ्याला आपल्याकडे खेचतो, तेव्हा प्रचंड ऊर्जा एका छोट्याशा भागात एकवटून आकाशात प्रचंड मोठा "स्फोट" घडतो. हा इतका मोठा स्फोट असतो, की आपल्या सुर्यांने त्याच्या संपूर्ण आयुष्यात एवढी ऊर्जा उत्सर्जित केली नसेल, एवढी प्रचंड ऊर्जा त्या स्फोटातून बाहेर निघते. या स्फोटातून प्रचंड लक्ख प्रकाश बाहेर पडतो, की संपूर्ण दीर्घिका (Galaxy) मध्ये जितका प्रकाश असेल तितका किंवा त्यापेक्षा जास्त प्रकाश हा त्याचा असतो..या स्फोटात प्रचंड मोठे "शॉकवेव" आणि "रेडिएशन" बाहेर पडतात, जे जवळच्या ग्रह व ताऱ्याना प्रभावित करतात. "सूपरनोवा" हा दिसायला खूप आकर्षक दिसत असतो, पण वास्तविक हा स्फोट खूप भयानक असतो.
एक तारा त्याच्या साधारण अवस्थेत त्याच्यात बरेच रासायनिक प्रक्रिया घडत असतात. Nuclear fusion नावाची प्रक्रिया ही ताऱ्या मध्ये घडत असते. त्यात "हायड्रोजन" हे सतत एकमेकांसोबत एकत्र येऊन "हेलियम" बनत असते. या प्रक्रियेत प्रचंड ऊर्जा बाहेर पडत असते. त्या ऊर्जा सोबत केंद्रातून बाहेरील भागावर दबाव पडतो. त्याच वेळी त्या ताऱ्याची "गुरुत्वाकर्षण शक्ती" त्याला बाहेरून आत म्हणजे केंद्रावर दबाव टाकत असते. हे दोन परस्परविरोधी दबाव हे कोणत्याही ताऱ्यामध्ये साधारण कार्यरत असतात..
जेव्हा एखादा मोठा तारा हा मरणासन्न अवस्थेला पोहचतो, तेव्हा त्याच्या केंद्रातील इंधन हे संपण्याच्या स्थितीत असते. हायड्रोजन, हेलियम, ऑक्सिजन असे वेगवेगळे मूलद्रव्य वापरले जातात. जेव्हा संपूर्ण इंधन संपते, तेव्हा nuclear fusion थांबते, मग बाहेर जो दबाव पडला पाहिजे, तो पडत नसल्याने तुलनेने प्रचंड जास्त असलेली "गुरुत्वाकर्षण शक्ती" ही आपल्या दबावाने संपूर्ण ताऱ्यांच्या पदार्थाला आत एकवटते. एका कमी भागात खूप पदार्थ दाटीवाटीने एकवटल्याने, आणि "इलेक्ट्रॉन" व "प्रोटॉन" हे एकत्र येऊन "न्युट्रोन" बनल्याने तेथील तापमान खूप वाढते. त्यामुळे केंद्राचे संतुलन बिघडते (core collapse) आणि "विस्फोट" होऊन ही ऊर्जा व आसपासचे पदार्थ हे बाहेर फेकले जातात. या स्फोटातून प्रचंड मोठे धक्के (shockwave)आजूबाजूच्या प्रदेशांना बसतात. तसेच, लोह व निकेल हे पदार्थ आणि "रेडिएशन " मोठ्या प्रमाणावर यातून बाहेर पडते.
अशीच गोष्ट , "व्हाईट द्वार्फ" (white dwarf) तारा बद्दल घडते. व्हाईट द्वार्फ या प्रकारचे तारे हे जवळच्या ताऱ्याला सतत आपल्याकडे खेचतात. जेव्हा जवळच्या ताऱ्याच्या सर्व पदार्थ खेचल्यावर "व्हाईट द्वार्फ" ताऱ्याचे वस्तुमान वाढते, तेव्हा तिथे प्रमाणापेक्षा जास्त वस्तुमान वाढल्याने आणि कमी भागात जास्त पदार्थ एकवटल्याने, त्यात प्रचंड "उष्णता" तयार होऊन "विस्फोट" घडतो..
हा सुपरनोवा यासाठी महत्वाचं आहे, कारण या स्फोटातून अनेक पदार्थ, मूलद्रव्य बाहेर पडतात. आपल्या पृथ्वीवर देखील करोडो वर्षापूर्वी घडलेल्या जवळच्या सुपरनोवा चे अवशेष आहे.. सुपरनोवा चे घटना तुलनेने खूप कमी घडत असतात. नवीन तारा, ग्रह, ब्लॅक होल, नुट्रोन स्टार, नेबुला यांची पण निर्मिती "सुपरनोवा" मध्ये होत असते. आपल्या जवळच्या म्हणजे सुमारे 642 प्रकाशवर्ष दूर असलेला "बेटेलजुस" हा तारा आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आहे आणि त्यात "सुपरनोवा" विस्फोट घडू शकतो..
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment