"ओलबर पॅराडॉक्स"
आज आपण एक गमतीदार आणि रहस्यमयी "पॅराडॉक्स" पाहणार आहोत. "पॅराडॉक्स" म्हणजे अशी गोष्ट ज्या मध्ये परस्पर विरोधी गोष्टी असतात.. एक गोष्ट किंवा घटना जी विरोधाभास ने भरलेले असते..त्यातील एक "ओलबर पॅराडॉक्स'.
तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, पूर्ण लेख वाचायच्या अगोदर यावर विचार करा. "आपल्याला रात्री आकाश काळे का दिसते? किंवा वेगळ्या शब्दात मांडायच तर, आकाशातील तारे सोडल्यास बाकी अंधार का दिसतो ?
तुम्हाला प्रश्न पडला असेल की "हा काय प्रश्न आहे का "?? पण मित्रहो , हा प्रश्न आहे व एक पॅराडॉक्स आहे..
जर्मनीचे शास्त्रज्ञ हेनरीच ओलबर याना 18 व्या शतकात हा प्रश्न पडला होता. पॅराडॉक्स यासाठी कारण आकाश तर अनंत आहे आणि आकाशात अब्जावधी तारे व दीर्घिका (galaxy) आहेत. 18 व्य शतकात विज्ञान आज प्रमाणे विकसित न्हवते,मात्र त्यांचा प्रश्न बरोबर होता. जर आकाशात अब्जावधी तारे आहेत. जिथे आपण पाहू तिथे तारे आहेत,तर एक अशी छोटी जागा तरी "रिकामी" असेल का जिथे तारे नसतील ? मग संपूर्ण (आपल्यासाठी दृश्य) ब्रम्हांड जर ताऱ्यानी भरले आहे, तर आकाश लक्ख प्रकाश युक्त भरले पाहिजे.आकाश रात्रीचे सफेद किंवा चमकणारे दिसले पाहिजे..पण तसे नाही दिसत. आपल्या रात्री तारे सोडल्यास अंधार दिसतो. हा आहे "पॅराडॉक्स" (विरोधाभास).
या प्रश्नावर शास्त्रज्ञ मंडळींनी खूप विचार केला होता आणि याच उत्तर शोधण्यात ब्रम्हांडातील एक अद्भुत रहस्य आपल्या समोर पुढे आले. तुम्हाला असे उत्तर वाटत असेल की , जे आकाशात तारे हे सूर्यापेक्षा महाकाय असेल तरी ते आपल्या पेक्षा लांब आहे , म्हणून ते आपल्याल दिसत नसतील. पण हे उत्तर चुकीचे आहे.. तारे दूर असेल तरी त्यांचा प्रकाश आपल्या पर्यंत पोहचणार. आपल्या आकाशगंगेत आपल्या जवळचा कक्षेत च सूर्यापेक्षा कित्येक पटीने मोठे तारे आहेत.त्यांच्या प्रकाशने तर आकाश रात्री प्रकाशित च असेल पाहिजे.. आपल्या जवळचे अंड्रोमदा दीर्घिका असेल किंवा अजून दीर्घिका असतील त्यांचा ही प्रकाश आहेच ना !!!
याच उतर आपल्याल "डॉपलर एफेक्ट" या विज्ञानाच्या सिद्धान्त नुसार मिळेल. वस्तू जशी आपल्या पासून दूर जाते तशी "ध्वनी" च्या बाबतीत "डॉपलर इफेक्ट" लागू होतो.दूरची वस्तूचा आवाज कमी ऐकण्यास येतो आणि जवळच्या वास्तूचा आवाज जास्त ऐकण्या येतो. कारण ध्वनी लहरी (wavelength) जसे दूर जातात मोठे आकरचे लहरी होत जातात. त्यांची लहरींची तीव्रता कमी होते. तेच प्रकाश बद्गल घडते.. प्रकाश किरण ल पण डॉपलर इफेक्ट लागू पडतो. जसे प्रकाश दूर जाऊ लागतो तसे प्रकाश चे लहरी हे आकाराने मोठे (लाल रंगाचे) इन्फ्रारेड लहरी होऊ लागतात..सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला ब्रम्हांड हे वेगाने आणि सातत्याने पसरते (expand) आहे. ब्रम्हांडचा पसरण्याच वेग हा प्रकाशच्या वेगापेक्षा जास्त आहे.त्यामुळे दूरचा प्रकाश आपल्या पर्यंत पोहचू शकता नाही आणि जे इन्फ्रारेड प्रकाश लहरी पोहचतात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही..त्याचा परिणाम म्हणजे रात्र काळी किंवा अंधाराची असते..
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment