शेअर मार्केट मधील धोका....
हल्ली बरेच लोक "शेअर मार्केट" कडे वळले आहे. काही लोक "कमोडीडी" मार्केट तर काही लोक "क्रीप्टो करन्सी" करत आहेत.. विशेषतः लॉकडाऊन मध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि व्यवसाय ठप्प झाले होते ते लोक देखील मार्केटकडे वळले आहेत.. किंवा काही लोक "एक्स्ट्रा इन्कम" साठी मार्केट मध्ये ट्रेडिंग करतात..
शेअर मार्केट एक चांगला , प्रोफेशनल आणि गंभीर व्यवसाय आहे. शेअर मार्केट हा जुगार नाही. पण तो जुगार सारखा खेळता येऊ शकतो..बहुतांश लोक "जुगार" सारखेच शेअर बाजार मध्ये व्यवहार करतात आणि जुगार प्रमाणे त्यांना भारी "तोटा" देखील होतो...नवीन लोक अभ्यास न करता किंवा अर्धवट ज्ञान घेवून थेट "ऑप्शन बाजार" मध्ये प्रवेश करतात.. तेही "बँक निफ्टी" आणि "निफ्टी" मध्ये ट्रेडिंग करतात, हे प्रचंड धोकादायक असते.
मी हल्लीच काही टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुप पाहिले.. ग्रुप चालवणारा अडमिन सांगतो तसे ते लोक ट्रेड घेतात. "शेअर मार्केट" मधील शिक्षक आणि त्याचे विद्यार्थी हे जर ग्रुप मध्ये असतील तर एकवेळ ठीक आहे. मात्र , बाकी कोणीही व्यक्ती ज्याला मार्केटचे जराही ज्ञान नाही, तो जर मार्केट मध्ये अंधाधुंदी आणि कोणाचं तरी ऐकून "ट्रेड" करू लागला, तर त्याचा तोटा होणार ,हे निश्चित आहे...काही "शेअर मार्केट" चे सोशल मीडिया ग्रुप मी पाहिले आणि मला यावर लिहावेसे वाटले..कारण मध्यम वर्गीय लोक अभ्यासविना मार्केट मध्ये प्रवेश करून आपला मेहनतीचा पैसा गमावू शकतात.. म्हणून यावर लिहणे गरजेचं आहे.
शेअर मार्केट मध्ये ट्रेड करण्याचे बरेच प्रकार असतात. जसे की इंट्राडे,स्विंग ट्रेडिंग, स्कल्पिंग, शॉर्ट सेल, बीटीएसटी, फ्युचर बाय सेल, ऑप्शन बाय, ऑप्शन सेल, हेजिंग , शॉर्ट टर्म इंवेस्टमेट इत्यादी.. त्यातील "ऑप्शन बाजार" ला लोक लवकर आकर्षित होतात. "ऑप्शन बाजार" हा एका लेखात सांगणे कठीण आहे. पण तुम्ही हे समजून घ्या की, "ऑप्शन" सर्वात जलद गतीने आणि कमी रुपयात अधिक पैसे मिळवून देणारा व्यवसाय आहे.. नवीन लोकांना फक्त "कॉल" आणि "पुट" घेणे इतकंच माहीत असते, मात्र "ऑप्शन" हे इतके सोपे अजिबात नाही.. त्यात बऱ्याच गोष्टी असतात . काही वर्ष "टेक्निकल अनालीसीस" "सायकॉलॉजी" आणि "मनी अँड रिस्क मेनेजमेंट " यावर अभ्यास करावा लागतो, तर "ऑप्शन बाजार" आपल्याला समजते.. नाहीतर ऑप्शन बाजार ला समजून घेणे कठीण आहे.
ऑप्शन हे "दुधारी तलवार " प्रमाणे आहे. एकीकडे हा सर्वात शक्तिशाली व्यवसाय आहे. यात अब्जावधी रुपयांची उलाढाल चालते..दुसरीकडे जर तुम्ही "स्टॉपलॉस" नाही लावले, तुम्ही योग्य "स्त्राईक प्राईस" निवडली नाही आणि तुम्हाला "थीटा" हा प्रकार माहीत नसेल, तर तुमचे जितके पैसे आहेत ते सर्व काही मिनिटात संपू शकतात. ट्रेडिंग अकाउंट अगदी रिकामी होऊ शकते.. त्यामुळं अभासविना मार्केट मध्ये ट्रेडिंग करू नका..जसे डॉक्टर, इंजिनियर, वकील बनण्यासाठी तुम्हाला सखोल अभ्यास असावा लागतो, तसे मार्केट चा देखील अभ्यास असावा लागतो..
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment