"अष्ठावक्र गीता" मधील एक श्लोक आणि त्याच अर्थ मी सादर करत आहे. श्लोक खूप सुंदर आहे. "अष्ठावक्र गीता" एक अद्भुत पुस्तक आहे. हे पुस्तक वाचताना आपली प्रज्ञा जागृत होते, इतकी क्षमता या ग्रंथामध्ये आहे..
राजा जनक आणि महान संत "अष्ठावक्र"
यांच्यात संवाद चालू असतो. त्यावेळी "अष्ठावक्र" हे खालील श्लोक म्हणतात..
"समदुःखसुख: पूर्ण आशानैराश्ययो: सम: |
सम जीवित मृत्यू : सन्नेवमेव लयं व्रज " ।।५ -४।।
अर्थ - " तू दुःख ला पण समतेने बघ, सुखला सुद्धा समतेने बघ, आशा (hope) ला समतेने बघ आणि नैराश्यलाही समतेने बघ...जीवन आणि मृत्यूलाही समतेने बघ.. जे जीवनात होत आहे त्याला जसे ते घडत आहे तसे बघ...(ते स्वीकार) आणि शांत हो..."
Meaning in English -
( equal in pain and in pleasure, Equal in hope and in Disappointment, Equal in life and Death, and Complete as you are, you go to your rest.)
सुख,दुःख, आशा, नैराश्य, जीवन आणि मृत्यू या कोणत्याही स्थितीला जसे आहे तसे स्वीकारल्याने आपल्या मनावरील ओझे कमी होते.. हे कोणतेही भावना आणि परीस्थिती हे नैसर्गिक आहे. आपण त्यावर क्रिया प्रतिक्रिया देतो ही आपली चूक आहे. जेव्हा आपण त्यांना सक्षिभाव (mindfulness) मध्ये बघतो , तेव्हा आपला मन हलके आणि शांत होते.
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment