अजित केसकंबल
अजित केसकंबल हे इसवी सण पूर्व सहाव्या शतकात प्रसिद्ध तत्वज्ञानी होऊन गेले. बुद्ध व महावीर यांचे ते समकालीन (एका काळातील) होते. काही भारतीय तत्वज्ञानी (indian philosopher) जसे की बुद्ध, महावीर, कृष्ण, कपिल मुनी इत्यादी हे प्रसिद्ध आहेत.. चार्वाक, अष्ठावक्र हे ठराविक लोकांना माहीत असतात. मात्र अजित केसकंबल, मखल्ली गोशाल, संजय बेलातीपुत्त हे खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यांचा संप्रदाय देखील टिकला नाही ... ज्यांना साहित्य ची आवड आहे, त्यांना ही नावे माहीत असावीत... मला ही यांचा बद्दल कमी वाचायला मिळाले..
अजित केसकंबल यांचे तत्वद्न्यान अगदी सोपे आणि सरळ होते.. ते भौतिकवादी व नास्तिक विचाराचे होते. त्यांचे तत्वज्ञान असे होते की
"खा पीया मजा करा, पाप पुण्य असे काही नसते, पाप पुण्याचे फळ मिळत नाही, माणूस मेल्यानंतर कसलाही हिशोब होत नाही, मृत्यू नंतर सर्व संपणार आहे, शरीर हे चार घटकांचे बनले आहे, शरीराचे हे चारही घटक मृत्यूनंतर राखेत मिसळणार आहे, आहे ते आयुष्य आनंदाने जगून घ्या, आत्मा हे शरीरापासून काही तरी वेगळं घटक आहे हे ते मानत न्हवते.. ""
अजित केसकंबल यांच्या या तत्वद्न्यान ला "उच्छेदवाद" म्हणतात.
वास्तविक बहुतांश स्वतःला मॉडर्न समजणारे लोक, नास्तिक , भौतिकवादी लोक हे 'अजित केसकंबल" वादी आहेत, हे त्यांनाच माहीत नाही. जरी बुद्ध,कृष्ण, महावीर यांचे लोक नावे घेत असले तरी लोक 'अजित केसकंबल" वादी जास्त आहेत . मात्र अजित केसकंबल हे अनैतिकवादी न्हवते.. पाप पुण्य काही नसते असे जरी त्यांनी सांगितले असले तरी दुसऱ्यांच्या देवाची, धर्माची निंदा नालस्ती कर ,असे त्यांनी सांगितले नाही. खून, दरोडे ,बलात्कार काहीही करा, भरपूर दारू पिया असेही त्यांनी सांगितलं नाही.. अजित केसकंबल यांचे विचार नैतिक पातळीवरच समजून घ्यावे लागणार..
माझ्या निरीक्षणने सध्या नास्तिक भौतिकवादी लोकांचे दोन प्रमुख प्रकार आहेत..एक प्रकार "सुसंस्कृत नस्तिकांचा" जे देव धर्म मानत नाहीत, पण दुसऱ्यांची देवाची धर्माची टिंगलटवाळी देखील करत नाही..नैतिक गोष्टींना ते महत्व देतात..
दुसरे प्रकार आहे "विकृत नास्तिकाचा".. "देव धर्म सब झुट पाप पुण्य काही नसते कसाही वागा काहीही करा.." असे ते मानतात पण आस्तिक लोकांची, त्यांच्या श्रद्धेची , सणांची दिवसरात्र टीकाटिंगल निंदा करत असतात, त्यांना यातून "विकृत" आनंद मिळतो...
अजित केसकंबल हे सुसंस्कृत भौतिकवादी व नास्तिक होते. त्यांची तत्वद्न्यान वर सखोल विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की आयुष्यात टेन्शन का घ्यायचे ? जीवनात कोणी भविष्यकाळ बघितल आहे ? काय ते जीवन वर्तमानात असते..जे येतात ते क्षण मस्त जगायचे. हा विचार या थोर व्यक्तीने किती सहज मांडला होता..
डॉ. अलोक कदम.
Comments
Post a Comment