बेटेलजुस (Betelgeuse)
बेटेलजुस हा मोठा (giant) तारा असून तो पृथ्वीपासून 642 प्रकाशवर्ष इतका दूर आहे. आपल्या सौरमाले जवळील सूर्यापेक्षा प्रचंड मोठा तारा पैकी एक तारा आहे. सूर्यापेक्षा अंदाजे 700 ते 800 पटीने मोठा हा तारा आहे. ओरियन (orian constellation) नक्षत्र मध्ये आपल्याला हा तारा सापडतो. ओरियन नक्षत्र हे आकाशात मिथुन राशी मध्ये साधारण 20 अंशवर आहे. मृगशीर्ष नक्षत्र जो वृषभ आणि मिथुन मध्ये आहे त्या आसपास तुम्हाला आकाशात ही आकृती दिसेल. बेटेलजुस, रेगेल, बेलाट्रिक्स सारखे मोठे तारे या नक्षत्र मद्ये आहेत.
बेटेलजुस हा या साठी महत्वाचं तारा आहे कारण हा मरणासन्न अवस्थेला पोहचला आहे..आपल्या आयुष्याचा शेवटचा क्षण पर्यंत पोहचला आहे.. कोणताही मोठा तारा जेव्हा मरणासन्न अवस्थेला पोहचतो तेव्हा त्यामध्ये महाकाय स्फोट होतो. त्या स्फोटला "सुपरनोवा" म्हणतात. सुपरनोवा नंतर एकतर तो "ब्लॅक होल" होतो, नाहीतर एक "न्युट्रोन तारा" होतो. सुपरनोवा काय असते ? कोणताही तारा जेव्हा शेवटच्या क्षणात असतो तेव्हा त्याचं आतील इंधन संपते. प्रत्येक तारा मध्ये दोन विरूद्ध "दाब" कार्य करत असतात. पहिलं म्हणजे गुरुत्व आकर्षण त्याला बाहेरून आत दाब देत असते आणि दुसरे म्हणजे तारा चे आत जे हायड्रोजन व घटक जळत असतात त्यातून प्रचड ऊर्जा निर्माण होऊन त्यांचा अतून बाहेर दाब असतो..यात आतील हायड्रोजन ची प्रक्रिया थांबते आणि गुरुत्वाकर्षण जिंकते. तारा आपल्या केंद्राशी एकवटतो आणि बाहेरील पदार्थ बाहेर फेकले जातात..हा स्फोट खूप मोठा असतो. याला "सुपरनोवा ' म्हणतात. जेव्हा एका महाकाय तारा चा स्फोट होतो तेव्हा "ब्लॅकहोल" बनतो आणि त्यापेक्षा तुलनेने लहान ताऱ्या चा स्फोट होतो तेव्हा "नूट्रोन तारा" बनतो.
बेटेलजुस हा "सुपरनोवा" बनण्याचे मार्गावर आहे. या ताऱ्याने अंदाजे 1 करोड इतकं आयुष्य जगल आहे. मोठं तारा असल्याने हा आपल्याल आकाशात सहज दिसतो.. सध्या याच स्वरूप हे लालसर (red giant) आहे. हा 642 प्रकशावर्ष इतका दूर असल्याने त्याचा प्रकाश आपल्या पर्यंत पोहचायला 642 वर्ष लागेल..कदाचित तो तारा सुपरनोवा बनला असेल आणि आपल्या पर्यंत त्याचा प्रकाश अजून पोहचला नसेल असेही असू शकते. जेव्हा कधी हा सुपरनोवा बनेल तेव्हा पृथ्वीवर रात्री आकाशात पौर्णिमेचा चंद्र प्रमाणे लख्ख प्रकाश असेल.
ही घटना बघण्यास आपण नसू पण हा तारा सुपरनोवा बनेल, हे निश्चित आहे..या सुपरनोवा मधून निघणाऱ्या रेडिएशन चा आपल्या पृथ्वीवर त्रास होईल का ?? नाही.. अजिबात त्रास होणार नाही. कारण पृथ्वीपासून हा खूप दूर आहे.. रेडिएशन च त्रास होण्यास पृथ्वीपासून सुपरनोवा चे अंतर हे 25 प्रकाशवर्ष इतकं अंतर हवे.
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment