"माकड पासून माणूस निर्माण झाला आहे" असे डार्विनने आपल्या सिद्धांतमध्ये अजिबात म्हटलेले नाही. काही लोक डार्विन सिद्धान्त खोटा आहे, असा प्रचार करतात..चिंपंझी, माकड, गोरिला हे माणूस का बनत नाहीत.? हा त्यांचा युक्तिवाद असतो
डार्विन यांनी कुठंही असे म्हटलेलं नाही की ,माकड पासून माणूस बनला आहे.. उत्क्रांतीचा सिद्धांत नुसार आपण माकडपासून निर्माण झालो नाही, तर माणूस ,चिम्पाझी माकड ,वानर हे सर्व ज्याच्या पासून निर्माण झाले "तो आपला पूर्वज एक होता".
" प्रायमेट्स " हे आपले 85 दशलक्ष वर्षापूर्वी आपले पूर्वज होते. प्रायमेट्सचे ही पूर्वज होते.. प्रायमेट्स हे वास्तविक सस्तन (mammal) प्राणी या प्रकारात येतात. डायनासोर हे अंडी देणारे होते. जेव्हा पृथ्वीवर धूमकेतू (asteroid) आपटला तेव्हा डायनासोर नष्ट झाले. तेव्हा सस्तन (mammal) प्राण्यांना पृथ्वीवर जगण्याची संधी मिळाली. डायनासोर चे उपस्थितीत सस्तन (mammal) प्राण्यांचे पूर्वज लपून होते. डायनासोर हे आज असते तर आपण मनुष्य च काय वाघ, माकड, हत्ती कोणीही कदाचित नसले असते. कारण या सर्व प्राणी जे आज दिसत आहेत त्यांचं उत्क्रांती डायनासोर चे खात्मा नंतर घडली आहे. त्यात झाडावर राहणारे "प्रायमेट्स" हे वानर सदृश्य प्राणी (वानर किंवा माकड न्हवे) मध्ये उत्क्रांती होत गेली.
उत्क्रांती मध्ये गुणसूत्र (DNA) मध्ये थोडा थोडा बदल होत जातो. ही खूप धीमि प्रक्रिया असते. नैसर्गिक निवड (natural selection) नुसार हे बदल घडत असतात. प्रायमेट्स मधून शेपटी नसलेलं वानर सदृश प्राणी विकसित झाले. याना "होमिनीडी" असे म्हणतात. यात चिंपझी, गोरिला , पोंगो,माणूस यांच्य पूर्वजांचा समावेश होतो. माणूस जर कोणाचं नातेवाईक असेल पोंगो, चिंपझी व गोरिला यांचा नातेवाईक आहे. शेपटी धारक माकड पासून आपण खूप वेगळे आहोत. चिंपझी व गोरिला यांचं गुणसूत्र (DNA) जास्त प्रमाणात आपल्याशी मिळत जुळत आहे. होमिनीडी कुटुंबातून पुढे बदल होत "चिंपझी' पासून वेगळे होऊन 'होमो सेपियन" हे विकसित झाले आहे. होमो सेपियन म्हणजे आदिमानव .
तीन लाख वर्ष पूर्वी हाच मानव (होमो सेपियान )हे आफ्रिकातून वेगवेगळ्या खंडात गेला. जगातील सर्व मानवाचे जन्मस्थान हे आफ्रिका आहे. अखिल मानव जातीची आई ही 3 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत होती, हे लक्षात घ्या. त्या आई वडिलांच्या मागे "प्रायमेट्स ते होमो से" म्हणजे आपल्या अखिल मानव जातीचा आदीचा प्रवास आहे.यावर वेगळा लेख होईल. पण या अनुषंगने आपण जो जातीभेद ,वंशभेद , वर्णभेद करतो ते किती चुकीच्या गोष्टीवर आधारलेलं आहे
आता लक्षात आले असेलच, आपण सर्व वानर सदृश प्राणी हे "प्रायमेट्स" पासून 85 दशलक्ष वर्षापूर्वी विकसित उत्क्रांती होत होमिनीडी या कुटुंबातून 3 लाख वर्षांपूर्वी आजच्या मानवाची उत्पत्ती झाली आहे. या उत्क्रांतीच्या प्रवासात माकड, गोरिला, चिंपझी हे आपले नातेवाईक आहे. त्यांचे जीवनशैली वेगळी होती.. पण ते आणि आपण एक नाहीत. आणि आपण त्यांच्या पासून निर्मित झालो नाही तर आपले सर्वांचे पूर्वज एक होते. चिंपंझी, माकड, गोरिला हे माणूस का बनत नाहीत, तर या कारणास्तव माणूस बनत नाही कारण माणसाची उत्पत्ती ज्या प्रक्रियातून झालेले आहे त्या नैसर्गिक निवड (natural selection)चे ते भाग न्हवते, तसेच त्यांची जडणघडण वेगळ्या नैसर्गिक निवड प्रक्रियातून झाली आहे.
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment