अहंकार आणि स्वाभिमान
"अहंकार" आणि "स्वाभिमान" यात खूप फरक आहे.. अनेक लोक हा फरक ओळखायला चुकतात. कारण आजकाल तरुण तरुणी हे उथळ विचारांचे झाले आहे. वाचन संस्कृत आणि तत्वद्न्यान समजून घेणे हे कमी झाले आहे. आजकाल मुलांचे आदर्श हे "छपरी "लोक आहेत. त्यामुळं लोक सिद्धांत वगैरे समजून घेत नाहीत..आता मूळ विषयावर येऊया..
"अहंकार" म्हणजे अशी गोष्टी जिथे आपण स्वतःला जगाचा केंद्रबिंदू मानतो. व्यक्तीला एखादी गोष्टी आपणच करू शकतो व दुसरा कोणी करू शकत नाही ,असे वाटायला लागते. अहंकार (ego) हा स्वतः सकट इतरांना घातक असतो.
मात्र, "स्वाभिमान" (self respect) म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्त्व आणि वैचारिक पातळीचा आदर करणे. स्वतःवर प्रेम असणे. हलक्या दर्जाचे न होणे..कधीही लाचारी न पत्करणे.
दोन्ही गोष्टी बरेचदा सारखे दिसतात. स्वाभिमान हा अहंकार सारखा भासू शकतो. पण लोकांना काय वाटते हे महत्वाचं नाही, तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे . लोकांनी "स्वाभिमान" जपणार्या माणसांना "अहंकारी" म्हटले तरी चालेल. तुम्हाला स्वतःला माहीत आहे ना की आपण काय आहोत ते म्हणजे झालं !!!
तुमचा कोणीतरी जाणीवपूर्वक अपमान करतो आहे तर तिथे आपला स्वाभिमान जागा असला पाहिजे. जिथे अपमान होतो त्या ठिकाणहून त्वरित बाहेर निघावे. नाहीतर तुम्हाला लाचार समजून तुमचा पुन्हा पुन्हा अपमान होईल..
अन्यायाच्या विरुध्द बंद करणे हा स्वाभिमान आहे.. नाहीतर तुमच्यावर सतत अन्याय होत राहील..
थोड्या पैशासाठी आपला स्वाभिमान कधीही विकू नये. जे लोक नेत्याकडून पैसे घेवून मतदान करतात, ते सर्व लाचार लोक आहेत. नेते मंडळी हे एकदा निवडून आले की तुमचे काम करत नाहीत.कारण त्यांना माहित आहे तुम्हाला लोकशाहीचा अर्थ कळत नाही आणि तुम्ही पैशाने विकले जाता. तुम्हाला कशाला हॉस्पिटल रोजगार कॉलेज पाहिजे ?
सेलेब्रिटी चे मागे फिरणारे चाहते हे लाचार लोक आहेत. तुम्ही जर स्वतःला निरीक्षण केले तर तुम्हाला आढळेल तुमच्याकडे खूप टॅलेंट आहे. काय गरज आहे सेलब्रिटी ल अतिमहत्व देण्याची ?? सेलिब्रिटी पण तुमच्या सारखे माणसे आहेत.उलट ,त्यांना बऱ्याच गोष्टी येत नाही..
मुलीच्या मागे व्यर्थ वेळ खर्च करणारे लोक पण लाचार असतात. मागे एका मुलीने नकार दिला म्हणून "देवदास" झालेला मुलगा माझ्याकडे औषध सल्लासाठी आला होता. तो गणितात खूप हुशार होता.मी त्याचाबदल ऐकून होतो. मी त्याला म्हटले की , "तू गणितात करियर कर ,इंजिनियर बन,तू खूप टॅलेंटेड आहेस, मुली आयुष्य येतात जातात,तुझं स्वाभिमान जप. स्वतःसाठी जग आणि जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी जग..." पुढे 6 महिन्यानंतर त्याने मला फोन केला,त्याने माझं वाक्य खूप मनावर घेतले होते 😀
अहंकार हा मात्र घातकच असतो. अहंकार हा तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यास देत नाही. "मला सर्व येते" हा आविर्भाब अहंकारात असतो. तुम्हाला सर्व येते तर तुम्ही नवीन काही शिकू शकत नाही. अहंकाराने दुसऱ्याचा पण घात होतो. जगात दोन महायुद्ध झाली ती अहंकार, वर्चस्ववाद व परस्पर वैमनस्य मुळे झाली. अहंकार असू नये, मात्र स्वाभिमान हा असलाच पाहिजे.. लाचारीने जगण्यापेक्षा स्वाभिमान ने जगणे कधीही चांगले...
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment