टायटन पाणबुडीचे "इम्पलोजन" स्फोट....(कॅटेस्त्रोफिक स्फोट)
आपल्याला सर्वांना माहीतच आहे की , 1912 मध्ये "टायटॅनिक" हे त्यावेळेचे सर्वात मोठे "जहाज" ज्याला "कधीही न बुडणार" (unsinkable) असे म्हटले जात होते, ते जहाज "नॉर्थ अटलांटिक महासागर" मध्ये बुडाले होते.. इंग्लंड वरून अमेरिकाच्या न्यूयॉर्कला चाललेलं "टायटॅनिक" हे जहाज न्यूयॉर्क जवळ एका हिमनग (iceberg) ला आदळून "नॉर्थ अटलांटिक महासागर" मध्ये बुडाले होते. त्यात सुमारे 1500 लोक मृत्यूमुखी पडले होते. काही लोक जहाज सोबत बुडाले होते तर काही लोक अतिशय थंड पाण्यात "हायपोथरमिया" ने मृत झाले होते..सुमारे 700 लोक यात "लाईफबोट " मुळे वाचले होते. यावर सिनेमा आपण सर्वांनी पाहिला असेलच..110 वर्षांनी आजही टायटॅनिक जहाज आपल्या कुतूहल चा विषय आहे. टायटॅनिक जहाज चे अवशेष "नॉर्थ अटलांटिक महासागर" मध्ये अमेरिकाजवळ सुमारे 3800 मीटर (सुमारे 3 किमी) खोल येथे स्थित आहेत.. 1985 मध्ये पहिल्यांदा पाणबुडी चे साहाय्याने हे अवशेष शोधले गेले होते..आणि या जहाजाचे समुद्राच्या तळाशी असलेले फोटो पण उपलब्ध आहेत..
"ओशन गेट" ही कंपनी देखील पाणबुडी बनवते आणि त्यांची पाणबुडी यशस्वीरीत्या महासागर चे तळाशी जाऊन देखील आले आहेत.."टायटन" या त्यांच्या पाणबुडी ने यापूर्वीही टायटॅनिककडे जहाजकडे जाऊन आले होते.. 18 जून 2023 ला 5 अब्जाधीश लोक या पाणबुडी ने 96 तास पुरेल इतकं ऑक्सिजन घेवून "टायटॅनिक जहाज " पाहण्यास समुद्राच्या तळाशी गेले आणि परत आलेच नाहीत. यावर बरेच "सर्च ऑपरेशन" अमेरिका कॅनडा यांच्या मिलिटरी कडून करण्यात आले. अखेर त्यांना टायटॅनिक जहाज च्या अवशेषजवळ 1600 फूट अंतरावर "टायटन" चे काही अवशेष सापडले. यात बसलेल्या 5 लोकांपैकी एक "ओशनगेट " चे सीईओ स्टॉकटन रश हे स्वतः यात होते. पॉल हेन्री हे फ्रान्स नाविक दल (Navy millitary) दलातील व्यक्ती होते. ब्रिटिश बिझनेसमन हमिश हॅरडिंग आणि पाकिस्तानी अब्जाधीश उद्योजक शाहजादा दाऊद व त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद हे होते.. या पाणबुडी चे बनावटीवर, परीक्षण आणि देखभाल वर बरीच टीका झाली. अगदी व्हिडिओ गेम खेळतो ते "जॉयस्टिक " हे स्टिअरिंग म्हणून वापरण्यात आली यावर पण टीका झाली. त्यात आपण खोलवर जाणार नाही.
"कॅटास्त्रॉफिक इम्पलोजन" स्फोट असे याचे कारण देण्यात आले. कोणतेही बॉम्ब स्फोट होतो तेव्हा "एक्सप्लोजन" (Explosion) होते म्हणजे आतील भागातील "मोठा दाब" हा बाहेर फेकला जातो. या उलट इम्पलोजन (implosion) असते. यात बाहेरील वातावरण चा " मोठा दाब " आतील भागावर फेकला जातो. या स्फोट ला " कॅटास्त्रॉफिक इम्पलोजन" म्हणतात. हा अतिशय भयानक स्फोट असतो. महासागर चे तळाशी 5000 PSI (pound per square inch) पेक्षा जास्त दाब (pressure) असतो. टायटन ही पाणबुडी हे दाब सहन करण्यासाठी बनलेली असते.पण काहीतरी तांत्रिक चूक अगदी छोटी जरी असेल तरी समुद्राच्या तळाशी इतक्या दाब खाली महागात पडते. इतक्या दाब खाली तर मनुष्याचे शरीर नाहीसे होते. फक्त 1 मिलीसेकंद मध्ये ही घटना घडली. स्फोट झाले तेव्हा आतील लोकांना समजले पण नसेल इतक्यात त्याचे शरीर क्षणात नाहीसे झाले. आपल्याला मेंदूला एखादी माहिती (stimulus) मिळण्यास 25 मिलीसेकंड इतका कालावधी लागतो. म्हणजे तुम्ही कल्पना करा की 1 मिलिसेकंड मध्ये कसा स्फोट झाला असेल...
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment