Skip to main content

INTRODUCTION

  Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language).   I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students  or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts  " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning "  on different things in the people of India. Thank you

सेक्सपूर्वी कंडोमची अंतिम मुदत तारीख तपासा...

सेक्सपूर्वी कंडोमची अंतिम मुदत तारीख तपासा...

गर्भधारणा टाळण्यासाठी आणि लैंगिक आजारापासून व एचआयव्ही संसर्ग पासून रक्षण करण्यासाठी कंडोम (निरोध) वापरणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे शारीरिक संबंध करण्यापूर्वी  कंडोम ची अंतिम मुदत तारीख (Expiry date) पडताळून पाहणे ,हे देखील गरजेचे असते. कंडोमची अंतिम मुदत (expiry date) कंडोम च्या पाकिटावर मागच्या बाजुला छापलेली असते.

विविध उत्पादकांकडून आकर्षक बनावटीचे कंडोम (निरोध) हे स्वस्त दरात बाजारात  सहज उपलब्ध होत असले तरी कंडोम ज्या पदार्थ (material) पासून बनवण्यात आला आहे त्याची एक विशिष्ट कालमर्यादा असते. त्यानंतर कंडोमची कार्यक्षमता किंवा प्रभाव कमी होऊ लागतो.  साधारण ३ ते ५ वर्ष कालावधि पर्यन्त कंडोमची मर्यादा असते. कंडोम हे पातळ अशा रबराचे बनलेले असते. लेटेक्स व पॉलीयूरेथीन पासून बनलेले कंडोम हे साधारण ५ वर्ष कालावधि पर्यन्त टिकतात. जर कंडोम मध्ये स्पर्मीसाइड (spermicide) वापरलेलं असेल तर कंडोम ३ वर्ष पर्यन्त टिकतो. याव्यतिरिक्त नॉन-लॅटेक्स, शिपस्किन, लॅम्बस्किन अशा पदार्थाचे (material) चे कंडोमची अंतिम मूदत खुप कमी म्हणजे साधारण १ वर्ष इतकी असते.
प्रत्येक उत्पादक कंपनीने  कंडोम च्या पाकिटवर अंतिम तारीख (Expiry date) छापलेली असते. नेमकी अंतिम तारीख किती वर्षाची असावी हे उत्पादक कम्पनिवर देखील अवलंबून असते.
अंतिम तारीख संपल्यावर कंडोम हे कोरडे व कमकुवत होउ लागतात अशावेळी कंडोम सहज फाटण्याची दाट शक्यता असते. शारीरिक संबंधाच्या वेळी असे मुदत संपलेले कंडोम वापरणे हे लैंगिक आजारांच्या दृष्टीने असुरक्षित तर आहेच, तसेच गर्भधारणा हि टाळता येणार नाही. 

जे लोक कंडोम जास्त प्रमाणात खरेदी करून ठेवतात त्यांनी ते वापरताना त्याची अंतिम तारीख जरूर तपासावी. तसेच कंडोम हे कधीही ओल्या व उष्णता असलेल्या जागेत ठेवू नये.. . पैंटच्या खिशात किंवा पाकिटात देखील कंडोम जास्त काळ ठेवू नये..
नेहमी थंड व कोरड्या जागी कंडोम ठेवावे.

 अंतिम मूदत जवळ आलेले कंडोम देखील कमकुवत असू शकतात. जुना कंडोम हा जास्त कोरडा किंवा जास्त चिकट किंवा थोडा कडक झालेलं असू शकतो. अंतिम मुदत जवळ असलेले कंडोम देखील
सेक्स करण्याअगोदर शिश्न(लिंग) वर चढवताना एकदा जरूर तपासून पहावे. 


-डॉ अलोक कदम


Comments