सेक्स (संभोग) करताना काही पुरुषांना "पहिल्या राऊंड" नंतर "दुसऱ्या राऊंड" मध्ये थकवा का जाणवतो ??
प्रथम एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की , पुरुष आणि स्त्री मध्ये सेक्सची क्षमता ही भिन्न असते.. स्त्री ही एकावेळी भरपूर वेळा संभोग (सेक्स) करू शकते. पण तसे पुरुष बद्दल होत नसते. बरेच पुरुष हा एका सेक्स (संभोग ) नंतर पुन्हा अनेक वेळा सेक्स करू शकत नाही. बरेचसे पुरुष एका रात्री एक वेळा सेक्स करू शकतात ,तर काही पुरुष एका रात्री दोन ते तीन वेळा पण सेक्स करू शकतात.पण हे त्या पुरुषाचा आरोग्य स्थिती वर अवलंबून असते. यात "मर्दानी ताकद" वगैरे चा संबंध नाही,तर पुरुषाचे शरीर किती निरोगी व तंदुरुस्त आहे आणि मानसिक दृष्टीने तो किती तणावमुक्त आहे, यावर त्याची सेक्स ची क्षमता अवलंबून असते.. या गोष्टीला मेडिकल क्षेत्रात " रिफॅक्टरी पिरेड" (Refractory period) म्हणून ओळखण्यात येते. दोन संभोग(सेक्स) मधील स्थितीला "रिफॅक्टरी पिरेड" म्हणतात."रिफॅक्टरी पिरेड" हे प्रत्येक पुरुषाचा वेगळा असतो. "काही मिनिटे ते 24 तास" इतका हा काळ असू शकतो.. ज्या पुरुषमध्ये "रिफॅक्टरी पिरेड" ची वेळ कमी आहे त्या पुरुषांमध्ये वीर्यपतन नंतर काही मिनिट मध्ये "शिश्न" (लिंग) पुन्हा ताठ होते आणि ते सेक्स करू शकतात. ज्या पुरुष मध्ये "रिफॅक्टरी पिरेड" जास्त वेळेचा आहे, त्यांचे लिंग पुन्हा ताठ होण्यास 24 तास इतका कालावधी देखील लागू शकतो. या दोन सेक्स मधील वेळेला "रिझोलुशन स्टेज" (resolution stage) पण म्हणतात.
सेक्स करताना पुरुषांच्या रक्तवाहिन्या मधील रक्तप्रवाह वाढलेला असतो. याच वाढलेल्या रक्तप्रवाहमुळे पुरुषाचे शिश्न ताठ होत असते. पहिल्या संभोगनंतर पुरुषाचे शरीर थकते आणि पुन्हा शिश्न मध्ये रक्तप्रवाह वाढून शिश्न ल ताठरता येण्यास शरीर वेळ घेते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, "रिफॅक्टरी पिरेड" कशावर अवलंबून असते आणि हा वाढलेला कालावधी कमी कसा करावा. जेणेकरून सेक्स च आनंद लुटता येईल?
"रिफॅक्टरी पिरेड" हे आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थिती वर अवलंबून आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे माणसाच्या "हार्मोन" वर परिणाम करत असतात. हार्मोन हे असे केमिकल असतात जे आपल्या शरीरातील विशिष्ट क्रिया करण्यास मदत करत असतात. त्यात "सेक्स हार्मोन " चा समावेश असतो, जे प्रजनन साठी आवश्यक असतात. जसे इस्ट्रोजेन, प्रोजेस्टरान, टेस्टस्टरोन हे सेक्स हार्मोन आहेत. मात्र कामक्रीडा करण्यासाठी ऑक्सीटोसिन, इंडोर्फिन आणि डोपामाईन हे हार्मोन अधिक प्रमाणात असले पाहिजे. सेक्स करताना तुम्हाला आनंदी आणि ताजेतवाने वाटते ते "डोपामाईन" मुळे वाटते. सेक्स चे पूर्वी रोमान्स "फोरप्ले" करताना "ऑक्सीटोसिन" हे हार्मोन ची मदत होते..ज्या पुरुषांमध्ये हे हार्मोन जास्त तयार होतात, त्यांच्यात "रिफॅक्टरी पिरेड" वेळ कमी असतो. ते जास्त वेळा सेक्स करू शकतात.. त्याचप्रमाणे ,वयोमानानुसार देखील ही स्थिती वाढत असते. जसं बहुतेक पुरुषाचे वय 50 व 60 वर्ष ओलांडले की त्याचे शरीरातील रक्तवाहिन्या पण कमकुवत होतात.
पुरुषांनी सेक्स चे पूर्वी "फोरप्ले" (प्रेम व मैत्रभाव हे सेक्समध्ये आवश्यक असते) करणे आवश्यक आहे. सेक्सपूर्वी कमीतकमी 15 मिनिट तरी रोमान्स चा असला पाहिजे. ज्यात एकमेकांशी बोलणे, आलिंगन देणे ,चुंबन घेणे, एकेमकाच्या शरीराला स्पर्श करणे या सर्व गोष्टींचा समावेश होतो. "वास्तविक सेक्स" ची वेळ हे 5 ते 10 मिनिट हे नैसर्गिक आणि पुरेसे असते. सेक्स नंतर 5 मिनिट तरी "आफ्टर प्ले" पण झाला पाहिजे. पुरुषांनी नेहमी ताजेतवाने आणि ताणतणावमुक्त राहावे. मन प्रसन्न राहील, अशा गोष्टीत भाग घ्यावा जेणेकरून तुमचं "डोपामाईन" अजून वाढेल. दुसरी गोष्ट ,पुरुषांनी जास्त प्रमाणात दारू,सिगारेट अशा अमली पदार्थचे सेवन करू नये. मेडिटेशन ,योगा आणि व्यायाम करावे, ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या,मांसपेशी आणि हाडाचे आरोग्य सुधारते. आहारात जीवनसत्व (विटमिन ) आणि क्षार (मिनरल) असले पाहिजे. जसे की व्हिटॅमिन ब समूह, कॅल्शियम,. व्हिटॅमिन डी, प्रथिने, झिंक, इत्यादी. आहारात नियमित पालेभाज्या, फळभाज्या, अंडी,दूध, मासे,दही, ओट,सफरचंद, संत्री, कलिंगड,गाजर, कंदमुळे, काजू,बदाम सारखे नट्स, इत्यादी असेलच पाहिजे.
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment