घरचे जेवण
आपण हल्ली बाहेरचे अन्न जास्त खातो.. घरचे "साधे जेवण" जेवण्यापेक्षा बाहेरचे अन्न खाणे हे आपल्याला काहीतरी भारी वाटते.
जंक फूड, पिझा, बर्गर, चायनीज, तेलकट पदार्थ हे आपण जास्त प्रमाणात खातो. तसेच, हल्ली प्रक्रिया केलेले पदार्थ देखील आपल्या आहाराचा भाग झाला आहे. त्यात आपण अल्कोहोल, गुटखा आणि सिगारेट याचे पण सेवन करतो.. सोडा आणि कोल्डड्रिंक हे तर अल्कोहोल व सिगारेट पेक्षा हानिकारक असते. हे सर्व खाद्यपदार्थ एकतर आपण बंद केले पाहिजे किंवा कमी प्रमाणात घेतले पाहिजे..या पदार्थ मधून तुम्हाला फायदा तर काहीच मिळणार नाही ,मात्र नुकसान तर भरपूर होते.. फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण असे खाद्यपदार्थ आणि नशा येण्यासाठी अमली पदार्थ आपण घेत असू, तर आपण आपल्या आरोग्याचे खूप मोठं नुकसान करत आहोत..
हे पदार्थ खाल्याने शरीरात "कॅलरी" फक्त वाढतात, मात्र यात आपल्याला प्रथिने (प्रोटीन) , कर्बोदके (कार्बोहाइड्रेट) आणि स्निग्ध पदार्थ हे नैसर्गिक पद्धतीने मिळत नाहीत.. कारण यात प्रक्रिया केलेले पदार्थ असतात. थोडेफार "चीझ " मध्ये कॅल्शियम व प्रथिने असतात, मात्र ते अल्पप्रमानात असतात. बाकी तुम्ही यातून फक्त "कॅलरी" घेता ,तेही असे "कॅलरी" की ज्यात पोषक पदार्थ खूप कमी प्रमाणात किंवा जवळ जवळ नसतातच..त्यात जीवनसत्व (व्हिटॅमिन) आणि क्षार (मिनरल) देखील नसतात... मग, जर काहीच पोषक घटक नाहीत तर आपण का हे अन्न पदार्थ खातो ??
आपले शरीर हे अन्नपदार्थ मधून ऊर्जा तयार करत असते. जेव्हा अन्नपचन होते, तेव्हा अन्नपदार्थ चे "मोठे कण" हे "लहान कण" मध्ये (Catabolism) रुपांतरीत होतात. हे लहान कण आतडी मध्ये शोषले जातात आणि पुढे शरीरातील पेशी मध्ये चयापचय (metabolism) क्रियेमार्फत ऊर्जा तयार करण्यासाठी वापरले जातात.. जे नैसर्गिक पदार्थ मधून आपल्याला अन्नघटक मिळतात ते शुद्ध पदार्थ असतात. आपले शरीर त्यातून आवश्यक पोषक पदार्थ घेवून शरीराच्या विविध हालचाली साठी त्याचा उपयोग करून घेते. आपण जे हालचाली (activity) करतो, उदा. धावणे, खेळणे, सेक्स करणे, काम करणे किंवा इतर सर्व कृतीमध्ये, आपण जे अन्न खातो त्यातून जी ऊर्जा मिळत असते. बौद्धिक क्षमता देखील पोषक पदार्थ वर अवलंबून असते..
तुम्ही जर बाहेरचे अन्न जास्त खाल्ले तर ही ऊर्जा निर्माण होणार नाही आणि शरीराचे ऊर्जा संतुलन पण(energy balance) बिघडणार..त्यामुळे घरचे साधे अन्न खाणे हे जास्त आवश्यक आहे..किंवा तुम्ही जर बाहेर जरी खात असाल तरी पोषक पदार्थ मिळतात का हे तपासून अन्न खाल्ले पाहिजे...
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment