जगण्याचं नेहमी उच्च व उदात्त ध्येय असले पाहिजे
आपण या जगात आलो आहोत तर काही तरी उच्च ध्येय आणि कर्तृत्व असले पाहिजे. मग त्यात यश येवो की अपयश येवो..तो भाग वेगळा.!!!! मरताना आपल्याल आठवण राहिली पाहिजे की आपण आयुष्यात या उच्चतम ध्येयासाठी जगलो. भलेही जीवन छोटे असेल, पण सोलेट जीवन जगलो, स्वतःसाठी किंवा देशासाठी ,कशासाठी तरी जगलो , व्यर्थ गेलो नाही, याच समाधान असेल.
1)दारू,सिगारेट आणि व्यसन च्या आहारी जाऊन आरोग्याची हानी करणे [प्रमाणात पिणे हे ठीक आहे, पण अतिरेक हानिकारक] ;
2)मुलींच्या मागे आपलं अमूल्य वेळ खर्च करून देवदास बनणे, प्रेमभंग झाल्यावर नैराश्य मध्ये जीवन जगणे. ["इश्क " फिल्म मधला डायलॉग, "लडकी बस ट्रेन" याच्या मागे लागायचं नाही ,एक गयी दुसरी आती है 😀] ;
3)गल्ली क्रिकेटच्या मागे अमूल्य वेळ खर्च करणे [प्रोफेशनल क्रिकेट हे करियर म्हणून खेळणे ही चांगली गोष्ट आहे, बाकी सर्व व्यर्थ];
4)राजकीय कार्यकर्ता आणि अन्धभक बनून आपला स्वाभिमान राजकीय नेत्याच्या पायाशी ठेवणे. [ त्यापेक्षा आई वडिलांची सेवा करा त्यांना दैवत माना] ;
5) खास मुलींसाठी , सासू सूनांच्या टुकार फालतू मालिका बघण्यात आपला अमूल्य वेळ खर्च करणे. [त्यापेक्षा काहीतरी नवीन कला ,व्यवसाय किंवा विज्ञान शिका]
या फालतू गोष्टी साठी आपले आयुष कधीही खर्च करू नका...हे पाच मुद्दे लिहून घ्या..विशेषतः जे तरुण तरुणी 18 ते 25 या वयोगटात आहेत त्यांच्यासाठी...
त्यापेक्षा अभ्यसाचा पाया "बेस " मजबूत करा. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलोजी, इकॉनॉमिक, सोशल सायन्स, भाषा , गणित भूमिती यांचे मूळ संकल्पना प्रॅक्टिकल पद्धतीने समजून घ्या.. जिम मध्ये व्यायाम करण्यासाठी जा, पण मुलींना इंप्रेस करायला बॉडी बनवू नका. स्वतःच्या आरोग्यासाठी बॉडी बनवा. स्विमिंग, बॉक्सिंग, किंवा इतर खेळ प्रोफेशनल पद्धतीने शिका. भलेही ते फिटनेससाठी असो किंवा पुढे त्यात करियर पण कराल पण जे शिकायचे त्याला अर्थ असला पाहिजे. एनसीसी जॉईन करा . कराटे , कुंग फू, ज्युडो मार्शल आर्ट किंवा लष्करी (मिलिटरी) प्रशिक्षण जॉईन करा. मुझिक,अक्टिंग कला ची आवड असली तर ते शिकून घ्या.. जे छंद आणि आवडी आहेत ते जोपासावे.
आपले आयुष्याचे पहिले 25 वर्ष तरी शिकण्यात आणि गुणवत्ता (क्वालिटी ) मिळवण्यासाठी असली पाहिजे..आपले जगण्याचे उच्च ध्येय असले पाहिजे. जीवनात स्वाभिमान असला पाहिजे.. बाकी सगळे दुय्यम आहे.. माणसाची ओळख हे माणसातील गुणवत्ता, स्वाभिमान आणि कौशल्य ने होत असते. पैसा ,पद ,प्रतिष्ठा हे आपोआप येते. पण गुणवत्ता ही एका रात्री अचानक तुम्ही मिळवू शकणार नाही..आणि वेळ निघून गेल्यावर नवीन गोष्टी शिकणे कठीण असते... म्हणून लहानपणीच आपण आपली ध्येय हे मोठी ठरवायचे आणि त्यावर काम करायचे...सर्वात महत्वाचं म्हणजे अनावश्यक गोष्टीत वेळ खर्च करायचा नाही...कारण जीवनात एकदा वेळ निघून गेली की पुन्हा येत नाही...
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment