मंगळ (Mars) आणि पृथ्वी (Earth)
मंगळ,पृथ्वी आणि शुक्र हे तीन ग्रह सूर्याच्या "गोल्डीलॉक झोन " म्हणजे "हबिटेबल झोन" मध्ये आहेत. "गोल्डीलॉक झोन " म्हणजे कोणत्याही ताऱ्या भोवतीचा असा प्रदेश ज्यात जे ग्रह आहेत त्यावर जीवसृष्टी उत्पन्न होऊ शकते. त्या ताऱ्याची उष्णता या भागात संतुलित असते. शास्त्रज्ञ कोणत्याही ताऱ्याचे दुर्बिणद्वारे निरीक्षण करताना त्याच्या भोवती चे ग्रह किती अंतरावर असतील याच गणित मांडतात.. सूर्याच्या या भागात वर उल्लेख केलेले तीन ग्रह आहेत..
आता, एक प्रश्न साहजिकच पडतो, की पृथ्वी ,मंगळ आणि शुक्र हे तिन्ही ग्रह गोल्डीलॉक झोन मध्ये आहेत, तर पृथ्वीवर च जीवसृष्टी का आहे ?? ..
शुक्र हा साधारण पृथ्वी एवढाच ग्रह असून त्यावर मजबूत वातावरण पण आहे, मात्र तिथे उष्णता प्रचंड आहे. सल्फुरिक एसिड चा तिथे पाऊस पडतो आणि ऑक्सिजन तिथे अगदीच अभाव असल्याने शुक्र ग्रहवर आपण एक मिनिट जिवंत राहू शकत नाही..म्हणून त्याची इथे तुलना करत नाही. मंगळ साधारण कृत्रिम वातावरण निर्माण करून राहण्या योग्य तरी बनवू शकतो..म्हणून आपण मंगळ आणि पृथ्वी यांची थोडक्यात तुलना करतात आहोत. आपल्या वरील प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल.
आपल्या पृथ्वीवर जीवसृष्टी का आहे ? तर पृथ्वीला उत्तम वातावरण आहे , त्यासकटच पृथ्वीभोवती मजबूत चुंबकीय क्षेत्र आहे.वातावरणमुळे पृथ्वीवर विशिष्ट तापमान नियंत्रित राहते. "ग्रीन हाऊस वायू" च त्यात महत्वाची भूमिका आहे. यात ऑक्सिजन,नायट्रोजन , कार्बन डाय ऑक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यांचा विशेष संतुलित प्रमाण आहे. प्राणी आणि वनस्पती हे ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साईड संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात. सूर्याच्या उष्णता मुळे समुद्राचे बाष्पीभवन (evaporation) होते, ते वातावरण मध्ये जाऊन ते थंड होउन जमा होतात,त्याचे ढग बनतात आणि पाऊस पडतो. हेच वातावरण जर नसते तर समुदाच्या पाण्याची वाफ होऊन परत पृथ्वीवर आले नसते, तर ती वाफ अंतराळात गेली असती.. पृथ्वीचे वातावरण हे सूर्याचा अतिनील किरणे पासून आपले रक्षण करते.. Ultraviolet किरण (Radiation) ला पृथ्वीचं वातावरण मोठ्या प्रमाणावर परावर्तित करते.. दुसरे कारण आहे... चुंबकीय क्षेत्र.. पृथ्वीच्या गर्भात लोह आणि इतर जे पदार्थ आहेत, ते पृथ्वी स्वतभोवती फिरते तेव्हा ते देखील फिरत असतात. या मुळे चुंबकीय तरंग उत्पंन होतात. पृथ्वीवर जे दोन ध्रुव आहे त्यामध्ये मोठे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीभोवती तयार होते. सुर्यावरून जे सौरवादळे येतात, ते या चुंबकीय क्षेत्र मुळे अडवले जातात..
मंगळ वर जीव सृष्टी का नाही ?
मंगळवर करोडो वर्षापूर्वी पाणी होते..हा ग्रह पृथ्वी सारखा होता.कारण तेथील पठार, डोंगर ,दर्या मध्ये एकेकाळी पाणी वाहत होते, असा शास्त्रज्ञांचा निष्कर्ष आहे.. पाणी नेहमी उंच भागतून सखोल भागात वाहत जाते, वाहताना ते खडकावर चिन्ह तयार करते..आज जरी मंगळ हा लाल ग्रह आपल्याला निस्तेज, नीरस दिसत असला तरी पूर्वी तसा तो न्हवता. पृथ्वीला जे वातावरण आहे ,तसे मंगळ वर वातावरण राहिलेलं नाही. जे पाणी मंगळ ग्रहनिर्मिती वेळी मंगळ वर होते, मात्र ते हळू हळू अंतराळात मिश्रित झाले असावे...तेथील हवामान चक्र पूर्णपणे विस्कळीत झाले. सोबत मंगळ वर ऑक्सिजन चे प्रमाण कमी आहे आणि कार्बन डाय ऑक्साइड खूप जास्त आहे... तिथे प्राणी जगू शकत नाही. मंगळावर पृथ्वीइतके मजबूत चुंबकीय क्षेत्र नाही, म्हणून सौरवादळ आणि अतिनील किरण पासून मंगळ चे रक्षण होत नाही. तिथे पाणी नाही, वातावरण नाही, आणि त्यामुळे जीवसृष्टी निर्माण होणे ही कठीण गोष्ट आहे..
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment