ब्रम्हांडच्या दोन प्रमुख अदृश्य शक्ती....
आपण मागील लेखात "डार्क मॅटर" आणि "डार्क एनर्जी" विषयी थोडक्यात जाणून घेतले होते.. "डार्क मॅटर" ही ब्रम्हांडातील "आकुंचन" करणारी शक्ती आहे तर "डार्क एनर्जी" ही ब्रम्हांडातील "प्रसरण" करणारी शक्ती आहे. आता एक प्रश्न निर्माण झाला असेल की हे दोन शक्ती इतक्या महत्वाच्या का आहेत ?
या दोन शक्तीच ब्रम्हांडात अत्यंत महत्वाच्या आहे. या दोन्ही शक्ती या अदृश्य व परस्पर विरोधी आहे..आपण दोन अदृश्य शक्ती चे प्रभावाखाली आहोत. आपल्या ब्रम्हाडाची एकीकडे "वाढ किंवा प्रसरण" होत असते आणि दुसरीकडे " आकुंचन" होण्याची शक्ती विरोधी बाजूने कार्यरत असते..दोन विरोधी शक्ती मध्ये एक प्रकारचे संतुलन असते. विश्व हे "दृश्य" आणि "अदृष्य" गोष्टीचे मिश्रण आहे..सर्व काही डोळ्यांनी दिसत नाही आणि डोळ्यांनी दिसते ते सर्व सत्य नसते. आपण आकाशात तारे बघतो त्यांना देखील "थेट " ( live) बघत नाही, तर भूतकाळात पाहतो. त्यातील कित्येक तारे आज अस्तित्वात नाही, तरी आपण त्यांना बघतो. म्हणजे जे दिसते तेच सत्य नसते. काही सत्य असे आहेत जे आपल्या कान, नाक, डोळे ,जीभ, त्वचा या पाच इंद्रिय ने कधीच समजणार नाहीत...त्यापैकी हे दोन अदृश्य शक्ती आहे ज्याला शास्त्रज्ञ नी "डार्क मॅटर" आणि "डार्क एनर्जी" हे नाव दिले आहे .
हे दोन अदृश्य शक्ती आहेत की ज्यांच्या मुळे दृष्य पदार्थ चे अस्तित्व आहे आणि आपले देखील अस्तित्व यावरच आहे..आपली दीर्घिका (galaxy), दीर्घिका चे समूह galactic cluster, अब्जावधी तारे आणि त्यांचे ग्रह उपग्रह यामध्ये जे "संतुलन" आहे ते या दोन विरोधी शक्ती मुळे शक्य आहे. त्याच प्रमाणे "वेळ" ही एकमार्गी संकल्पना देखील याच दोन शक्तीवर अवलंबून आहे..असे म्हटले जाते की जेव्हा "आपल्याला माहीत असलेल्या ब्रम्हडची" उत्पत्ती एका बिंदू मधून झाली तेव्हा "वेळ" चे अस्तित्व न्हवते. "बिग बँग" चे महाकाय स्फोट झाला तेव्हा "वेळ" अस्तित्वात आले. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचे ते जेव्हा या दोन शक्ती ब्रम्हाडावर कार्यरत न्हवती तेव्हा वेळ देखील "शून्य" होता...
आहे ना गंमत..!!!.. आपले "अस्तित्व" आणि "वेळ" याचा जवळचा संबंध ब्रम्हांडातील या दोन प्रमुख अदृष्य शक्तीशी आहे.. यातील एक शक्ती जर दुसऱ्या शक्तीवर पूर्णतः जिंकली , तर ब्रम्हांडा चे संतुलन बिघडेल आणि त्याचे अस्तित्व ही संपुष्टात येऊ शकेल...
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment