"डार्क मॅटर" आणि "डार्क एनर्जी" - दोन अदृश्य शक्ती
आपली पृथ्वी, सुर्य, ग्रह, असंख्य तारे , दीर्घिका आणि जे जे पदार्थ स्वरूपात अस्तित्वात आहे, ते अवकाशात फक्त 5% आहे, असे जर मी म्हटले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की नाही ? आपण जे असंख्य आणि महाकाय खगोलीय पदार्थ अवकाशात पाहू शकतो ते फक्त 5 % आहे, मग इतर 95 % काय आहे ?? प्रश्न पडला ना !!!! ??
95 % हे "डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी" आहे.. "डार्क" या शब्दात च दडले आहे की ज्या बद्दल शास्त्रज्ञांना काही माहीत नाही. जे अवकाशात कार्यरत आहे आणि ज्याचा आपण अनुभव घेवू शकतो, मात्र त्याला आपण पाहू शकत नाही.. 1933 मध्ये स्विस शास्त्रज्ञ फ्रीट्झ झविकी हे "गलक्सी क्लस्टर" (दीर्घिका चे समूह) वर निरीक्षण करत होते. त्यांचे वस्तुमान मोजताना त्यांना असे लक्षात आले की "गलक्सी क्लस्टर" मध्ये जे दीर्घिका हे "क्लस्टर" चे टोकावर आहेत त्यांचा वेग जास्त आहे आणि वस्तुमान पण जास्त आहे,तरी ते "क्लस्टर" मधून आश्चर्यकारक रित्या बाहेर फेकले जात नाही. कोणतीतरी अदृश्य शक्ती ही दीर्घिकाना एकत्र बांधून ठेवत असावी. इथूनच पुढे "डार्क मॅटर " आणि नंतर "डार्क एनर्जी" हा संकल्पना पुढे आल्या.
अवकाशात "डार्क मॅटर" हे 27 % आहे, तर "डार्क एनर्जी " हे 68 % आहे, आणि बाकी जे साधारण पदार्थ "नॉर्मल मॅटर" आहे ते फक्त 5 % आहे ज्यात आपली पृथ्वी सूर्य व आपण आहोत.. "डार्क मॅटर" हे गुरुत्वाकर्षण प्रमाणे आहे जे दीर्घिका, तारे, आणि सर्व पदार्थ ला एकत्र बांधून ठेवते. म्हणून दीर्घिका मधील तारे हे केंद्राशी अतिशय वेगाने फिरत असताना देखील बाहेर फेकले जात नाही. याउलट , "डार्क एनर्जी" ही पदार्थ ल एकमेकांपासून दूर फेकण्याचा कार्य करतात .याचे उदाहरण म्हणजे आपल्या ब्रम्हांड हे सातत्याने पसरत आहे आणि दीर्घिका हे एकमेकांपासून दूर जात आहेत. म्हणून तर ब्रम्हांड चे उत्पती वेळी निघालेला प्रकाश आपल्या पर्यंत अजून पोहचला नाही, कारण "ब्रह्मांड" हे पसरण्याचा वेग हा प्रकाश वेग पेक्षा जास्त आहे. हे सर्व "डार्क एनर्जी" मुळे घडते.
"डार्क मॅटर " आणि "डार्क एनर्जी" हे दोन विरूद्ध शक्ती आहे.त्यांचे एकमेकांशी समतोल आहे.यात "डार्क एनर्जी" ची ताकद तुलनेनं जास्त आहे.. आणि या दोन्ही शक्ती संपूर्ण "अदृश्य "आहेत.. अदृश्य शक्ती आपल्या ब्रम्हांडात जास्त प्रमाणात आहे आणि आपल्यावर त्याच परिणाम आहे..
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment