सेक्स कधी करावे ? सकाळी की रात्री ?
हा एक बहुतांश वेळा विचारण्यात येणारा प्रश्न आहे. सेक्स करण्यासाठी विशेष काळाची आवश्यकता नसते. जेव्हा तुम्हाला "सेक्स चा मुड" होतो ,तेव्हा तुम्ही सेक्स करू शकता. दिवसभरात कोणत्याही वेळी तुमची सेक्सची ईच्छा (मुड ) होऊ शकते. सेक्स मध्ये एकमेकांविषयी प्रेम असणे देखील गरजेचे असते. फक्त एकमेकांविषयी शारीरिक आकर्षण वाटत असेल ,मात्र प्रेम वाटत नाही, तर सेक्स मधील " रस " फार काळ टिकत नाही..
सेक्स हे मानसशास्त्रवर पण आधारित असल्याने सेक्सवर मनातील विचारांचा व भावनांचा देखील प्रभाव असतो. अगदी आजूबाजूच्या वातावरणाचा देखील कामभावनेवर प्रभाव असतो. स्त्री व पुरुष मध्ये नाते कसे आहे त्यावर देखील सेक्स करण्याची इच्छा आणि किती वेळा सेक्स करावे, हे अवलंबून आहे.. तरीही साधारण लोक "रात्री" (night)आणि "पहाटे" (morning) सेक्स करतात.
"रात्री आणि पहाटे " यात तुलना केली तर "पहाटे (सकाळी) सेक्स करणे" हे जास्त सुखदायी असते. रात्री सेक्स करण्याचे वेगळे फायदे आहेत. त्यात तुम्हाला सेक्स केल्यानंतर रात्री चांगली झोप लागते. मनावरील ताण कमी होतो आणि ऊर्जा देखील खर्च होते.
मात्र, पहाटे सेक्स (morning sex) करण्याची एक वेगळी मजा आहे. पहाटे आपण झोपून उठल्यावर आपले शरीर ताजेतवाने असते. शरीरात "ऑक्सीटोसिन आणि डोपामाइन" हे हार्मोनचा स्तर वाढल्याने तुम्हाला बरे वाटते , मनावरील ताण कमी असतो आणि मनात रोमान्स निर्माण होतो. सेक्स करण्यापूर्वी अशाप्रकारे रोमान्स ची भावना जागृत होणे, खूप महत्वाचं असते. पहाटे सेक्स करताना पुरुषांमध्ये "टेस्टस्टरोन" आणि स्त्रियांमध्ये "इस्त्रोजन " हे सेक्स हार्मोन च स्तर देखील जास्त होत असल्याने सेक्स करण्यास मदत मिळते. पुरुषांमध्ये "लिंग ताठ" होण्यास (erection) आणि स्त्रियामध्ये योनीमधून "द्रव पदार्थ" निघण्यास (lubrication) या सेक्स हार्मोन ची जास्त मदत होते. पहाटे सेक्स करणे हे सोपे आणि सुखदायी (pleasure) असते..
ज्यांना डायबिटीस किंवा ततस्म दीर्घकालीन आजार आहेत त्यांनी पहाटे सेक्स करणे फायदेशीर आहे, कारण रात्री पुरेशी झोप घेतल्यामुळे पहाटे सेक्स करणे हे रात्री सेक्स करण्यापेक्षा जास्त लाभदायक असते.
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment