स्त्री पुरुषांनी एकमेकांच्या "ओठांचे चुंबन" (kiss) घेणे, या मागचे विज्ञान काय आहे ?
स्त्री आणि पुरुष मध्ये नैसर्गिक लैंगिक आकर्षण (sexual attraction) हे असते. त्यात विशिष्ट प्रकारचा स्त्री पुरुष, आवडी-निवडी आणि कित्येक वर्षाचा सहवास हे घटक परिणाम करतात. पण, आकर्षण हे असतेच असते. हे आकर्षण फक्त जोडीदार (couple) मध्येच असेल असे काही नाही, पुरुष किंवा स्त्रीला एकपेक्षा अधिक "विरोधी लिंगी व्यक्ती" विषयी आकर्षण असू शकते. हे जीवशास्त्रीय आणि मानसशास्त्र चे दृष्टिकोन ने नैसर्गिक मानले जाते.
जेव्हा स्त्री-पुरुष एकत्र भेटतात तेव्हा त्यांच्यातील नैसर्गिक हावभाव आणि एकमेकांना आदर करण्याची पद्धत यामध्ये आकर्षण हे कार्यरत असते. या आकर्षण चा एक पद्धत म्हणजे "ओठावर चुंबन घेणे" हे होय. भारत सारख्या सांस्कृतिक देशात फक्त
नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी हे सेक्स पूर्वी "फोरप्ले" मध्ये आणि एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करण्यास चुंबन घेतात.
इटली, फ्रान्स, नेदरलँड अशा मुक्त संस्कृती असलेल्या देशात तर स्त्री पुरुष (हे साधे मित्र-मैत्रीण असले तरी) एकेमकाना भेटल्यावर "चुंबन " घेतात. त्या देशात चुंबन करणे (kiss) हे साधारण मानले जाते. त्यांच्यात हात मिळवण्यापेक्षा चुंबन घेणे, हे जास्त जवळीकतेचे लक्षण असते.
चुंबन घेण्यामागे विज्ञान कसे कार्य करते ? मानसशास्त्रीय दृष्टकोन ने पाहिले तर ओठांचे चुंबन घेतल्यावर "स्त्री पुरुष" मध्ये जवळीकता आणि प्रेम व्यक्त होते. "विवाहित जोडीदार" आणि "प्रियकर प्रेयसी" ने चुंबन घेतल्यामुळे त्यांच्या नात्यात अधिक आकर्षन निर्माण होते आणि नाते घट्ट होते. ओठ हे शरीरातील खूप संवेदनशील भाग आहे.. यात जास्त संवेदनशील मज्जातंतू जोडलेले असतात. ओठांना जेव्हा विरूद्ध लिंगी व्यक्तीचे ओठ स्पर्श होतात ,तेव्हा तेथील संवेदनशील मज्जातंतू हे मेंदूला सिग्नल देतात आणि सेरोटीनिन, डोपामाईन , ऑक्सीटोसिन सारखे महत्वाचे न्युरोट्रान्समीटर आणि हार्मोन हे कार्यरत होतात. या हार्मोन मुळे "बरे वाटण्याची " (feel good) चे भावना निर्माण होते आणि मनावरचा ताण कमी होतो. हे हार्मोन मानसिक ताण कमी करतात. "चुंबन" करणे हे आनंदी असल्याचे लक्षण आहे. म्हणून काही देशात चुंबन हे साधारण मानले जात असावे..
त्याचप्रमाणे, माणसाचा लाळे मध्ये काही प्रमाणात "टेस्टस्टेरोन" देखील असते, चुंबन घेताना हे हार्मोन आपली कामभावना (sexual feelings) ला जागृत करतात ,म्हणून "सेक्सपूर्वी फोरप्ले" मध्ये "ओठांचे चुंबन" हे महत्वाचं आहे... काम उत्तेजना निर्माण होण्यासाठी ओठांवर चुंबन घेणे हे रोमान्स मधील महत्वाचा भाग आहे..
मात्र, "लीप टू लीप किसींग" ओठाचे चुंबन घेण्याचा धोका पण असतो आणि काही लोकांना चुंबन घेणे आवडत नसते किंवा किळसवाणे वाटत असते..तुम्ही तुमच्या तोंडाची (ओरल केविटी) ची कशी काळजी घेता यावर देखील चुंबन ही क्रिया आणि त्यामागचे भावना अवलंबून असते. ओठाचे चुंबन घेताना बरेच बॅक्टरिया व्हायरस एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतात. मात्र आपल्या तोंडात "लाळ " मध्ये नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती असल्याने, जर तुम्ही आपल्या तोंडाची योग्य काळजी घेतली ,तर एवढा याचा धोका नसतो. उलट आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आपली प्रतिकारशक्ती ही शरीर जितकी अधिक बॅक्टेरिया ला सोमोरे जाते त्यातून अधिक वाढत असते. मात्र तरीही कोणताही मोठा संसर्गजन्य आजार असेल, तर किस करणे, टाळले पाहिजे किंवा किस करू नये. जे तोंडाची योग्य काळजी घेतात, त्यांनी चुंबन घेण्यात काही गैर नाही.
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment