Skip to main content

INTRODUCTION

  Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language).   I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students  or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts  " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning "  on different things in the people of India. Thank you

योनीमार्गचे आकुंचन -स्त्रियांची लैंगिक समस्या

योनीमार्गचे आकुंचन -स्त्रियांची लैंगिक समस्या

योनीमार्गचे आकुंचन होणे यालाच वजायनीस्मस (vaginismus) असे इंग्रजी मध्ये म्हणतात.
शारीरिक संबंधाच्या वेळी स्त्रियांच्या योनिमार्गाच्या स्नायूचे वेदनाकारक रीतीने आकुंचन होते, यामुळे लैंगिक संभोगच्यावेळी शिश्नला योनीमार्गमध्ये प्रवेश करता येत नाही किंवा संभोगाच्या वेळी असह्य वेदना सुरु होतात.  इतकेच न्हवे तर, मासिक पाळीसाठी ज्या स्त्रिया टेम्पोन वापरतात त्याना टेम्पोन वापरता येत नाही. 
बरेच स्त्रिया या समस्याचा त्रास सहन करावा लागतो.अगदी डॉक्टरांना वैद्यकीय पद्धतीने शारीरिक तपास करताना स्त्रियांना हा त्रास सुरू होतो. या लैंगिक समस्येत स्त्रियांच्या योनीमार्गात काही प्रवेश करत असेल तर योनीमार्गाचे आतले स्नायू हे ताठ होतात म्हणजे आंकुचन होतात ज्यामुळं योनीमार्गात प्रवेश करने कठीण होते. म्हणून लैंगिक सुखाचा आनंद अशा स्त्रियांना घेता येत नाही. तसेच असा त्रास असणाऱ्या स्त्रियांना सेक्स करण्याची भिती वाटू लागते , लैंगिक इच्छा कमी होते आणि एकूणच वैवाहिक जीवनावर देखील याचा परिणाम होतो.

वजायनिस्मस ची कारणे काय आहेत? 
या समस्येची बरीच कारणे हि मानसिक  आहेत, तसेच सामाजिक देखील आहेत.. काही प्रमाणात शारीरिक कारणांमुळे देखील हा त्रास होऊ शकतो. वैद्यकीय शास्त्रला या समस्येच निश्चित कारण अजूनही कळलेल नाही. तरीही भय, चिंता, मानसिक तानतनाव अशी कारणे निश्चित आहेत.

मानसिक कारणे
सेक्सविषयक अपुरी माहिती, भीति, समाजात लैंगिकतेबद्दल असलेला संकुचित भाव, प्रेमसंबंध किंवा पूर्वायुष्यात कामक्रीड़ा करतेवेळी  आलेले वाईट अनुभव, एखाद्या स्त्रीवर बलात्कार झालेला असेल तर त्यामुळे तिच्या मनात निर्माण झालेली घृणा व असुरक्षितता , काही इतर मानसिक कारनामुळे सेक्स करायची इच्छा नसने , धर्म संस्कृतीच्या माध्यमातून संभोग विषयक निर्माण झालेले गैरसमज,   अश्या वेगवेगळ्या कारनाचा परिणाम म्हणून सेक्स च्या दरम्यान योनीमार्गचे स्नायुचे आंकुचन होते.
शारीरिक कारणे - बरिचशी कारणे ही मानसिकच आहेत परंतु तरही योनीमार्गमध्ये जंतुसंसर्ग होणे आणि योनीमार्ग कोरडे असणे या कारणमुळे देखील योनीमार्गची आकुंचन होण्याची समस्या निर्माण होउ शकते.

यावर उपाय काय ?
काही उपाय आहेत जे आपण जरूर करून पहा याचा निश्चित लाभ होईल.
केगल व्यायाम - या व्यायामात ओटीपोटीपासून खालचा भाग आतून खेचने व सोडने. सोपी पद्धत म्हणजे लघवी करत असताना मधेच दोन सेकंद लघवी थाम्बवणे व पुन्हा सोडने.असे एका प्रयत्नात दहा वेळा तरी करावे. आणि सम्पूर्ण प्रकार दिवासतुन तीन ते चार वेळा करा. यामुळे योनीमार्ग व त्या आसपास भागातील स्नायुचा व्यायाम होतो.

ध्यान - ध्यानसाधना हा खुप उत्तम मार्ग आहे. मन जितके अधिक शांत व तनावपासून मुक्त राहिल तितक या समस्येवर मात करणे सोपे जाते. पूर्वायुष्यात सम्भोग विषयक वाइट अनुभव असतील तर नवीन आयुष्य व वर्तमान स्थितिला स्वीकारने आवश्यक असते. सेक्सला आयुष्याचा भाग म्हणून स्वीकारने. कामक्रीड़ा ही नैसर्गिक क्रिया आहे यात पापसादृश्य काही नाही हे स्वीकारने. सेक्स विषयक गैरसमज दूर होण्याच्या दृष्टिने मोठी सामाजिक मोहिम आवश्यक आहे.

अजुन एक क्रिया आपण करू शकता. हाताचे एक बोट जितके शक्य होईल तितक योनीमार्गमध्ये हलुवार घुसवने व तिथे तीन ते चार मिनिट ठेवणे. असे कही दिवस करावे. काही दिवसांनी दोन बोटे नन्तर दिवसांनी तीन बोटे असे बोटांची संख्या वाढवावी. यामुळे योनीमार्ग  प्रसरण होण्यास सोपे जाते.पण हे करण्यापूर्वी नखे कापली आहेत का, हे तपासावे. तसेच शक्यतो वंगणयुक्त द्रव (lubricant) किंवा पाणी वापरावे.

तसेच, शारीरिक कारणे असतील (संसर्ग, कोरडेपणा किंवा इतर) तर त्याचे कारणप्रमाणे वैद्यकीय सल्ल्याने उपचार करून घ्यावे.


-डॉ अलोक कदम

Comments