सर्वात उत्तम "संभाषण" कधी घडते माहीत आहे का ?
सर्वात उत्तम संभाषण तेव्हा घडते जेव्हा आपण "दुसऱ्याच ऐकायला " शिकतो.. संभाषण मध्ये "दुसऱ्याचं ऐकून घेणं" ही गोष्ट खूप महत्वाची असते.. ऐकणे , चिंतन करणे आणि बोलणे, ही एक पद्धत आहे..
काही लोक फक्त बोलतात. समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेत नाही किंवा अर्धवट ऐकतात.. त्याने उत्तम संभाषण घडत नाही.. प्रथम समोरील व्यक्तीचे शांतपणे ऐकून घ्यावे, मग जी प्रतिक्रिया आहे ती मोजक्या शब्दात द्यावी... पटल तर ठीक.. नाहीतर सोडून द्यावे ..संभाषण मध्ये नेहमी इतरांच्या मताचा आदर असावा...
आणि सर्वात महत्वाचं हे की, अनावश्यक बडबड करू नये, कारण त्यामुळे आपली ऊर्जा अनावश्यक खर्च होते..काही लोकांना दिवसभर नॉन स्टॉप बोलायची सवय असते.. खूप बोलण्यापेक्षा कमी बोलावे पण महत्वाचं बोलावे. आणि महत्वाचा ठिकाणी व योग्य वेळी व्यक्त व्हावे.. भलेही कोणीही आपल्याला गर्विष्ठ म्हणो... रोखठोक,मोजके आणि नेमक बोलणे ,हे उत्तम संभाषण चे अजून एक लक्षण आहे... या बाबतीत मला ब्रिटिश लोक चांगले वाटतात..
हे गुण आत्मसात करणे वास्तविक खूप कठीण आहे. मात्र सरावाने हे शक्य आहे. तुम्ही एखाद्याशी संवाद कराल तेव्हा याची काळजी घ्या. समोरच्या व्यक्तीचे मत शांतपणे ऐकून नंतर प्रतिक्रिया द्या..
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment