मनुष्य शाकाहारी आहे की मांसाहारी आहे ??
अनेकांना हा प्रश्न पडला असेल, की माणूस हा शाकाहारी आहे की मांसाहारी आहे ? मनुष्य हा एक बहुपेशीय सजीव आहे, तसेच इतर प्राणी आणि वनस्पती हे देखील बहुपेशीय सजीव आहेत..आपल्या शरीरात अब्जावधी पेशी जगत असतात, ते पेशी सुध्दा सजीव असतात. त्यांना कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, व्हिटॅमिन, क्षार आणि पाणी हे जगण्यासाठी लागत असते..या अन्नपदार्थ मधून ऊर्जा उत्पन्न होत असते. अन्न आणि स्वसंरक्षणसाठी एक सजीव हा दुसऱ्या सजीवाला मारत असतो, ही एक अन्नसाखळी असते.
करोडो वर्ष पृथ्वीवर डायनासोरचे राज्य होते, ते सुद्धा दुसऱ्या जीवांना मारत होते. पृथ्वीवर अजून डायनासोर असते, तर मनुष्य तर सोडाच अनेक सस्तन प्राणी (Mammals) यांचे जगणे देखील मुश्किल झाले असते.. डार्विनच्या सिद्धांत नुसार, प्रत्येक जीव हा स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आला आहे.. संघर्ष हा निसर्गातील प्रतिकूल परिस्थितीशी असो किंवा एकमेकांशी असो.. प्रत्येक जीवाने संघर्ष करून इथपर्यंत प्रवास केला आहे. निसर्गातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये सजीव हा जगण्यासाठी जे काही मिळेल त्यावर जगत आला आहे. तसेच,वनस्पती हे पण सजीव आहेत. वनस्पतीवर जगणे हे पण एका जीवाची हत्या असते..
आपण मनुष्य शाकाहारी आहोत ? की मांसाहारी आहोत ? याचे उत्तर आपल्याला माणसाची उत्क्रांती (evolution) कशी झाली हे समजल्यावर लक्षात येते.. आपण माणसाचे पूर्वज म्हणजे "आदिमानव" हा काय खात होता हे समजून घेवू..
"आधुनिक मनुष्य" हा ज्याचा वंशज आहे , ते "होमो सेपियन" हा साधारण 2 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. "होमो सेपियन" पूर्वी 70 ते 80 लाख वर्षापासून "आदिमानव" च्या अनेक जाती अस्तिवात होत्या. त्यावेळी काही वानर हे दोन पायावर उभे राहू लागले .आदिमानव हा त्या वानर (ape) जातसमूहाचा वंशज आहे.. 50 ते 60 वर्षांपूर्वी चा आदिमानव हा बहुतांश वेळा फळे, पाने, कंदमुळे यावर जगत होता. तसेच, तो "लहान प्राणी" व "कीटक" मारून कच्चे खात होता. यात ऑस्त्रोलोपेथिकस हा आदीमानव चा समावेश आहे. दोन पायावर उभे राहणारा आणि वानर पासून वेगळा असा हा आपला वास्तविक पूर्वज आहे.
"आदिमानव" मध्ये उत्क्रांती होत गेली, आणि पुढे "होमो बॅसिलस" व"होमो एरेक्ट्स" यांचा काळात म्हणजे 40 लाख ते 15 लाख वर्षात आदिमानवला हळू हळू "लहान प्राणी" ते "मोठ्या प्राण्यांचे" मांस खाण्याची सवय लागली. "होमो एरेक्टस" चे काळात म्हणजे 18 लाख वर्ष पासून माणूस शिकार करू लागला.. "होमो एरेक्ट्स" याचे वैशिष्ट्य होते, की तो जास्त वेळ ताठ राहू शकत होता. त्याचे अगोदरच्या आदिमानवपेक्षा पाय हे हातपेक्षा लांब होते आणि मेंदूचा पण विकास होत होता.. प्राण्याची शिकार करण्यासाठी दगडापासून अवजारे बनवू लागला. सुरुवातीला तो "कच्च मांस" खायचा, पण जेव्हा त्याने आग पेटवण्याची कला विकसित केली, तेव्हा तो मांस शिजवू लागला..
आपण असे म्हणू शकतो की, माणसाच्या आहारात प्रामुख्याने मांसाचा समावेश हा "होमो एरेक्ट्स" च्या काळात म्हणजे 18 लाख वर्षांपूर्वीपासून, तो शिकारी करू लागल्यापासून सुरू झाला. पुढे "होमो सेपियन" आणि "होमो नीअँडरथल" यांच्या आहारात शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ असायचे. "होमो सेपियन" व पुढे आधुनिक मानवाने शेती करण्याची कला विकसित केली. शिकारीची पद्धत विकसित केली..धातूपासून अवजारे बनवू लागला. पाळीव प्राणी पाळू लागला. त्यांच्या पासून दूध मिळवू लागला...शेती करणे, मासेमारी करणे आणि शिकार करणे हे मानवाचे अन्नासाठी कार्य राहिले आहे..
म्हणून मनुष्य हा शाकाहारी व मांसाहारी असा दोन्ही आहे, तसेच,आपल्या शरीराला त्याची सवय आहे.
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment