होमिओपॅथीचे सिद्धांत
प्रत्येक शास्त्र हे त्याच्या सिद्धांतवर चालते. भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, राजनीती, खगोलशास्त्र , गणित, भूमिती, युद्धशास्त्र किंवा कोणतेही शास्त्र पहा, त्यात सिद्धांत हे असणारच !
वैद्यकशास्त्र देखील काही महत्वाच्या सिद्धान्तवर चालते. अल्लोपॅथी, आयुर्वेद , होमिओपॅथी, युनानी, चीनी औषधी इत्यादी सर्व औषधशास्त्र देखील विशिष्ट सिद्धान्तवर उभे असतात.. जगात अनेक रुग्ण असे आहेत की जे अल्लोपॅथीसकट होमिओपॅथी शास्त्र ला एक दुसरा पर्याय म्हणून पाहतात. जर्मनी चे डॉ हानेमान यांनी 18 व्या शतकात शोधून काढलेले हे शास्त्र आहे..
चला तर जाणून घेवू ,होमिओपॅथी कोणत्या सिद्धांतवर काम करते.
होमिओपॅथी मध्ये चार सिद्धान्त हे महत्वाचे आहेत.
१) व्यक्ती विशेष (Individualization)- निसर्गात प्रत्येक व्यक्ती विशेष असतो. होमिओपॅथी मध्ये प्रत्येक रुग्ण ला विशेष मानण्यात येते. इतर उपचारपद्धती या "आजार" ल केंद्रस्थानी मानतात ,याउलट होमिओपॅथीमध्ये व्यक्ती (म्हणजेच रुग्ण) हा केंद्रस्थानी असतो.
२) समान गुणधर्म (symptom similarity) - होमिओपॅथी मध्ये अशा औषधाचा प्रयोग केला जातो जे रुग्णामध्ये त्याच्या आजाराशी मिळती जुळती लक्षण तयार करतात. होमिओपॅथी नुसार, आजाराशी समान गुणधर्म निर्माण करणारी औषध ही आजाराला नष्ट करतात. किंवा आपण असेही म्हणू शकतो की समान गुणधर्म मुळे रुग्ण चे शरीर त्या आजाराशी लढण्यास तयार होते.
3) Theory of Drug Dynamization - होमिओपॅथी मध्ये जी औषधे वापरली जातात ती या सिद्धान्त वर आधारित आहेत. "औषधी पदार्थ हे जितके अधिक विरघळले जातात किंवा औषधी पदार्थ कमी होतात, तितके त्याची आजार बरे करण्याची क्षमता अधिक वाढते" . हे प्रयोगशाळेत सिद्ध होणे शक्य नसते.कारण रसायनशास्त्र (chemistry) चे आधारे आपण त्याला सिद्ध करू शकत नाही. पण तात्विक दृष्टीने ( philosophy) आणि रुग्णावर प्रत्यक्ष प्रयोग करून अनुभवद्वारे हा सिद्धांत वापरला जातो.
4) मायाझम (miasm) - होमिओपॅथी मध्ये "मायाझम" वर आधारित रुग्णाची प्रकृती ओळखली जाते. कोणताही व्यक्ती हा विशिष्ट शारीरिक व मानसिक प्रकृतीचा असतो.
मायाझम ला माणसाच्या गुणसूत्र (DNA) सदृश्य मानू शकतो. जन्मतः माणसात काही विशिष्ट गुणधर्म हे जास्त क्षमतेचे असतात..त्या गुणधर्म प्रमाणे तो समाजात इतर व्यक्तीशी किंवा कुटुंबात वागत असतो. सुख दुःख मध्ये प्रत्येक मनुष्य ची एक वेगळी व विशेष प्रतिक्रिया असते. हे जे विशेष प्रकृती घेवून मनुष्य जगत असतो, होमिओपॅथी असे मानते की माणसाचे आजार पण त्या व्यक्तीच्या विशेष गुणधर्म प्रमाणे असतात . या प्रकृतीचा आणि आजाराचा घनिष्ठ संबंध आहे..
मानसिक- शारीरिक (psychosomatic) आजार हे मन व शरीर यांच्या मिश्रणवर आधारित असतात. या आजाराचा पण विशेष प्रकार असतात,यालाच होमिओपॅथी मध्ये "मायाझम" म्हणतात. "सोरा", "सायकोसिस 'आणि "सिफिलिस" हे काही मूलभूत "मायाझम" असतात.. "सोरा" हे असमाधान , मानसिक गोंधळ , भीती, शरीरातील आजाराच्या प्राथमिक अवस्था साठी ओळखले जाते. "सायकोसिस" हे आजाराची वाढ, metabolic disorder, atherosclerosis, डायबिटीस , खोटे बोलण्याची किंवा लपवण्याची वृत्ती साठी ओळखले जाते.. तर "सिफिलिस" हे शारीरिक मानसिक पातळीवर आजाराच्या शेवटची स्थिती , अल्सर, रक्तस्त्राव ,नैराश्य,आत्महत्या या व अशा अनेक गोष्टीबद्दल ओळखले जाते. या "मायाझम" आधारे रुग्णाची प्रकृती ओळखून होमिओपॅथी मध्ये उपचार केले जातात..
- डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment