"सॉफ्ट ड्रिंक" आहारातून वजा करा...
सॉफ्ट ड्रिंक म्हणजे साखरयुक्त कार्बोनेटेड वॉटर. यात कोल्डड्रिंक , सोडा इत्यादी जे साखरयुक्त रंगीबेरंगी शीतपेये बाजारात उपलब्ध असतात त्यांचं समावेश होतो.बाजारात आपल्याल विविध ब्रँड चे "कोल्डड्रिंक" मिळतात, मी कोणत्याही कंपनी चे नाव घेणार नाही. लहान मुले आणि मोठी माणसे देखील हल्ली "सॉफ्टड्रिंक" आवडीने पितात. अनेकांना पार्टी मध्ये सॉफ्ट ड्रिंक्स ठेवायला आवडते. कोल्डड्रिंक्स मधून येणारे बुडबुडे हे आकर्षक असतात. काही सेलिब्रिटी (लोकांनी सेलिब्रिटी लोकांना का डोक्यावर चढवलं आहे हे मला कळत नाही, कले पुरता याना महत्व द्यावे) लोक पण याची जाहिरात करत असतात. कोल्डड्रिंक पिणे ही फॅशन झाली आहे.
मात्र सॉफ्टड्रिंक (कोल्डड्रिंक) हे शरीराला जास्त हानिकारक असतात. दारू व सिगारेट पेक्षा हे हानिकारक आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
आपल्या शरीराला अतिरिक्त साखरेची गरज नसते. साध्या जेवणातून आपल्याला नैसर्गिक साखर लॅक्टोज, फ्रूक्टोज मिळत असते.तरीही मोठी माणसे 30 ग्रॅम साखर आणि लहान मुले 20 ग्रॅम पेक्षा कमी साखर घेऊ शकतात आणि आपल्याला ते आहारातून सहज मिळते. त्यापेक्षा घेतलेली अतिरिक्त साखर ही जास्त काळासाठी विविध आजारांना आमंत्रण असते. सॉफ्ट ड्रिंक मध्ये 80 ग्रॅम इतकी जास्त साखर असते. त्या सोबत कार्बन डायऑक्साईड असते ज्यामुळे यात पाण्याचं बुडबुडे येतात .म्हणून याला कार्बोनेटेड वॉटर असे म्हटले जाते.. यामध्ये अल्प प्रमाणात फोस्फरिक एसिड आणि सायट्रिक एसिड असते. जी आंबट चव असते ती सायट्रिक असिड मुळे येते. सॉफ्टड्रिंक चे ph level हे 2.5 ते 3.5 इतके असते. म्हणजे हे आम्लयुक्त (acidic) असते. सोडियम बेंजोवेट नावाचे प्रीझरवेटीह यात असते. शिवाय विशिष्ट रंग देणारे केमिकल त्यात असतात ज्यांची (carcinogenic property) कॅन्सर निर्माण करण्याचं क्षमता आहे, असे आंतरराष्ट्रीय स्तरांवर आरोप झाला आहे. कित्येक देशात विशेषत युरोप मध्ये हे काही हानिकारक केमिकल टाकण्यास कंपनीवर बंदी आहे.
सॉफ्टड्रिंक ने लठ्ठपणा (obesity) येऊ शकते. टाईप 2 डायबेटिस होऊ शकते. "Osteoporosis " म्हणजे हाडे ठिसूळ कमकुवत होणे हे कॅल्शियम चे कमतरतेमुळे होणारा आजार होऊ शकतो. सर्व व्हिटॅमिन ची कमतरत होऊ शकते, त्यामुळे अशक्तपणा येणार. दातांचे आरोग्य बिघडू शकते. कोलेस्टेरॉल आणि ट्राईग्लीसरायड वाढून हदयाचे (cardiovascular) आजार होऊ शकतात. यकृत आणि किडनीशी संबंधित आजार होऊ शकतात. कोणतीही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. साखरेचे जर अतिप्रमाणात सेवन केले तर ते हानिकारक आहे.
हे सर्व आजार एकदा कधी कोल्डड्रिंक पिऊन होत नाही. जर तुम्ही वर्षानुवर्ष रोज किंवा अनेकदा पीत असाल तर तुमच्या शरीराला हानी पोहचू शकते, असे संशोधकांचे मत आहे. आपल्या शरीराला वास्तविक सकस आहार आणि व्यायाम ची गरज असते. आहारात प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, क्षार, पाणी, व्हिटॅमिन हे सर्व योग्य प्रमाणात हवे असते. आपल्या आहारात यांचा समावेश आहे का हे तपासणे गरजेचे आहे..मग आपण आहारात ते का घ्यावे, ज्याचा आपल्याला उपयोग नाही आणि जे अतिरिक्त साखर वाढवू शकते ??
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment