पुरुषांनी "सेक्स किंवा हस्तमैथुन करणे" हे एक-दोन महिने टाळले, तर शरीराला त्याचा काही फायदा असतो का ??? असा एक प्रश्न अनेकदा विचारण्यात येतो...
प्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ,पुरुषांनी "सेक्स आणि हस्तमैथुन" करणे,हे नैसर्गिक क्रिया आहे. तुमचे शरीर हे नियमितपणे "शुक्राणू" तयार करत असते. पुरुषांच्या वृषण (testicles) मध्ये शुक्राणू तयार होत असतात. तुम्ही जरी काही महिने सेक्स किंवा हस्तमैथुन पासून अलिप्त राहिलात तरी तुमच्या शरीराला हे समजत नसते. तुमची जी बायोलॉजी (जीव शास्त्र )आहे ते आपले अविरत कार्य करत राहते.. अन्नपचन होते, ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणे,प्रोटीन कार्बोहाइड्रेट पासून लहान घटक बनून तुमच्या मायटोकाँड्रिया मध्ये ऊर्जा तयार होणे, हिमोग्लोबिन ऑक्सिजन ला पेशी पर्यंत पुरवते, हार्मोन व नुरोट्रांस्मिटर आपली कामे करत राहणे, हे घडत असते....त्याच प्रमाणे नवीन "वीर्य " पण शरीरात तयार होत असते. मानसशास्त्र च विचार केल्यास , विरूद्धलिंगी व्यक्तीला बघून मनात आकर्षण निर्माण होऊन सेक्स भावना जागृत होतात. हे पण नैसर्गिकपणे घडत असते..
तुम्ही जरी "सेक्स किंवा हस्तमैथुन" नाही केले तरी,तुमच्या मनात "कामवासना " थांबणार नाही.. रात्री स्वप्नदोष (Night fall )म्हणजे झोपेत वीर्यपतन होऊ शकते. त्यामुळे पुरुषांमध्ये एक लाजिरवाणी व पश्चाताप ची मानसिकता उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे तुम्ही सेक्स किंवा हस्तमैथुन वर जबरदस्ती ने बंधन घालू नका.
"सेक्स व हस्तमैथुन" न केल्याने शरीर तंदुरुस्त होते ,असा गैरसमज आहे. सेक्समुळे कमजोरी येते, हा गैरसमज मनातून काढून टाका. सेक्स मध्ये ऊर्जा खर्च होते पण तुम्ही योग्य आहार घेत असाल ,तर तुमचं शरीर पुन्हा ती ऊर्जा निर्माण करते..सेक्स हा एकप्रकारचा एरोबिक व्यायाम आहे.शरीर तंदुरुस्त करण्यासाठी नियमित व्यायाम करा. जीवनसत्व "डी", "बी समूह, आणि प्रोटीन युक्त आहार घ्या. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ध्यानधारणा (Meditation) करा.
"हस्तमैथुन" मानसिक सवय लागली असेल ,तर तुम्ही त्याचे प्रमाण (frequency) कमी करू शकता. सतत मनात सेक्स चे विचार येत असतील तर तुम्ही इतर गोष्टीत मनाला गुंतवू शकता.मात्र,पूर्णतः सेक्स व हस्तमैथुन बंद केल्याने तुम्ही दमन (suppression) करत आहात. कोणत्याही गोष्टीचे दमन हे धोकादायक असते...
- डॉ. अलोक कदम..
Comments
Post a Comment